नमस्कार.🙏🏻
नमस्कार.🙏🏻 प्रभाते करदर्शनम! म्हणत दिवसाची सुरुवात करताना आपल्या दोन हाताची ओंजळ समर्पण शिकवते त्या त्या दिवसाला समृद्ध करत सगळ्या च ऋण आदरभावाने मानत जोडले जातात हात आणि होतो नमस्कार ....!! नमस्कार या शब्दाचा जन्म संस्कृत शब्द नमस्कारातून झाला आहे, ज्याचा अर्थ एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचे आभार मानणे आहे., एका आत्मा ने दुसऱ्या आत्म्याला केलेले अभिवादन ...म्हणजे नमस्कार ....!! जसे एखाद्याची समाजमाध्यमांवर पोस्ट आपल्याला आवडली तर आपण आपल्या भावना नकळत पोहचवत आदर व्यक्त करतो..मनापासून त्या व्यक्तीप्रतीचा आदरभाव हा देखील एक मनस्वी नमस्कारच...व्यक्ती व्यक्ती नुसार बदलत जातो इतकेच भावना समान....तो ही नमस्कार उर्जेचे स्थानांतरणच....एकमेकांना दिलेले चैतन्य आँक्सिजनच....!! आपण जेव्हा समोरच्या व्यक्तीला नमस्कार करतो, तेव्हा त्यामागे असतो त्या व्यक्तीबद्दलचा आदरभाव. त्या व्यक्तीचा एक व्यक्ती म्हणून आपण स्वीकार केला आहे हे दर्शविणारी ती कृती असते. त्याचबरोबर आपल्या आत्मभावाचे समर्पणही त्यात असते. त्यात नम्रता असते, . दुसऱ्याचा आदर, स्वीकार आणि स्वतःचं समर्पण, नम्रता .! ही सगळी ...