म्हणावे कशाला...*

*म्हणावे कशाला...*


धुंदी फुलाची गंधात आहे, आकार नाही म्हणावे कशाला 
गातात पक्षी बागेत माझ्या, सत्कार नाही म्हणावे कशाला...

माळून स्वप्ने येते मी डोळा, कां दंश व्हावा तुझ्या पापणीला? 
दाबून पीडा जगते युगांची, चित्कार नाही म्हणावे कशाला....

सृष्टीत साऱ्या जरी भास त्याचे, करती तमाशा उगा शोधण्याचा
बांधून देऊळ देवास कोंडी, दिशांत दाही म्हणावे कशाला....  

नाहीच जमले जरी आज काही, विषादास थारा देतो  मनी ना 
आशा उद्याची स्वप्नांत वाहे, नाहीच ग्वाही म्हणावे कशाला...


-  सौ. मनिषा राजन कडव

Comments

Popular posts from this blog

३१ डिसेंबर

संगीताचा बदलता प्रवाह आणि आशाताई

व्यक्ती आणि वल्ली.