स्त्री काय आहेस तू

स्त्री काय आहेस तू...


जिवाश्मांची वसूंधरा तू,
यौवनाची कामिनी तू,
हिमतीची वाघिण  तू
कुळाची स्वामिनी तू...

आकाशी धगधगती सौदामिनी तू,
ओलावून बरसणारी श्रावणी तू,
उन्हात गारव्याची सौमिनी तू,
थंडीच्या शहार्‍यात उबेची दुलई तू...

पतीची अर्धांगिनी तू,
लेकराची माऊली तू,
भावाची पाठराखीण बाहीण तू,
मैत्री जपणारी सखीण तू...

ज्ञानाचा प्रसार करणारी विद्या तू,
स्वरांची सुरेल सरस्वती तू,
शब्दातून जिवंत अशी कविता तू,
साहित्याचे जल वाहणारी सरीता तू...

चंद्राच्या अस्तित्वाला जागणारी पोर्णिमा तू,
चांदण्याच्या सहवासाला भावणारी अमावस्या तू,
आकाशी अस्तित्वातली नक्षत्र वैभवी तू,
 स्वप्नात घेवून जाणारी निद्राणी तू...

तेजस्वी ओजस्वी द्रोपदी तू,
दृष्ट रावण लंका विध्वंसकारणी सीता तू,
सावळ्या कान्ह्याची यशोदा माय तू,
गार्गी मैत्रेयीची वाचा  तू...

शिवबाची जिजाऊ तू,
राणी झाशीची बळकट बाहू तू,
पेशव्यांची आवड मस्तानी तू,
राजयोगिनि अहल्या तू...

पौराणातली आदिशक्ती तू,
प्रभुची नितांत भक्ती तू,
सळसळत्या मावळ्यांची जय भवानी तू,
राक्षसांना बधणारी काली माता तू..

आजच्या युगाची प्रगती तू,
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,
कलेच्या क्षेत्रात नटराजाची मुर्ती तू,
सार्‍यांच्या यशाची किर्ती तू...

तुज वाचून न कुठला जीव,
तुजवाचून ना कुठली नीव,
नमन तुला हे स्त्री शक्ती,
कारणी आजही तुजवाचूनी
ना कुठला इंद्र ना कुठलाच शिव....

ना संपणार तुझे अस्तिव,
ना तू विरळ होणार,
तुझ वाचून हे विश्व आपूले,
किती काळ टिकणार...*


सौ. मनिषा राजन कडव

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*