आठवणीत उरलेले बालपण
*आठवणीत उरलेले बालपण*
मन धावे माझे
माहेरच्या दारी
तिथेच रहावे
वाटतसे//१//
पायात पडली
लग्नाची बेडी
सुटता सुटेना
घरदार//२//
किती गार होती
माहेरची हवा
इथल्या वाऱ्याला
सर नसे//३//
चिंचोक्यांची डबी
पाटाची गोंदण
भूतकाळी जमा
चौका अष्टा//४//
लगोरी लंगडी
ती हातलावणी
बालखेळाच्या त्या
आठवणी//५//
भांडण झगडे
कित्ती जरी केले
विसरूनी गेले
रागलोभ//६//
बाहुल्यांची गाणी
संपता संपेना
जिव टांगे खाण्या
खिरापत//७//
पिसाट होऊनी
वाटे जावे घरा
बालपण घ्यावे
पुन्हा पुन्हा//८//
सौ. मनिषा राजन कडव
Comments
Post a Comment