नवी सुरूवात

नवी सुरुवात 


आज असं काय होतय तिचं तिलाच कळतं नव्हतं. सारख उराशी दाटून येत होत. डोळ्यातून पाणी वाहत होत. मधेच हुंदका येत होता. तिने कितीही स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला तरी हे थांबत नव्हत. अशी तर तिला या रोजच्या मरणाची सवय झाली होती. पण आज तिला खुपच असह्य झाल होत. भांड्याच काळ तिच्या सगळं तोंडाला लागल होत . भांडी घासता घासता ती डोळ्यातले अश्रु दंडाने फुसण्याचा प्रयत्न करत होती.
काही अपेक्षा न ठेवता . ती इथे राहत होती. सर्व कामे करत होती. राब राब राबत होती. पण या लोकांनी फक्त मोलकरीन म्हणून तिला वागवल होत. आणी आज तिला घराबाहेर काढणार आहेत. काय चुकलं तिचं. तिच्या काहिच अपेक्षा नव्हत्या कोणाकडून तिला फक्त या घरात आसरा हवा होता. तिला कबूल होत तिच्या बाबांनी केलेली फसवणूक . ती त्याचीच शिक्षा तिथे राहून भोगत होती. खरंतर तिला आता जगण्यात स्वारस्यच राहिलं नव्हत. तिला त्याच्याकडून प्रेम तर मिळालचं नव्हत. तरी पण जगण्याचा एक आधार म्हणून ती त्याच्याकडे पहात दिवस काढत होती. पण आज तेही संपल होत. आज तिच्या बाबा तिला कायमचे माहेरी नेण्यासाठी येणार होते. तिला मनापासून वाटत होत त्याने तिला थांबवाव. ज्याच्यासोबत ती सप्तपदी चालून आली होती. आयुष्याची सुरूवात तीने ज्याच्यासोबत केली. त्याने तिला असं अधांतरी सोडू नये असं तिला वाटतं होत. आज बाबा यायच्या अगोदर ती सगळी कामे लवकर लवकर आटोपण्याचा प्रयत्न करत होती. तरीही कामांना वेग येत नव्हता. तीने आता खळ्यात शेण सारवायला घेतलं होत. तेवढ्यात तिची सवत तिथे येऊन तिच्या अंगावर खेकसते.  
"आता काय झाला ! भरल्या घरात रडाक. कोणाक पोचवतास आता. तिच्या या बोलण्यासरशी मंगलाने, पटापट डोळे पुसायला हात वर केले. आणी शेणाने भरलेले हात सगळे तिच्या गालाला लागले. त्याबरोबर तिने पदरानेच सगळं शेण पुसलं. आता ती बाबांची वाट पहात होती.
  मंगलाचे बाबा तिला घरी नेण्यासाठी आले होते.
तिच्या कपड्यांच गाठोड आणून तिच्या सवतीने तीच्या समोर टाकलं आणी तिला आता सोड आमची पाठ आणि पुन्हा तोंड दाखवू नको. तिचे बाबाही तिच्यावरच खेकसले घे तुझे कपडे आणि चल. ती बाबांसोबत निघाली. पण तिचं लक्ष मागे होत तिला वाटत होत त्याने तिला थांबवाव. पण तो तर तिच्याकडे पाठ करून बसला होता. मेले सगळे पुरूष एकसारखेच असं म्हणत आणी मनाशी शिव्या घालत ती बाबांच्या मागोमाग निघाली. खरतरं तिचा विवाह संस्थेवरचा विश्वास उडाला होता. आज ती खर्‍या अर्थाने एकाकी झाली होती.
तिचा काडीमोड झाला तिच्या नवर्‍याने दुसर लग्न केल तरी ती तिच्या घरात रहात होती. पण आज ती या घराला पारखी झाली होती. तिला दोन लाख रूपये तीच्या बाबांच्या हातात देऊन हाकललं होत. का तर ती अडाणी होती. तस तर तीच शिक्षण सातवी पर्यंत झाल होत. पण तिला निट लिहिता वाचता येत नव्हत. तिच वागणही फार अघळपघळ होत. म्हणजे बोलायला लागली की खूप बोलत असे. नीट राहत नसे. तिचा नवरा चांगला शिकलेला होता. त्याला हिच असं राहण आवडत नसे. तिच्या बाबानी लग्नाच्या वेळी हिच्याबद्दल सगळं खोटच सांगून लग्न ठरवलं होत. त्यामुळे हिच वागणं पाहून हिच्या सासरचे लोक चिडले होते. त्याचच रूपांतर हे घटस्फोट  होण्यात झाल होत. मंगलला घटस्फोट  मान्य नव्हता. पण तिच्या बाबांनी त्याला होकार दिला होता. कारण त्यांना एक मोठी रक्कम मिळणार होती. तिचे बाबा पैशाचे फार लालची होते. एस.टी ने ती दोघ घरी आली. रडून रडून मंगलचे डोळे सूजले होते. ती मनात म्हणत होती. सात फेरे म्हणजे सात जन्म मग हे सात जन्म एवढ्यावरच संपले का? काय मिळवल मी लग्न करून अपमान उपहास. स्त्री जन्मच यासाठी असतो का? माहेरी सासरी स्त्रिच्याच बाबतीत का असा निर्णय घेतला जातो. स्त्रिला काहिच हक्क नाही का? स्वतःचे जीवन स्वतःच्या मनाने जगण्याचा. आता पुन्हा तेच पुर्वीसारखच. ती फार निराश झाली होती. पण जगत होती. दिवस जात होते. ते गूर राखण, चारा कापण,लाकड आणून शेतात काम करण. तिच्या बाबांना काय एक माणूस आयत राबायला मिळाल होत. आणि  वरून पैसेही मिळाले होते. असेच दिवस जात होते. तिच्या चुलत काकाने तिच्यासाठी एक स्थळ आणलं . तो विवाहित होता. त्याला एक मुलगी होती . पहिली बायको या मुलीच्या जन्मानंतर वारली होती. हिला सांगावसं वाटल बस्स झाला आता तमाशा हा. मी अशीच ठिक आहे. पण कोण ऐकणार होत तिचं. स्त्रीला स्वतःची मतं असतात का? स्वतःचे निर्णय घ्यायचे अधिकार असतात का? ती गप्प स्वतःशी विचार करत राहिली. चार दिवसांनी ते स्थळ पाहण्यासाठी घरी आले. यावेळी सर्व सांगून टाकले तीने. उगाच पुन्हा मागची री ओढली जाऊ नये .  तिच्या आयुष्याचा तमाशा होऊ नये असे तिला वाटत होते.त्या व्यक्तीने सर्व ऐकून घेतलं आणि  सांगितलं. तू जशी आहेस तशी मला पसंत आहेस. माझ्या मुलीची फक्त आई हो. मंगलच्या गालावर कळी खुलली. आज ती तीच्या संसारात सुखी आहे . आता त्यांच्या संसारात दुसर फुलही फुललयं. ती लिहायला वाचायला ही शिकलीय. ती आता राहिली  अडाणी नाही.




  
सौ.मनिषा राजन कडव

Comments

Popular posts from this blog

३१ डिसेंबर

संगीताचा बदलता प्रवाह आणि आशाताई

व्यक्ती आणि वल्ली.