|| *पहाट*॥


झुंजुर मुंजुर पहाट
पक्ष्यांचा किलबिलाट,
सोनेरी किरणांनी
उजळे प्रकाशाची वाट.........

धुक्याची दुलई
मंद पहाटवारा,
अंगा शिरशिरे
धुंद गारवा बोचरा.........

नभी घननिळ्या
बगळ्यांच्या माळा,
डोंगराआडचा सूर्य
करे डोळा किलकिला.........

दवबिंदूचे शिंपण
दारी प्राजक्ताचा सडा,
परसाच्या रानामागे
घमघमला केवडा.........

नव्या स्वप्नांची
रोज नवीन पहाट,
चैतन्याच्या उत्साहाने
भारलेली जगरहाट.........


सौ.मनिषा राजन कडव

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*