मनासारखे झाले तर...*

कविता 

*मनासारखे झाले तर...*


मनासारखे झाले तर
किती किती मजा येईल
मनाला वाटेल ते सारे
प्रत्यक्ष करता येईल 

रंगीबेरंगी पक्ष्यांसंगे
आकाशी भरारी घेणार
लुकलुकणाऱ्या ताऱ्यांच्या
जगाची सैर करणार

माझ्या प्रिय चांदोमामाची 
एकदा घेईल मी भेट
तेजाचे रहस्य जाणण्या
जाईल सुर्यापाशी थेट

स्वप्नातल्या परीकडून
मी जादूची छडी घेईल 
ती गोलगोल फिरवून
सर्व इच्छा पूर्ण करील

'मनासारखे झाले तर'
कल्पनेने मी आनंदते 
मनासारखे व्हावे अशी
नेहमी आशा बाळगते  



सौ.मनिषा राजन कडव

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*