मनीमाऊ
मनीमाऊ
मनी माऊ मनी माऊ
तू दिसते किती छान
मोठ्ठाले डोळे तुझे
टवकारलेले कान
सदानकदा कशी तु
माऊ माऊ करते
घोटाळत असते सगळ्यान भोवती
कधीही ना तु दमते
वाघाची मावशी तु
तूझा राजेशाही थाट
मोतीशी भांडताना
बोचकारते तु त्याला खास
माश्याचा वास येता
गपचूप गाठते स्वयंपाकघर
डोळे मिटून दूध पिताना
तूला आजूबाजूचे नाही दिसत
उंदीर मामांची घरातील तर
बोलतीच झालीय बंद
आई तुझी खुशामत करत म्हणते
मनी आहे आमची अकलमंद
सौ. मनिषा राजन कडव
Comments
Post a Comment