नीलची युक्ती

नीलची युक्ती


रेवा नदीत अनेक विविध जातीच्या लहान मोठ्या जलचर प्राण्यांची रेलचेल होती. एकमेकांवर यांची उपजिवीका अवलंबून होती. नदी वर्षाचे बाराही महिने पाण्याने भरलेली असे . लहान मासे शेवाळ खात. तर मोठे मासे लहान माश्यांना खाऊन आपली उपजिवीका करत असत. यातले मोठे मासे नेहमी छोट्या माशांना तुच्छ लेखत असत. नेहमी मोठमोठ्या वल्गना करत असत. छोट्या माशांना शक्तीप्रदर्शन करून घाबरवत असत. नील नावाचा छोटा मासा हे सगळं रोज पहात असे. त्याला आपल्या या छोट्या माशांबद्दल खूप वाईट वाटत असे. तो नेहमी विचार करत यातून कसं बाहेर पडता येईल . तो नेहमी हा विचार करत असे. असाचं विचार करत करतं तो नदीत फिरत असतानां तो एका मोठया खडकाच्या गुहेत येतो. जी बाहेरून फार अरूंद असते . आणि आतून फार मोठी होती. गुहेत आल्यावर त्याला ही गुहा पाहून आपल्या मुक्तीचा मार्ग मिळाल्यासारख वाटलं आपल्या कुटूंबियांना,मित्रांना एक सुरक्षेच स्थान मिळाल्याचा आनंद त्याला झाला. नील गुहेतून बाहेर पडताना त्याच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता. पण ही गोष्ट त्याने कोणालाही सांगितली नाही. असेच मोठे मासे सारखे त्यांना त्रास देत असत. हे सगळ पाहून एकदा त्याने त्याच्या आजोबांना घेऊन त्या गुहेत गेला. त्याने शत्रुपासून रक्षण करण्यासाठी आपण या गुहेचा वापर कशाप्रकारे करू शकतो ते आजोबांना सांगितले. त्यानंतर दोघेही घरी परतले. आजोबांची त्यांच्या परिवारातील सर्व माशांची सभा घेतली आणि त्यांना सांगीतले शत्रु नेहमीच आपल्यावर हल्ला करून आपल्यावर नेहमीच हल्ला करून आपल्या परीवारातील काही जणांना फस्त करून टाकतात . त्यामूळे आपली संख्या कमी होत आहे. आपल्या परीवाराच्या सुरेक्षेसाठी निलने एक गुहा शोधून काढली आहे. आजपासून आपण त्या गुहेच्या आजूबाजूसच रहाणार आहोत. जेव्हा कधी आपल्यावर शत्रुु माशांचा हल्ला होईल त्यावेळी संरक्षणासाठी या गुहेचा आधार घेणार आहोत. सर्व छोटे मासे हे एकून खुष झाले. त्यानंतर त्यांनी गुहेच्या बाजूला स्थलांतर केले. त्यानंतर जेव्हा कधी शत्रु माशांचा हल्ला झाला. निलने आवाज करताच सर्व मासे गुहेमध्ये गेले. छोटे मासे आरामात गुहेत जाऊ शकत होते. हल्ला करण्याच्या मोठ्या माशाचे तोंड मात्र गुहेच्या मुखाजवळ अडकले. त्याने खुप प्रयत्न करून कशीतरी आपली सुटका करून घेतली. अशाप्रकारे निलने प्रसंगावधान राखून आपल्या शत्रुवर विजय मिळविला. मार्ग शोधला कि आपोआप सापडतो.




सौ. मनिषा राजन कडव
मु.पो. शिवापूर ,कुडाळ

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*