होळी

होळी

स्वप्नांची पेटते होळी
वेदनांचे तप्त निखारे
मन होरपळून निघत
आगीत नारळा प्रमाणे
भावनांची होते राख
भोवती रिंगण निराशेचे
तरी सूर्योदय घेऊन येतो
नवीन रंग आशेचे
निराश जीवन पुन्हा
नव्याने रंगीत होते
पुन्हा स्वप्न साकारण्यात
मन तल्लीन होते....
       

सौ. मनिषा राजन कडव

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*