तू

*तू खरंच खूप खास आहेस..*

डोळे मिटून जेव्हा स्वतःला शोधशील, तेव्हा कळेल..
तू खूप खास आहेस...
.
आयुष्य म्हणजे आपल्याला हवं ते मिळवण्यासाठी करावा लागणारा प्रवास आहे..

मग प्रवासात कधी दरी, 
कधी पर्वत..
कधी वादळ,
तर कधी वाळवंट आहे..

कधी ऊन, 
तर कधी मुसळधार पाऊस आहे..

कधी गालिचे, 
तर कधी काट्यांची फौज आहे..

पण नजर लक्ष्यावर असेल, 
तर प्रवास हा एक मौज आहे..!

अशा असंख्य लक्ष्यांची तुझी आस आहे..
डोळे मिटून जेव्हा स्वतःला शोधशील..

तेव्हा कळेल,....
तू खरंच खूप खास आहेस..

वेदनांचे स्वतःचे एक महत्त्व आहे..
त्या सहन केल्यास तरच 
तुझं एक ’अस्तित्त्व’ आहे..

पण जर हार मानून गेलीस..
तर मात्र पराभवाचे प्रभुत्व आहे..

प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर, 
कधी शुभेच्छा, 
तर कधी शिव्या-शाप आहे..

दुर्लक्ष केलंस तर कळेल, तुला तर तुझ्या स्वप्नांचाच इतका व्याप आहे..!

काहीही झाले तरी डगमगू नकोस, तुझ्यात प्रचंड साहस आहे..
.
डोळे मिटून स्वतःला शोधशील तर कळेल..
तू खरंच खूप खास आहेस.



सौ. मनिषा राजन कडव

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*