आलं आभाळ भरून

सुरवातीला *नॅशनल लायब्ररी वांद्रे आणि वर्ल्ड व्हिजन मुंबई  यांच्या संयुक्त वद्यमाने
*सावित्रीबाई फुले रात्रशाळा राज्यस्तरीय साहित्य स्पर्धा क्रमांक ४* 


विषय - *आलं आभाळ भरून*

 *पावसाची सर*

आलं आभाळ भरून
आली चॆतन्याची सर
कण कण थरारला
गेली भिजवून सर...॥१॥॥

भिरभिरं वाहे वारा
संगे डोलते ही सर
तापलेल्या या मातीत
गंध भरते ही सर...॥२॥

झाडे वेली बहरली
हसविते सुमनांस सर
सुकल्या जिवांत
प्राण भरते ही सर....॥३॥

धरती-नभातील दुवा
त्यांना जोडते ही सर
दुरावल्या मना-मनांत
प्रेम फुलविते सर॥४॥

सौ. मनिषा राजन कडव
ग्रंथपाल,
डी.एस. हायस्कूल,शीव
9869718659

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*