स्वस्वपान

स्वप्न


कधी कधी स्वप्ने छान पडतात ..!!

कधी कधी स्वप्ने छान पडतात
हवी हवी अशी मस्त वाटतात
स्वप्नात आपले वय दिसत नसते
जसे स्वप्न तसे वय होऊन जाते

कधी असतो आपण मस्त तरुण
मन सुद्धा जाते गाणे गाऊन
प्रेम सुद्धां अगदी छान जमून जाते
प्रेमामध्ये मन हरवून जाते

कशी मस्त मस्त ती दिसत असते
अगदी हवी तशी वाटत असते
रंगी बेरंगी फुलपाखरासारखी
मनात कशी झुलत बसते ...?

अशी स्वप्ने अशी स्वप्ने
कशी अलगद अलगद येतात .?
साखर झोपेत कशी
गाणी गाऊन जातात

अशी स्वप्न मोडू नये
असे खूप वाटून जाते
पण
स्वप्नाना शेवट असतो
हे खूप खरे असते
तरीही काही स्वप्ने खूप काही देऊन जातात
तुमचे मन टवटवीत
नि सकाळ छान करून जातात ...!



सौ.मनिषा राजन कडव .

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*