मामाच्या गावाला निघाली स्वारी* ( मामाच्या गावाला जाऊ या)

*मामाच्या गावाला  निघाली स्वारी* ( मामाच्या गावाला जाऊ या)


मामा माझा ढब्बा ढोल
ढेरी वाढली गोल गोल
रंग शोभे गोरा गोरापान
राजबिंडा चेहरा खूपच छान

मामी माझी खूपच देखणी
मामाची आमच्या लाडाची राणी
मामी खाते हो खूपच भाव
भाच्यांची वाट पाही मामाचा गावं

पडक्या घराचा बनला बंगला
आज्जी मालकीण नाव  सुलोचना
मामाचं कुटूंब कसं अगदी छोटं
भाचे जमता होत किती मोठ

मामाचं गाव खेड्यातलं छान
फळा पिकांनी बहरलेलं रान
मामाच्या रानाजवळ ओढा वाहे
ओढ्याकाठी देवीच मंदिर आहे

खेडेगावात किती किती मज्जा
मामा माझा जसा मौजी राजा
मामी माझी बाई अशी सुगरणी
मुरंब्याची भरली बरणी

गावच्या बोरी, चिंचा न् कैरी
प्रेमळ तिथले सारे शेजारी
मामा आमचा हौशी हो भारी
मामाच्या गावाला निघाली स्वारी !


सौ. मनिषा राजन कडव

Comments

Popular posts from this blog

३१ डिसेंबर

संगीताचा बदलता प्रवाह आणि आशाताई

व्यक्ती आणि वल्ली.