ओळख
*ओळख*
माणसाची ओळख असावी स्वभावातून
पण नसावी नावातून
माणसाची ओळख असावी वागण्यातून
पण नसावी देखणेपणातून
जिद्द असावी दुस-याला हसवण्यात
पण नसावी दु:ख देण्यातून
जिद्द असावी यशस्वीपणे जिंकण्यात
पण नसावी न लढताच हरण्यात
नात्याला ओढ नसावी पैशाची
पण ओढ असावी प्रेमाची
माणसाची ओळख असावी कर्तुत्वातून
पण ओळख नसावी आळशी पणातून
माणसाला ओळख असावी गरिबीला साथ देण्यातून
पण ओळख नसावी श्रीमंतीला वंदन करण्यातून !!
सौ. मनिषा राजन कडव
Comments
Post a Comment