कोसबाडच्या टेकडीवरून परिक्षण
*कोसबाडच्या टेकडीवरुन* *--अनुताई वाघ* (आत्मचरित्र) *ऋचा प्रकाशन* *पाचवी आवूत्ती* :-१ मार्च २००८ *किमंत*:- १६० रुपये " मनाला निराश करुन टाकणाऱ्या सभोवतालच्या परिस्थितीत अनुताईंसारख्या कार्यकर्त्या अशी कुठली प्रेरणा मनात जिवंत ठेवून काम करीत राहतात ते मला कळत नाही . वास्तविक त्यांच्यापुढे आपण कस्पटासारखे आहोत असेच वाटते." या पु.ल .देशपांडे यांच्या मलपूष्ठावरील भावना वाचल्यावर आपण जिज्ञासेने हे पुस्तक वाचू लागतो. १९१० ते १९९२ या कालावधीमध्ये केवळ माणूस म्हणून काल व्यतीत न करता आपल्या आजूबाजूची सूष्टी अधिक सुंदर अधिक बलशाली कशी बनवता येईल यासाठी धडपडणार एक व्यक्तीमत्व म्हणजे अनुताई वाघ आनंदाचे डोही ..आनंद तरंग याब्रीदने अशोक चिटणीस यांनी या पुस्तकात लिहिलेली दीर्घ प्रस्तावना अनुताईंचा जीवनपट अतिशय सहजपणे वाचकांच्या मनाला स्पर्श करुन जातो. वयाच्या तेराव्या वर्षी बालविधवा झालेल्या अनुताई यांच स्वतःच्या आयुष्याच सिंहावलोकनच म्हणाव लागेल . अनुताई आणि ताराबाई मोडक यांच गुरुशिष्याच नातेसंबधातही प...