रात्र

*रात्र*

रात्र थकुन
लवंडली जराशी
पहाट तिष्ठते
तिच्या उशाशी

पहाटे ची गार
झुळूक येता
प्राजक्त घालतो
सुगंध राशी

रांगोळी घालतो
हिरवा चुडा
पोक्त जोडवी
वावरती चुलिपाशी

नवथर पैंजण
लगबगती घरभर
रुबाबदार मनगट
सोप्यापाशी

गाढ़ मिठी मग
पडते आडोश्याला
विरहाची होई
कल्पना नकोशी

सांज गुलाबी
खुलते मनात
डोळे वळती
पुन्हा दारापाशी

रात्र येते होउन
अधिर आतुर
वेड लावी जिवास
मिलनाची असोशी


सौ. मनिषा राजन कडव

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*