माझं पहिल प्रेम*
*माझं पहिल प्रेम*
तु माझं पहिलं प्रेम
तुझं प्रेम मी जपुन ठेवलय
मनाच्या एका कप्प्यात,
जसा श्वास अंतरात,
सुमनांचा गंध कसा दिसत नसला
तरी दरवळत असतो आसमंतात
तसा तुझ्या प्रेमाचा गंध नेहमीच
दरवळत असतो माझ्या मनात,
हो प्रेम काल ही होतं, आजही आहे
आणि कायम राहील माझ्या मनात
साखर विरघळते जशी दुधात
तसं तुझं प्रेम विरघळलय मनात.
सौ.मनिषा राजन कडव
Comments
Post a Comment