पर्‍यांच्या राज्यात

*पऱ्यांच्या राज्यात*


अरे चंद्रा दाखव वाट 
मला ढगांतल्या राज्याची....
कधी तरी स्वप्नांमध्ये 
तिथली परी भेटायची

चांदीचा असायचा महाल तिथला
असायचे पडदेही रूपेरी..
बागांमधल्या झाडांवरती..
अमृतफळे उगवायची..

वाटायचे मोठेपणी मला 
पंख नवे फुटतील छान..
सगळ्यांपेक्षा वेगळं असण्याचा..
पऱ्यांच्या राज्यात मिळेल मान.

पण मोठे होताच आहे
ते भंगले माझे स्वप्न
पैशामागे धावतो आहे...
मिळवाया रूपरत्न...

आता कळते सोपे नाही..
मिळवणे एखादी परी..
त्यापेक्षा त्या नगरीची 
स्वप्नेच पहावीत बरी....!


सौ.मनिषा राजन कडव

Comments

Popular posts from this blog

३१ डिसेंबर

संगीताचा बदलता प्रवाह आणि आशाताई

व्यक्ती आणि वल्ली.