३१ डिसेंबर आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे… मागे वळून पाहताना जाणवतं—हे वर्ष केवळ दिवस-महिने नाही तर अनुभवांनी भरलेलं एक मोठं पुस्तक होतं. वर्षाच्या सुरुवातीला किती तरी संकल्प केले होते. काही पूर्ण झाले, काही अर्ध्यावर थांबले, तर काही फक्त मनातच राहिले. पण आज उमगतंय की संकल्प पूर्ण झाले की नाही, यापेक्षा त्या प्रक्रियेत आपण काय झालो—हे जास्त महत्त्वाचं आहे. या वर्षात जे जे लोक भेटले, त्यांचे मनापासून आभार. जे चांगले वागले—ज्यांनी साथ दिली, समजून घेतलं, शब्दांनी किंवा शांत उपस्थितीने आधार दिला—त्यांचे खास आभार. आणि जे तसे वागले नाहीत, ज्यांनी दुखावलं, अपेक्षा मोडल्या—त्यांचेही आभारच. कारण त्यांनी मला अधिक मजबूत केलं, स्वतःला ओळखायला शिकवलं आणि “सगळे आपले नसतात” ही वस्तुस्थिती स्वीकारायला लावली. नात्यांबाबत अनेक इच्छा अपूर्ण राहिल्या. जुन्या मैत्रिणींना भेटायचं राहून गेलं, भावंडांकडे जाऊन मनसोक्त बोलणं राहून गेलं. वेळ होता, पण वेळ देणं राहून गेलं. याचंच थोडंसं दुःख मनात आहे… पण हेही कळलं की नाती मनात जिवंत असली, तरी त्यांना वेळ देणं किती गरजेचं आहे. नोकरीत झालेली बदली—तीही या वर्...
संगीताचा बदलता प्रवाह आणि आशाताई भारतीय संगीतविश्वात काही आवाज असे असतात की ते काळाच्या पलीकडे जाऊनही मनात कायम घुमत राहतात. आशा भोसले म्हणजे असा एक जादुई स्वर—चिरतरुण, बहुरंगी आणि भावनांनी ओथंबलेला. “तुमसे मिलके ऐसा लगा…” हे गाणं जेव्हा कानावर पडतं, तेव्हा मन नकळत एका सुंदर भावविश्वात हरवून जातं. या गाण्यातील त्यांचा आवाज इतका कोमल आणि जिवंत आहे की प्रत्येक शब्द हृदयाला स्पर्श करून जातो. प्रेम, आनंद, हलकासा हुरहूर—या सगळ्या भावना त्या सहजपणे आपल्या आवाजातून व्यक्त करतात. त्यामुळेच हे गाणं माझ्यासाठी केवळ एक गाणं नाही, तर एक अनुभव आहे. आशाताईंचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी झाला. लहान वयातच त्यांनी संगीताची ओढ जोपासली आणि पुढे भारतीय चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचा आवाज केवळ गोड नाही, तर अत्यंत लवचिक आहे. त्यांनी रोमँटिक, भावगीत, गझल, कॅबरे, लोकगीत—अशा विविध प्रकारांमध्ये गायन करून स्वतःची वेगळी छाप उमटवली. त्यांच्या कारकिर्दीतील वैशिष्ट्य म्हणजे त्यांची प्रयोगशीलता. त्या कधीच एका चौकटीत अडकल्या नाहीत. “पिया तू अब तो आजा”, “दम मारो दम”, “चुरा लिया है तुमने” यांसारखी...
व्यक्ती आणि वल्ली. वाचनाची आवड असलेला पण हे पुस्तक न वाचलेला मराठी माणूस शोधुन सापडणार नाही . पु. ल. म्हटलं कि डोळ्यांसमोर उभा राहतो अखंड वाहणारा निर्मल हास्याचा निर्झर. त्यांच्या विनोदी कथांनी लहान मुलांपासून ते थोरा-मोठ्यांपर्यंत सर्वाना वेड लावलंय. जर एखाद्या लेखकाला त्याची शिकवण लोकांपर्यंत पोहचवायची असेल तर त्याला त्याच साहित्य ऐतिहासिक, पौराणिक, स्वातंत्र्यकथा, कविता, विनोद अशा प्रकारच्या साच्यात बसवायची गरजच पडत नाही मुळात. एक यशस्वी लेखक तोच असतो जो कोणत्याही प्रकारच्या साहित्यातून आपले चांगले विचार लोकांपर्यंत पोहचवत असतो. पु. लंच्या व्यक्ती आणि वल्लीनी देखील असच वेड लावलं त्यात फक्त विनोद नाही आहे, तर प्रत्येक व्यक्तीनं आपल्याला दिलेली शिकवण आहे, सामान्य व्यक्ती तर आपण सगळेच असतो, पण आपल्यातही काही माणसं अशी असतात जी कळत-नकळत आपल्याला बरच काही शिकवून जातात. जीवनाचे धडे देतात, नि अशाच व्यक्ती त्यांच्या वेगळेपणामुळे "वल्ली" म्हणून ओळखल्या जातात. अशाच काही वल्लींची शिकवण मी आज आपल्यासमोर मांडतेय. व्यक्ती आणि वल्ली पुस्तकाची हि शिकवणमाला म्हणजे या पुस्तकाचा...
सुरेख ... छान चारोळी 💐💐💐
ReplyDelete