तु माझा

४४.  तु माझा

माझा तु आहेस म्हणून
म्हणून तुझ्याशी मी भांडते ममातील काही दुःख मी तुझ्या पुढ्यात मांडते
 हुंदका आवरताना माझा 
आवाज कापरा होतो
 कधी रागवते तर कधी उलट बोलुन तुला देत असते
 तु धरला अबोला की मी 
मनात कुढत असते 
तुम्ही समजून घेत जा थोडेतरी प्रेम असुदे तुझेही मजवरी तुझ्यामुळेच ओळख  माझी तुझ्यामुळेच आपली जोडी
नको  धरू अबोला रुसू नको
 हळुच तिरकस रागाने बघू नको तुझ्याशिवाय अपूर्ण मी
दुराव्याने तू वागू नको
तू माझा मी रे तुझी 
जोडी आपली जमली खाशी

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*