स्तब्ध
स्तब्ध
का?कोण? जाणे आज मी स्तब्ध झाले
आसवांचे तुषार आज गालावर आले
आई तूझी आज खुप आठवण आली
तुझ्या जाण्याने हि दुनियाच परकी झाली
तुझ्या जाण्याने तर रूसणेच बंद झाले
हसण्याचे हि खरं वांदे झाले
तुझ्या होती लांब केसांची शेपटी
आता तर तिलाही मी दिलीय सुट्टी
तू तर घेतलीस माझ्याशी कट्टी
म्हणूनच मी ही घेतलीय पुस्तकांशी बट्टी
आई तूझी उणीव कधीच भरणार नाही
पण तू सतत माझ्या सोबत आहेस म्हणून मी ही हार मानणार नाही
सौ. मनिषा राजन कडव
Comments
Post a Comment