एकाकी तारा

एकाकी तारा.



एकाकी त्या ताऱ्यापरी  वाटे असावे जीवन
आकाशी  जो चमकून ,प्रकाशितो गगन --


लहानसे अन् निर्मळ ,रुप त्या ताऱ्यांचे असे 
आणि शुभ्र पांढरा तो , नेत्र तेजःपुंज भासे --


चांदण्यांही  अनेक  त्या आकाशात चमकती
आणि चंद्रासवे रात्री ,फेर धरूनी नाचती --


रूपं त्यांचे ते क्षणिक ,जीवनही अन् क्षणिक 
चंद्राविना जिणे  त्यांना ,वाटे  व्यर्थ - निरर्थक --



सायंकाळी आकाशात ,लाख चांदण्या दिसती 
आणि सुर्योदयापूर्वी , प्रकाशी त्या नष्ट होती  --


असे त्यांचे ते जीवन ते , दुजावरती निर्भर 
नसे त्यांना स्व-अस्तित्वच , आणि मन अन् स्वभाव --


स्वयंपूर्ण तारा जगे , स्वाभिमानाने जीवन 
आपुल्याच जीवनात ,असे तोही परीपूर्ण --


अढळ ते ध्येय  त्यांचे , अमर अन्  ते जीवन 
येऊ दे संकटे परी , आपुला मार्ग आक्रमित --


नको  जिणे  चंद्रिकेचे ,निर्जीव  नि अस्पष्टसे
एकाकी  त्या ताऱ्यापरी ,वाटे जीवन असावे  --



सौ.मनिषा राजन कडव.

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*