खुर्ची

*खुर्ची*
खुर्चीवर बसायची एकदा
माकडांना सुटली हाव
एकाच खुर्चीवर सगळी माकडे
कशी बसतील हो राव।।१॥

शिक्षित प्रशिक्षित आणि
भलत्यांचीच पडली पुढे उडी
लंगडत फेंगडत पुढे आले
म्हणे मी उभारेन गुढी ॥२॥॥

सत्तेसाठी खुर्चीवर 
सगळ्यांच्याच उड्या
पद मिळावे म्हणून सरकारपुढे
सर्वांच्या पायघड्या ॥३॥॥

चॅक चॅक करत लाळघोटेपणा करत
करतयं हाजी हाजी
सरकार म्हणतय पिळशील सगळ्यांना
तरचं खुर्ची तुझी ॥४॥

उपाशी तापाशी कोरोनाने
मरेनात का सगळे
खुर्ची फक्त आपली आहे
आपले होईलच सगळे चांगले ॥५॥

खाउ पिऊ मजेत राहू
आनंदाने पाय पसरा
मरेनात उपाशी सगळे
आपल्या घरी मात्र दिवाळी दसरा ॥६॥

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*