आठवणीतल खेड्यातले बालपण*

*आठवणीतल खेड्यातले बालपण*


बालपणीचा काळ सुखाचा
फिरफिरुनी आठवायचा
खेड्यामध्ये बालपण गेले
क्षण न् क्षण अनुभवायचा

शांत सरळ जीवन तिथले
 मुळीच नाही घाई घाई
पहाटेच्या गुलाबी थंडीत
आजी जात्यावर ओवी गाई

अंगणात तुळशीवृंदावन 
आई करिते तुळशीपूजन
 चांदण्यातल्या गप्पागोष्टी
आठवितात मला अजून

विटीदांडू, चेंडूफळी,लगोरी,
आट्यापाट्या,,हुतुतू, कबड्डी 
लंगडी  ,लपाछपी,साखळी
आठवती बालपणीचे सवंगडी

सरले दिन ते आता
आता फक्त आठवणी
दूर दूर गेले घर ते
आता खेड्यात नाही कुणी



सौ. मनिषा राजन कडव

Comments

Popular posts from this blog

३१ डिसेंबर

संगीताचा बदलता प्रवाह आणि आशाताई

व्यक्ती आणि वल्ली.