अमृतमहोत्सव

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव....

देश साजरा करतोय स्वातंत्र्याचा उत्सव... ७५ व्या वर्षी आहे स्वातंत्र्याचा महोत्सव.... देशातील नागरीक अजुन व्हावे ज्ञानी....

जे जाणेल लोकशाहीची वाणी... धर्म, जाती, पंथ, भाषा विसरुन येवू एकत्र सर्व.. आनंदाने सुरू करुया अमृत महोत्सवाचे नवे पर्व.. शेतकरी, कामकरी, सैनिकांना देवूनी मान... त्यांच्या कामाचा देशालाही असावा अभिमान.. पारतंत्र्याचे डोंगर गेले निघून दूरवरी..

आता तिरंगा फडकणार देशातील प्रत्येक छतावरी... एक दिवस नव्हे तर रोज ठेवूनी ध्यानी.. अमृत महोत्सव साजरा करुया  स्वातंत्र्याचा आपण सर्वांनी....


- सौ. मनिषा राजन कडव

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*