स्त्री मनाचा आरसा - मी पण माझे.
उपवर मुलगी झाली . म्हणजे एकदा उजवलेली बरी म्हणून स्थळे शोधणे सुरु होते . त्यात करुन बहिणीची मुलगी म्हणजे लवकरात लवकर जुळलेलं बर . या ध्यासानं जयश्रीला स्थळ सापडतं आणि प्लाइट लेप्टनंट मनोज पोतनीस यांच्याशी शुभमंगल होत. इथपासून सुरु झालेल हे कथानक पुढे नाट्यपूर्णरित्या वळण घेत , जे हद्यस्पर्शीच....
कादंबरीचा विषयच वेगळा .भाषासौदर्य तर वाखाणण्यासारखे. वाचता वाचता वाचकांच्या मनातच ती रुजावी अशी सोपी भाषा . मात्र यात संघर्ष , आक्रोश, आक्रमण , आकांत , आरडाओरड असा प्रकार नाहीच.
लेखक राजेंद्र बनहट्टी यांच्या ओजस्वी लेखणीतून साकारलेली . "मी पण माझे.... ही कादंबरी . त्यांच्या सहजसोप्या भाषेत माणूस अंतःर्मुख होतो आणि मनाला चटका ही लावून जातो . मात्र या कादंबरीत जयूच चित्र रेखाटल आहे. तिच्या व्यक्तीरेखेचा पदर उलगडताना मनाचा संभ्रम निर्माण होतो . कारण वाचताना पदोपदी जाणवते ते पुढील घटना किंवा पुढे काय होईल . ते आपण मनातच ताडतो . आपल्या या कल्पनेला लेखक धक्का देतो.आपण बांधलेले आडाखे सपशेल चूकतात. कारण या स्त्रीची व्यक्तीरेखा अशी उभी केली आहे.की तिच्या मनाचा तळ शोधणे कठीण . तिच्या मैत्रिणीनांदेखील या गोष्टीचा सुगावा लागलेला नाही .
मातूत्व ,स्त्रीत्व , स्वत्व की त्याच्याही पलिकडचे काही ? परतत्व ? याच मीपणात घोटाळत राहिली .म्हणूनच वाचकांवर शेवटचा निर्णय प्रश्नांकित म्हणून सोपविला आहे असं वाटते .नेहमीच्या चाकोरीतील पण तीला वेगळ स्वरुप देण्याचा प्रयत्न त्यामुळे प्रथम पासून शेवटपर्यंत कादंबरी वाचनीय झालेली आहे . मुखपृष्ठावरील स्वच्छ सफेद पांढरे फूल आपल्याला मोहात पाडते. आणि त्या मोहापायी आपण आतील पाने आपण वाचायला सुरुवात करतो.
सौ.मनिषा राजन कडव
छान पुस्तक परीक्षण 💐💐💐
ReplyDelete