थांब आता

थांबव हा प्रलय आता
आज स्वाईन फ्ल्यु उद्या कोरोना
अशा साथींवर येताहेत साथ
मला माहित आहे रे 
तुझ्यावर या मानवानेही केलाय आघात

तुझ्या या रौद्र रूपात तु
किती हाहाकार करशील
पिकलेल्या पानासोबत
कवळे ही नेशील

अरे पण एका दोघांच्या चुकीमुळे 
तु घेणार आहेस का सगळ्यांचा जीव
अरे तुला बाबा आज घरी दिसत नाही
म्हणुन रडणार्‍या चिमुकल्यांची
तुला थोडीशी तरी येऊदे कीव

काय चालवलयस तु हे
तु तरी असा निष्ठुर हौऊ नकोस
पिल्लाने जरी आचळ चावले तरी
माय नाही रे कधी  मारत

तु ही जरा समज तुझं हे 
मानव बाळ सुधारेल निश्चितच
धडा घेईल या महामारीतून
आणि लावेल झाडे धरणीवर
तुही या धरतीवरून या कोरोनाचा 
पसारा आवर,या कोरोनाचा पसारा आवर
सौ.मनिषा राजन कडव
कल्याण

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*