अबोलीचा गजरा
*अबोलीचा गजरा*
अबोलीच्या फुलांची बहरून बाग आली
त्या भडकपणाची भुरळ मनाला पडली
मी गेले तडक फुलांच्यापाशी
सुंदर गुंफण फुलांची मी तिथेच केली
मन अधीर झाले परिधान कराया तो गजरा
कसर वेणीची... जाईजुई मोगऱ्याची ...
मग अशी भरून निघाली ...
मी तयार झाले आता बायकांत मिरवाया
नववधूसारखी नटले ... पाऊले बावरी झाली ...
जरी नसे सुगंध याच्या ओटीपोटी
रंगात जादू भरली ज्याच्या, ते हे फुल,असे नांव "अबोली "
सख्या - मैत्रिणी साऱ्या जमतील जेव्हा माझ्या
त्यांत मी उठून दिसेन ....
अबोलीच्या फुलांपरी दिसले जरी अबोल मी
कुणी छेडता मला यासमयी ... लाजून चूर होईन ...
किती तरी सुगंधी फुले उमलली अवतीभवती माझ्या
अबोलीच्या फुलांशी अनुबंध असे हा जुनाच माझा
केसरी फुलांचे हसणे दर्शवते शुभ शकुनाला ...
मी भाग्यवान मुलगी ... याचा मला मिळे निर्वाळा ...
सौ. मनिषा राजन कडव
Comments
Post a Comment