आला आषाढ श्रावण
*स्व.बाबासाहेब के.नारखेडेस्मृती राज्यस्तरीय स्पर्धा सन-२०२२*
*कवितेचे नाव* -
*आला आषाढ-श्रावण*
आला आषाढ-श्रावण
सारे फुलले जीवन -॥धृ॥
येता रवीचे किरण
तेजे चमकते रान
जणु पाचुचे हे बन
हर्षे बागडते मन ॥१॥
येती पर्जन्याच्या धारा
आणि भिजविती धरा
देती तोडून बंधन
तिला दृढ आलिंगन -॥२॥
गर्भवती पृथ्वीतून
गंधवती मातीतून
फुटे अंकूर नूतन
येता आषाढ-श्रावण -॥३॥
जशी हिरव्या कोंदणी
शोभे धवल चांदणी
तसा हरित तृणावर
दिसे दंवबिंदु छान - ॥४॥
काळ्या मेघांची कमान
वर बिजलीचे तोरण
कधी फांके मधुःप्रभा
जाता किरण त्यातून -॥५॥
नटली सृष्टी सौभाग्याने
आनंदाने उत्साहाने
शोभे जणु सुमंगला
येता तजेला नवीन -॥६॥
दृश्य पाहुनी गतिमान
माझे कल्पना विमान
जाते गगन भेदून
करी स्वच्छंदे भ्रमण -॥७॥
सौ.मनिषा राजन कडव.
ग्रंथपाल- डी.एस.हायस्कूल,शीव
Comments
Post a Comment