स्त्री मनाचा आरसा - मी पण माझे.

स्त्री मनाचा आरसा - मी पण माझे.


उपवर मुलगी झाली . म्हणजे एकदा उजवलेली बरी  म्हणून स्थळे शोधणे सुरु होते . त्यात करुन बहिणीची मुलगी  म्हणजे लवकरात लवकर जुळलेलं बर . या ध्यासानं जयश्रीला स्थळ सापडतं आणि प्लाइट लेप्टनंट मनोज  पोतनीस यांच्याशी  शुभमंगल होत. इथपासून सुरु झालेल हे कथानक पुढे नाट्यपूर्णरित्या वळण घेत , जे हद्यस्पर्शीच....

कादंबरीचा विषयच वेगळा .भाषासौदर्य तर वाखाणण्यासारखे. वाचता वाचता  वाचकांच्या मनातच ती रुजावी अशी सोपी भाषा . मात्र यात संघर्ष , आक्रोश, आक्रमण , आकांत , आरडाओरड असा प्रकार नाहीच.
लेखक राजेंद्र बनहट्टी यांच्या ओजस्वी लेखणीतून साकारलेली . "मी पण माझे.... ही कादंबरी . त्यांच्या सहजसोप्या भाषेत  माणूस अंतःर्मुख होतो आणि मनाला चटका ही लावून जातो . मात्र  या कादंबरीत जयूच  चित्र रेखाटल आहे. तिच्या व्यक्तीरेखेचा पदर उलगडताना मनाचा  संभ्रम निर्माण होतो . कारण वाचताना पदोपदी  जाणवते ते पुढील घटना  किंवा पुढे काय होईल . ते आपण मनातच ताडतो . आपल्या या कल्पनेला लेखक  धक्का देतो.आपण बांधलेले आडाखे सपशेल चूकतात. कारण या स्त्रीची व्यक्तीरेखा अशी उभी केली आहे.की तिच्या मनाचा तळ  शोधणे कठीण . तिच्या मैत्रिणीनांदेखील या गोष्टीचा सुगावा लागलेला  नाही .

मातूत्व ,स्त्रीत्व , स्वत्व  की त्याच्याही पलिकडचे काही ? परतत्व ?  याच मीपणात घोटाळत राहिली .म्हणूनच  वाचकांवर शेवटचा निर्णय प्रश्नांकित  म्हणून सोपविला आहे असं वाटते .नेहमीच्या चाकोरीतील पण तीला वेगळ स्वरुप देण्याचा  प्रयत्न त्यामुळे  प्रथम पासून शेवटपर्यंत कादंबरी वाचनीय झालेली आहे .  मुखपृष्ठावरील स्वच्छ  सफेद पांढरे फूल आपल्याला मोहात पाडते. आणि त्या मोहापायी आपण  आतील पाने  आपण वाचायला   सुरुवात करतो. 



सौ.मनिषा राजन कडव

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

३१ डिसेंबर

संगीताचा बदलता प्रवाह आणि आशाताई

व्यक्ती आणि वल्ली.