*केळीचे झाड आणि स्त्री*


केळीचे झाड किती लहान
मूर्ती लहान कीर्ती महान

केळीचे पान दिसते छान
जैसे हलती हत्तीचे कान

छोट्यामोठ्या थोरा सान
हिरव्या पत्री अमृत पान

केळीचे खोड हत्तीचे पाय
उपयोग सांगू कित्ती काय?

चटया दोर जेवणाचे ताट
विघटन होण्या वेगळी वाट

पिशव्या रंगीत पर्सचा थाट
ऐटीत करू बाजार हाट

पौष्टिक स्वस्त केळी मस्त
ऊर्जा झटपट करूया फस्त

फुलांची भाजी करते आजी
गरम खावी ताजी ताजी

केळीच्या या उपकार केवढे
आईच्या थोर उपकारा एवढे

नमस्कार करू केळीला बाळा
देह त्याचा उपयोगी सगळा


सौ.मनिषा राजन कडव.

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*