चार नगरांतले माझे विश्व'*जेष्ठ वैज्ञानिक जयंत नारळीकर यांचे

*'चार नगरांतले माझे विश्व'*

जेष्ठ वैज्ञानिक जयंत नारळीकर यांचे आत्मचरित्र

  (मौज प्रकाशन)



*या आत्मचरित्राला 2014 सालचा 'साहित्य अकादमी पुरस्कार' मिळाला आहे .

*नारळीकरांचे(लेखक) आयुष्य प्रामुख्याने बनारस-केंब्रिज-मुंबई-पुणे या 4 नगरात गेले . या नगरात त्यांना आलेलं अनुभव , त्याच्या आयुष्यात आलेली माणसे , त्याच्या सहवासामुळे लेखक कसे अनुभव संपन्न होते गेले याचे वाचनीय वर्णन ग्रंथात आहे .

*लेखकानी सामान्य जनतेसाठी विविध मासिकात लेख , वैज्ञानिक ग्रंथ आदींचे लिखाण केले आहे .वाचकाला खिळवून ठेवणारी , एखादी वैज्ञानिक संकल्पना सोप्या भाषेत समजावून सांगणारी भाषाशैली याही ग्रंथात दिसून येते .
खगोलसंशोधन व गुरुत्वाकर्षण सारखा अवघड समजला जाणार विषय त्यांनी ग्रंथात अति सोप्या भाषेत मांडला आहे .

*या ग्रंथाची एक जमेची बाजू मला वाटली ती म्हणजे सकारात्मकता .संपूर्ण ग्रंथात कुठेही टीका टिप्पणी नाही , बडेजाव नाही .काही ठिकाणी सुधारणा सुचवायची असेल तर तशी योग्य ती मांडणी केली आहे .

*हे आत्मचरित्रा सह  प्रवासवर्णन आहे कि काय असे वाटत राहते. संशोधन कार्य तसेच कौटुंबिक पर्यटन साठी लेखक विविध देशात भेटी देतात .त्याचेही सविस्तर वर्णन केले आहे .

*पत्रव्यवहार व दस्तऐवजी याची चांगली जपणूक केलेली दिसते .कारण ग्रंथात नमूद प्रत्येक घटनेचे वेळ-स्थळ-व्यक्ती संबंधी सविस्तर वर्णन पदोपदी दिसते .

*वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी त्यांना 'पदमभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .परंतु याचा अहंभाव कुठे दिसत नाही .उलट टप्प्या टप्प्याने मिळत जाणारे यश हे आपल्या हातून मोठे कार्य घडायला हवे याची जाणीव करून देत होते असे लेखक नमूद करतात .

*'आयुका'सारखी संस्था उभारताना स्वतः व सहकार्यांनी घेतलेल्या मेहनती चे वर्णन प्रत्यक्ष वाचण्यासारख आहे .

*जनतेच्या पैशातून आपला संशोधन खर्च निघतो याची त्यांना जाणिव आहे .त्यासाठी जनतेत वैज्ञानिक प्रसार व्हावा या साठी काय काय उपक्रम केले याची माहिती ते वाचकांना करून देतात .

*प्रवाहाच्या विरुद्ध जात आपले संशोधन सुरु ठेवले. ते जरी आज सर्व मान्य नसले तरी भविष्यात संशोधनाला वेगळी दिशा देणारे असेल असा आशावाद ग्रंथाच्या शेवटच्या टप्यात लेखक वक्त करतात .

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*