वाचन का करावे?*
*
"पुस्तके कशाला वाचायची? पुस्तकी ज्ञानातून कधीही जीवनाचे शिक्षण मिळत नाही"
"इतरांच्या अनुभवातून आणि चुकांतून शिकण्यासाठी पुस्तके वाचावीत! त्या चुका आपण करून नये यासाठी!"
"पण मला स्वत:च्या अनुभवातून शिकायचे आहे. हे जग मोठी अनुभवाची शाळा आहे. चुका करत करत शिकणे मला आवडते! माझे स्वत:चे तत्वज्ञान मी निर्माण करणार! अनुभवातून!"
"मान्य आहे. अरे पण, जीवनातल्या सगळ्याच गोष्टी स्वत:च्या चुकांतून शिकून शिकून त्यातील तत्वज्ञान कळेपर्यंत आपले वय पण वाढत जाते. समजा तुला अनुभवातून शिकत शिकत एखादी गोष्ट समजली पण तोपर्यंत त्या अनुभवाचा उपयोग करण्याचे वय आणि वेळ निघून गेली असेल तर? आणि तुझ्या अनुभवातून आणि चुकांतून तू जो निष्कर्ष काढला तो जसाच्या तसा जर का या आधीच कुणी महान लेखकाने व्यवस्थित पुस्तकरूपात लिहून ठेवलेला असेल तर? तेवढा आपला वेळ नाही का वाचणार? एखादी चूक होण्यापूर्वीच आपण ती टाळू शकणार!"
"पण लेखकाची आणि आपली पार्श्वभूमी, आजूबाजूची परिस्थिती वेगळी असते. लेखकाचे सगळे अनुभव आपल्याला कसे लागू होतील? सांग बरे?"
"अरे! सगळे अनुभव नाही लागू होणार पण काही टक्के तर नक्कीच होईल! पुस्तकातून आपल्याला प्रेरणा मिळते. शेवटी, लेखक हाही एक आपल्यासारखाच माणूसच असतो ना! त्याच्या भावना आणि आयुष्याच्या अवस्था- उदाहरणार्थ - प्रेम, लोभ, मत्सर, सुख, दु:ख, तारुण्य, बालपण वगैरे या आपल्या सारख्याच असतात की! सगळ्या माणसांच्या भावना शेवटी सारख्याच! त्यासंदर्भातील त्याचे अनुभव बऱ्याच प्रमाणात सगळ्या माणसांना लागू होणार नाहीत का? लेखक एलियन थोडेच असतो? माणूसच असतो. आपल्यासारखाच! आलं का लक्षात? आणि पुस्तकातून विचारांना चालना मिळते, आपण विशिष्ट प्रकारच्या संकुचित विचारांतून बाहेर पडून नवनवीन विचार स्वीकारायला शिकतो! आपल्या विचार कक्षा रुंदावतात!
*अवांतर वाचन कसे करावे*
आज जर मुलगा शाळेच्या वित्रिक्त इतर पुस्तक वाचत असेल तर पालक लगेच मुलाच्या हातातील पुस्तक हिसकावून घेऊन त्याला म्हणतात की हे वाचायचे सोडून शाळेचे पुस्तक वाच चार पाच मार्कस जास्त पडतील. ( सर्व पालक असे नसतात )
ज्या प्रकारे एका रोपट्याला खत टाकले की त्याची वाढ होते त्या प्रकारे माणसाची पुस्तके वाचल्या नंतर मानसिक दृष्ट्या वाढ होते.
*आवंतर वाचन म्हणजे*
शाळेच्या पुस्तकां वियत्रिक्त इतर पुस्तके वाचणे ज्या मध्ये आपल्याला रस आहे त्याला अवांतर वाचन म्हणतात.( माझ्या मते)
अवांतर वाचन आपला बौध्दीक शक्ती वाढवण्यासाठी पूरक असते.अवांतर वाचण्यासाठी शांत आणि स्वच्छ जागा निवडावी. अवांतर वाचन आपण बस मध्ये, ट्रेन मध्ये आणि इतर अनेक ठिकाणी आपण अवांतर वाचन करू शकतो.अवांतर वाचण्यासाठी नोट्स तयार करायच्या नसतात.अवांतर वाचन मन लावून केले पहिले.याचा फायदा तुम्हाला नक्की होईल.
अवांतर वाचनामुळे या जगात आपण आपली ओळख बनवू शकतो.या स्पर्धेच्या युगात आपला टिकायचे असेल तर अवांतर वाचन नक्की मदत करेन.
आपण करीत असलेले वाचन अधिक प्रभावी व लाभदायी होण्यासाठी कोणत्या गोष्टी सुचवाल?
फक्त पुस्तक वाचून ठेवले तर त्या वाचनाला आणि पुस्तकाला दिलेला वेळ अगदी वाया घालवल्या सारखं आहे.
तर वाचन प्रभावी आणि लाभदायी करण्यासाठी आपण काही गोष्टी नक्कीच try करू शकतो.
• पुस्तक वाचताना नेहमी आपल्याला आवडलेल्या व महत्वाच्या ओळींना व परिच्छेदांना अधोरेखित करावे.
• पुस्तक वाचल्यावर एका लहान वहीत आपल्याला त्या पुस्तका बद्दल काय वाटले ते लिहावे.
• पुस्तक वाचताना त्यात असलेला सुविचार अथवा काही महत्वपूर्ण ओळी लिहून घ्याव्यात.
• त्या पुस्तकात जर काही आत्मसात करण्यासारखे असेल तर, म्हणजेच जर self -help चे पुस्तक असेल तर त्याच्या प्रत्येक अध्यायानंतर त्यात आपण जी माहिती शिकलो ती अस्तित्वात उतरवण्यासाठी प्रयत्न करावे. याचा नक्कीच फायदा होतो
Comments
Post a Comment