भेट

भेट...... 

भेट तुझी-माझी 

प्रलंबित - विलंबीत, 
दोघांनाही अनपेक्षीत,
सोज्वळ तरी साग्रसंगीत, 
भेट तुझी-माझी...

तुझा परिचय देणारी,
पहिल्याच भेटीत,
तुझ्याबद्दल 'विश्वास'देणारी, 
भेट तुझी-माझी....

तसे पहायला गेले तर ,
भेटी बऱ्याच होतात,
काळजावर 'एकमेव' कोरलेली 
भेट तुझी-माझी .....

नियतिने निश्चित केलेली,
तुझ्या-माझ्याही नकळत,
आपल्याला नजदीक आणणारी 
भेट तुझी-माझी.... 


सौ.मनिषा राजन कडव.

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*