मना मनातील आई

कविता - मना मनातील आई..!



जरी माझ्याकडे तिची पाठ आहे 

तरी मला ती पूर्ण पाठ आहे

वाकली असेलही सावलीत  ती

कण्याने अजून ताठ आहे......................||

दु:ख मनात कोंडिले 

सुख चोहीकडे शिम्पिले 

जखमेवरी दिसल्या खपल्या 

अंगणात आनंदाचे सडे .......................||

स्वाभिमानी मुठ तिची

कधी उघडी झाली नाही 

दारिद्र्याची झुंबरे कधी

घरात टांगली नाही ............................||

उन्हां-तान्हात वाटचाल झाली 

काट्यानची  पायाखाली भुई

चांदणसावली दिली तिने

दिल्या ओंजळीत जाईजुई ................||

अप्रूपाची नसे हो कहाणी

घरोघरी असते अशी बाई

डोकावून बघा आत तरी

ही तर मनामानातली आई ..............||| 



                                                       
  सौ . मनिषा राजन कडव. 
१६-ए ओमशिवमकूपा को- हौ- सो
गुरुनानक शाळेजवळ ,रामबाग -४
कल्याण (पश्चिम) - ४२१३०१

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*