हितगूज
हितगुज
किलबिलत्या विश्वात या पुस्तकाची कल्पना लहानपणी आईकडून ऐकलेल्या गोष्टी पुढे जशाच्या तशा मुलांना व माझ्या विद्यार्थ्यांना सांगताना सुचली
गोष्ट ही गोष्ट अशी आहे की, लहानापासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच गोष्ट ही वाचायला, ऐकायला अन् सांगायलाही आवडते.
जी गोष्ट काही तरी सांगून जाते, शिकवून जाते, मनोरंजनाबरोबरच काहीसा बोध, काहीसा सांगावा देऊन जाते, ती अन् तशाच गोष्टी ह्या आठवणीत राहतात.
अशाच गोष्टींचा हा एक छोटासा संग्रह. ह्या गोष्टी तुम्हाला आवडतील, अशी अपेक्षा करते.
काय तर मग, वाचणार ना ह्या गोष्टी !
सौ. मनिषा राजन कडव --
Comments
Post a Comment