पाऊस

पाऊस

सूर्य समुद्र तापवतो आणि
काळा ढग भरून येतो
त्यात प्रत्येकाचा वाटा असला
तरी पाऊस कौतुक घेऊन जातो

पावसावरच्या रागाला माझ्या
आज काही कारण नाही
ओले होत होते मी एकटीच
पण माझं भिजणं विनाकारण नाही.


सौ. मनिषा राजन कडव
*लपवणारा पाऊस....*

पाऊस तरीही पडणार होता
तिला तसाच रडवणार होता
डोळ्यांनी बरसण्याचं कारण हेच,
की पाऊस एकट्यालाच भिजवत होता

आपण सगळेच कसे पावसात
हसू शकतो, रडू शकतो
हास्य आपोआप पसरतं आणि
रडणं आपण लपवू शकतो


सौ.मनिषा राजन कडव


*रिमझिम पाऊस*

रिमझिम सरीत या,
मन वेडे सुपीक व्हावे,
आनंदाचे भरघोस पीक,
या अंतःकरणावरी डोलावे…….

कष्टकरी देहाचे या,
मृदेमधी मिसळन व्हावे,
पावसाचे काही टिपूस मिळूनी,
मृदेवरी त्या वृक्ष फुलावे….


सौ. मनिषा राजन कडव.



Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*