नंदू हत्तीचे मित्र
नंदू हत्तीचे मित्र
एक नंदू हत्ती एकटा मित्रांच्या शोधात जंगलातून फिरला. त्याला लवकरच एक माकड दिसले आणि त्याने विचारले, ‘माकडदादा, आपण मित्र होऊ शकतो का?’
माकडाने पटकन उत्तर दिले, ‘तू मोठा आहेस आणि माझ्यासारखा झाडांवर डोलू शकत नाही आणि इथून तिथून उड्या देखिल मारू शकत नाहीस, त्यामुळे मी तुझा मित्र होऊ शकत नाही.’
निराश झालेल्या नंदू हत्तीने त्याचा शोध सुरूच ठेवला त्याला पुढे त्याला ससा भेटला सशाला भेेटल्यावर विचारले, ‘आपण मित्र होऊ शकतो का, ससोबा?’
सशाने हत्तीकडे बघितले आणि उत्तर दिले, “तू इतका मोठा आहेस की माझ्या बिळातही बसू शकत नाही. तू माझा मित्र होऊ शकत नाहीस.”
मग, नंदू हत्ती चालत राहिला मग त्याला वाटेत.बेडूक भेटेला त्याने विचारले, "बेडूकराव, तू माझा मित्र होशील का?"
बेडकाने उत्तर दिले, “तू खूप मोठा आणि जड आहेस; तू माझ्यासारखी उडी मारू शकत नाहीस. मला माफ करा, पण तू माझा मित्र होऊ शकत नाहीस.”
वाटेत भेटलेल्या प्रत्पेक प्राण्यांना नंदू हत्ती विचारत राहिला, पण नेहमी सारखेच उत्तर मिळाले. दुसऱ्या दिवशी, हत्तीने जंगलातील सर्व प्राणी घाबरून पळताना पाहिले. काय होत आहे हे विचारण्यासाठी . त्याने अस्वलाला थांबवले व विचारले , वाघ सर्व लहान प्राण्यांवर हल्ला करत असल्याचे सांगण्यात आले.
हत्तीला इतर प्राण्यांना वाचवायचे होते, म्हणून तो वाघाकडे गेला आणि म्हणाला, “महाराज, माझ्या मित्रांना एकटे सोडा. त्यांना खाऊ नका.”
वाघाने ऐकले नाही. त्याने नंदू हत्तीला फक्त स्वतःच्या कामात लक्ष घालण्यास सांगितले.
दुसरा मार्ग दिसत नसल्याने हत्तीने वाघाला लाथ मारली, वाघोबा दूरवर जाऊन पडला आणि वाघाने घाबरवून पळ काढला.ही शूर कथा ऐकून, इतर प्राणी सहमत झाले, "आमचा मित्र होण्यासाठी नंदू हत्ती दादा तुम्ही फक्त योग्य आकाराचे आहात." हे सर्व प्राण्याना आता कळून चूकले होते, की मित्र प्रत्येक आकारात येतात
मु. पो. शिवापूर , कुडाळ
Comments
Post a Comment