जीवन

जीवन

जीवन सुंदर आहे
फक्त मनाप्रमाणे जगता आल पाहिजे

आयुष्यात येतात 
चांगले वाईट प्रसंग 
याचे आव्हान स्विकारत
पुढे जाता आले पाहिजे

छोट्या मोठ्या गोष्टीत पापाचे भागीदार आपण तर होतो
थोडे फार पुण्यही 
जोडता आले पाहीजे

नाव ठेवण हे तर 
लोकांच काम आहे
यांना तोंड देऊन
पुढे जाता आल पाहिजे

वेड्याच सोंग पांघरून
शहाण्यासारखं मात्र जगता
आल पाहिजे
भूलथापांना बळी न पडता
आनंदात राहता आल पाहिजे

जगण्याच्या लढाईत कधी 
आपले सवंगडी निकामी होतात
दुःख बाजूला सारून
जीवन फुलवता आल पाहिजे

यश अपयश दोन्ही येतात आयुष्यात
यशाने हुरळून न जाता
आणी अपयशाने खचून न जाता
मार्गक्रमन करता आले पाहिजे

जीवन हा एक रंगमंच आहे
या रंगमंचावरील सगळी पात्रे
जिवंत करता आली पाहिजे
शेवट गोड झाला नाही तरी चालेल
पण प्रेक्षकांना खिळवता आले पाहिजे
सौ. मनिषा राजन कडव

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*