Posts

Showing posts from July, 2021

आयुष्यावर विजय - "प्रतिरूप"

Image
आयुष्यावर  विजय -   "प्रतिरूप" आयुष्यावर मिळवलेल्या विजयाची कथा... ‘आय अ‍ॅम अनदर यू’ हे इंग्रजीतील बऱ्यापैकी चर्चा झालेलं पुस्तक. प्रिया कुमार यांच्या स्वत:च्याच अनुभवावर आधारित या पुस्तकाला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचाच स्वाती काळे यांनी केलेला मराठी अनुवाद म्हणजे – प्रतिरूप. प्रिया कुमार आयुष्यातील एक टप्प्यावर काही कारणाने नेदरलॅण्डला गेल्या. त्यांचा तो परदेशप्रवास म्हणजे एकप्रकारे पळवाट होती. प्राप्त परिस्थितीपासून दूर जाण्याची. मात्र ही पळवाट प्रत्यक्षात त्यांच्या आयुष्याचा मार्ग उजळवणारी प्रकाशवाट ठरली. ती कशी, ते कळण्यासाठी प्रतिरूप वाचलं पाहिजे.नेदरलँडला लेखिका स्वशोधाकरिता एकटी जाते. तेथे शमन्स जमातीच्या विधींमध्ये सहभागी होते आणि तेथून तिचा अंतर्मनातील प्रवास सुरू होतो. तिच्या प्रवासात आपण प्रवासी म्हणून कधी सामील होतो, हे कळतच नाही. या पुस्तकात प्रत्येक विधीचे एक प्रकरण आहे. सर्वच विधी अंतर्मुख करायला लावतात. प्रत्येक विधीतून ईश्वरीय सत्य उलगडत जाते. जीवन अनेक शक्यतांचे बनले आहे. सर्वच शक्यतांचा प्रवास आपण करू शकत नाही; पण या पुस्तकाद्वार...

जगाच्या पाठीवर

Image
जगाच्या पाठीवर  श्रेष्ठ मराठी गायक आणि संगीतकार सुधीर फडके यांचे हे आत्मचरित्र आहे. त्यांच्या बालपणापासून त्यांचे पहिले गाणे ध्वनिमुद्रित झाले तिथपर्यंतचा प्रवास यात येतो. सुधीर फडके नावारूपाला येण्याआधी त्यांनी काय संघर्ष केला होता ते आपल्याला यातून दिसतं. घरच्या गरीबीमुळे नातेवाईकांच्या, मित्रांच्या आधारावर जगायला लागलं. उपासमार सहन करावी लागली. उधार-उसनवार करून गाण्याच्या जिवावर आयुष्य सावरायचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. प्रत्येकवेळी नियती मात्र आशा-निराशा, यश-अपमान असे हेलेकावे देत होती. हे वाचून अंगावर काटा येतो.  बाबूजींना एकेकाळी फूटपाथवर राहून दिवस काढावे लागले असतील ही कल्पनाच करवत नाही.  त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध कोल्हापुरात आला. त्या ओळखीतूनच ते मुंबईला आले. संघ कार्यालयातच राहायचे. संघकार्य आणि गाण्याचे शिक्षण घेणे-देणे त्यांनी सुरू केले. पोटसाठी काही मिळवण्याचा झगडा चालू असतानाही संघकार्यात योगदान ते देत होते. पण पुढे संघातील तत्कालीन पदाधिकाऱ्यांशी मतभेद झाल्याने त्यांना संघकार्यालयातून सामानासकट बाहेर काढलं गेलं. आणि त्यांची पुन...

मुलांसाठी गुढकथा - रत्नाकर मतकरी लिखित ‘भूत-अद्भूत

Image
मुलांसाठी गुढकथा  - रत्नाकर मतकरी लिखित ‘भूत-अद्भूत रत्नाकर मतकरी लिखित ‘भूत-अद्भुत’मध्ये मुलांसाठी सहा छोटय़ा गोष्टी (कथा) आहेत. ‘गूढता’ हे या कथांचे केंद्र आहे. माणसांच्या जगातील या अद्भुत कथा आहेत. अमानवी शक्तीला ‘भूत’ म्हटले जाते. त्याचासुद्धा प्रत्यय येणे हे ‘अद्भुत’ आहे. गूढ वातावरणाच्या माध्यमातून गूढकथेतील आशय साकार होतो. मानवी संज्ञेला-बुद्धीला आकलन न होणाऱया ‘वास्तवाचे असणे’ गूढ कथेत साकार होते. त्यात मृत्यूनंतरचे जीवन नियती, योगायोग घटिते, अतिंद्रिय पातळीवरील अनुभव त्यात प्रामुख्याने असतात. भयप्रद, विनाशक स्वरूपातील अतिमानवी शक्तींची अनेक गूढ रूपे भयकथा उभी करते. उदा. नारायण धारपांच्या गूढकथा. तथापि मानवी मनातील दडपलेल्या वासना, इच्छा किंवा समूहाच्या नेणिवेतील अतर्क्य व्यापार मानसशास्त्रीयदृष्टय़ा विचारात घेऊन मानवी मनाच्या गूढ व गुंतागुंतीच्या व्यापारावर आधारलेल्या गूढकथा अधिक्याने रत्नाकर मतकरी यांनी लिहिल्या आहेत. या गूढमानस कथाच आहेत. त्यात ‘भूत-अद्भुत’ अपवाद नाहीत. त्यांच्या कथेत वास्तवाच्या पलीकडे जाणारे असे एक कल्पित वास्तव असते. फॅण्टसी, स्वप्ने, भास या...

बाप नावाची माय

Image
बाप नावाची माय ‘बाप नावाची माय’ हे डॉ. राजेश गायकवाड यांचे आत्मकथन अनेक नाट्यपूर्ण प्रसंग आणि विविध स्वभावधर्माच्या व्यक्तिरेखांनी परिपूर्ण आहे. ही आत्मकथा डॉ. गायकवाड यांच्या वडिलांचे चरित्र आहे. तसेच त्यांच्या गावकुसातील बारा बलुतेदारांचेही अंशत: चरित्र आहे. जमिन विकून मुलांना शिकवणारा अज्ञानी बाप खेडूत असला तरी त्याचे अनुभवाचे शहाणपण अस्सल आहे. लेखकाच्या लहानपणी आईचा मृत्यू होतो. पण त्याच्या वडिलांनी लग्न न करता मुलांसाठी संपूर्ण आयुष्य शिक्षणाच्या ध्यासात समर्पित केले. म्हणूनच लेखक गायकवाड यांना त्यांच्या बापात आईचे दर्शन घडते. या आत्मचरित्राची भाषा परभणी परीसरातील बोली भाषा असल्याने ग्रामीण व्यक्तिरेखांचा जिवंतपणा हुबेहुब चित्रित झालाय. पुढे राजेश गाडकवाड यांची ही जीवनकथा संघर्षानी ओतप्रोत आहे. त्यांचा भौगोलिक प्रवास आणि नोकरीचा प्रवास सिद्ध होताना कोर्ट-कचेऱ्या, संघर्ष, सुख-दु:खाचे अनेक प्रसंग घडतात. त्या सर्वांचे सुंदर व प्रत्ययकारी वर्णन डॉ. गायकवाड यांनी केलेय. काही प्रसंग प्रचंड विनोदी आहेत. जयश्री पाटील या विद्यार्थीनीचा डबा आणणारा नोकर वर्गात येऊन ‘जयश्री गडकर’ ...

सृष्टीसौंदर्यातून साकारलेल्या भावनात्मक बालकथा.

Image
सृष्टीसौंदर्यातून साकारलेल्या भावनात्मक बालकथा. भाषा ही प्रत्येकालाच अवगत असते. मात्र अवगत करण्याची प्रक्रिया ही वेगवेगळी असते. माणसांप्रमाणेच सृष्टीतील मुक्या पशू पक्षांनाही त्यांची भाषा एकमेकांना समजत असते. ते आपापसात भावना व्यक्त करु शकतात. हे संजय ऐलवाड यांनी आपल्या बालकथेतून बालमनाला रंजकपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सृष्टी सौंदर्यातून साकारलेल्या भावनात्मक व संवादात्मक बालकथा आहेत .त्यांच्या प्रत्येक कथा ह्या बालकांबरोबरच मानवीसमुहास नवा संदेश देणाऱ्या आहेत. “बिबट्याचे पिल्लू आणि इतर कथा ” हा त्यांचा नवा बालकथासंग्रह हाच संदेश देणारा आहे. ” बिबट्याचे पिल्लू आणि इतर कथा ” या बालकथा संग्रहात नऊ कथा आहेत. या सर्वच कथातून निसर्ग पशू पक्षांचे दर्शन घडते. संवादात्मक कथा आहेत. अन्न, पाण्यांच्या शोधात बिबट्याचे पिल्लू सोसायटीत प्रवेश करते. जंगलाला नष्ट करण्याच्या माणसांच्या चुकांचे फटके मुक्यांच्या जीवावर कसे बेततात हे पिल्लाच्या आणि सोसायटीत खेळणाऱ्या मुलांच्या संवादातून कळते. छोट्या छोट्या माणसांच्या चुका मुलांना कळायला लागतात. हे या कथेतून लेखकांने सांगण्यांचा प्रयत्न...

पृथ्वीवर माणूस उपराच!

Image
पृथ्वीवर माणूस उपराच! पृथ्वीवर माणूस उपराच! डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी लिखित. हे पुस्तक प्रत्येकाने जीवनात एकदा तरी वाचावे. देव हे खरे तर अंतराळातील प्रवासी. हजारो वर्षांपूर्वी ते एकदा पृथ्वीवर आले अन त्यांनी एक नवा जीव निर्माण केला. त्याचं नाव माणूस! तेव्हापासून हे अंतराळ प्रवासी चांगला माणूस घडविण्यासाठी धडपडत आहेत. दर सदतीस हजार वर्षांनी ते पृथ्वीवर येतात, चांगल्यांना ठेवतात आणि निकृष्टांना नष्ट करतात. एरिक व्हॉन डेनिकेन या झपाटलेल्या संशोधकाने पंचवीस वर्ष प्रयत्न केला आणि लाख मैलांपेक्षा अधिक भ्रमंती करून त्यांच्या वास्तवयाचा मागोवा घेतला. या प्रयत्नात कोट्याधीश व्हॉन डेनिकेन कफल्लक झाला. पण त्याने आपल्या संशोधनावर ग्रंथ प्रसिद्ध केले अन तो पुन्हा कोट्याधीश बनला. परंतु या खटाटोपात मानवाच्या निर्मितीचं रहस्य मात्र उलगडलं नाही. मानवाचं जीवन म्हणजे सतत घेतला जाणारा शोध. या शोधामागं मानवी बुद्धिला पडणारे प्रश्न, निसर्गाबद्दलची जिज्ञासा कारणीभूत आहे. यामुळंच मानवानं आज विविध क्षेत्रात प्रगती केली आहे. क्रमाक्रमानं सृष्टीची गुपितं मानव ोधून काढत आहे; परंतू तरीही अजून सृष्टीची अन...

तप आणि पत यामधील फरक.

तप आणि पत यामधील फरक.  तपाचा अध्यात्मिक  अर्थ :- तप : देह, इंद्रिय व मन यांचे पावित्र्य वा आध्यात्मिक शक्ती संपादन करून त्याच्या योगे मोठे उद्दिष्ट साधण्याकरिता आवश्यक असे श्रम वा कष्टकारक आचरण उदा., उपवास, ध्यानधारणा, इंद्रियसंयम, जप, यात्रा इत्यादी. तप (संस्कृत–तपस्) हा शब्द ‘तप’ म्हणजे तापणे, तापविणे या धातूपासून सिद्ध झाला आहे. अर्थात मूलतः तो उष्णतेचा निदर्शक आहे. वेदांमध्ये उष्णता या अर्थाने जसा वापरला आहे तसा वरील अर्थानेही वापरला आहे. सृष्टी निर्माण करण्यासाठी वा अन्य अभिप्रेत वस्तू संपादण्यासाठी प्रजापतीने तप केल्याचे निर्देश  हिंदू धर्म ग्रंथांत वारंवार आढळतात. उपनिषदांमध्ये तप या शब्दाचा वरील अर्थ स्पष्ट झाला आहे. कोणतेही सत्कर्म दीर्घकाल कष्ट सोसून करणे, असाही तप शब्दाचा अर्थ आहे. कोणतेही ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आत्मशुद्धी करणे म्हणजेही तप होय. ब्रह्मज्ञानासाठी तपाचरणाची आवश्यकता प्राचीन उपनिषदांत प्रतिपादिली आहे. उदा., स्वाध्याय आणि प्रवचन म्हणजे तप होय अनशन तप होय दम, शांती, सत्य, अध्ययन, दान, यज्ञ, उपासना, इ. म्हणजे तपच होय, असे तेथे म्हटले आहे. छांदो...

मेघदूताची मोहिनी!

Image
मेघदूताची मोहिनी!  आषाढाचा पहिला दिवस ! कोणाही साहित्यरसिक माणसाला,"आषाढस्य प्रथमदिवसे.." म्हणले,की पहिल्यांदा आठवते,ते मेघदूत ! मेघदूताची भारतीय मनावरची मोहिनी इतकी जबर आहे,की रवींद्रनाथ टागोर यांच्यापासून ते रिजर्व बँकेचे गव्हर्नर राहिलेल्या,सी. डी.देशमुख यांच्यापर्यंत अनेकांनी,मेघदूत आपापल्या पद्धतीने धुंडाळण्याचा प्रयत्न केला आहे ! शांता शेळके यांनी केलेला अनुवाद तर मनाला भुरळ घालणारा ठरला आहे. संस्कृत श्लोक शांताबाईंनी तितक्याच सुंदर आणि ताकतीने मराठी पद्यात अनुवाद केलेला आहे.हा अनुवाद समजण्यास सोपा आहे. मेघदूत वाचण्याचा आनंद ही वाढत जातो. मुळ मेघदूत वाचत आहोत असे. वाटते. कथा मुळात, मेघदूताला व्यापक कथावस्तू अशी नाही.इंद्राच्या शापामुळे कोणी एक यक्ष एका वर्षासाठी अलका नगरीतून, स्थानभ्रष्ट होतो आणि तेथून तो वर्षासाठी रामगिरी पर्वतावर येऊन राहतो.ज्यावेळेस, आषाढ महिना येतो,त्यावेळेला आकाशात,एक विशाल हत्तीसारखा मेघ पाहून,त्याला आपल्या प्रियेचा विरह अनावर होतो आणि त्यातच त्या मेघाला कुड्याच्या फुलांनी अभिवादन करून,तो आपल्या प्रियेला,निरोप पाठविण्याची विनंती करतो !...

चकवाचांदण - एक वनोपनिषद

Image
चकवाचांदण - एक वनोपनिषद अरण्यात रमलेले, झाडाझुडपात फिरलेले, प्राण्या पक्षांसोबत बोललेले महान व्यक्तिमत्व म्हणजे अरण्य ऋषी मारुती चित्तमपल्ली! सहज सोप्या शब्दांमध्ये त्यांनी आपल्या समोर जंगलच जिवंत उभे केले आहे.... प्राण्यांच्या पक्ष्यांच्या अनेक सवयी आणि आणि आश्चर्यकारक गमतीजमती त्यांनी रेखाटलेल्या आहेत. एखाद्या चित्रकाराने हुबेहूब चित्र काढावे तसे त्यांचे वर्णन! शब्द चित्र जणू! त्यांच्या संदर्भात त्यांनी लिहिलेले, अनुभव संपन्न पुस्तक म्हणजे चकवाचांदण  मराठी भाषेतील ज्येष्ठ लेखक, पक्षीतज्ञ मारुती चित्तमपल्ली यांचं हे आत्मचरित्र.चकवाचांदण हे सुरेख नाव, घुबड या खरं तर अभद्र समजल्या जाणाऱ्या पक्ष्याचे आहे.त्यांनी चुकून(चकवा लागुन)वनसेवेची वाट धरली आणि चालत चालत त्यांना ही आयुष्याची सुंदर वाट सापडली म्हणून हे नाव, चकवाचांदण!..... हे पुस्तक आपण वाचत जातो तसतशी आपल्याला चित्तमपल्ली सर केवळ पक्षीतज्ञ, वनाधिकारीच नाहीत तर हाडाचे संशोधक आणि त्यासाठी अफाट कष्ट करणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे याची साक्ष पटते. आपल्या रोजच्या बघण्यात नसणाऱ्या अनेक अद्भुतरम्य गोष्टींची सफर हे पुस्तक ...

अनब्रेकेबल

Image
अनब्रेकेबल  राष्ट्रीय पातळीवरील १२ सुवर्ण पदकं,   आंतरराष्ट्रीय पातळीवर १७ सुवर्ण, २ रौप्य, २ कांस्य पदके.,  ५ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद., एक ऑलिंपिक कांस्य पदक.... अर्जुन पुरस्कार,   पद्मश्री पुरस्कार,  राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार., पद्मभूषण पुरस्कार   आणि तसेच अनेक वेळा यूथ आयकॉन पुरस्कार विजेती ... ३ मुलांची आई , एक प्रेमळ पत्नी,  आई वडिलांची एक कर्तव्यतत्पर कन्या ... अशी  मांग्ते चुंग्नैजांग मेरी कोम..  भारतीय महिला मुष्टियुद्धाला पडलेले एक सुवर्ण स्वप्नं... मेरी कोम...  यांचे आत्मचरित्र , त्याचा मराठीत अनुवाद  विदुला टोकेकर यांनी केलाय तो  वाचनात आला .  एका स्त्रीला कुठल्याही क्षेत्रात ठसा उमटवण्यासाठी किती झगडावे लागते याची कल्पना सर्वसामान्य लोकांना येणे कठीण.  आणि ते क्षेत्र खेळाचे असेल अजूनच कठीण.  आणि ते क्षेत्र मुष्टियुद्धाचे असेल...कर्मकठीण  कर्मकठीण असले तरी काही व्यक्ती त्यांचा ललाट लेख अशा प्रकारे लिहून आणतात की त्यांनी उपसलेल्या कष्टाचा हिशोब आणि भरपाई नियतीला ...

स्टीफन हॉकिंग

Image
स्टीफन हॉकिंग  स्वतःच्या अपंगत्वावर मात करून एक वेगळं अस्तित्व निर्माण केल्यामुळे जगातल्या लाखो लोकांचे स्फूर्तीस्थान म्हणून" स्टीफन हॉकिंग"यांच्याकडे पाहिले जाते.कष्टाने जगण्याची हिंमत त्यांनी दाखवून दिली.त्यांच्या एकूणच आयुष्याचा थक्क करायला लावणारा प्रवास या पुस्तकात लेखक डॉ.द.व्य.जहागिरदार  अत्यंत समर्पक शब्दात करून दिलेला आहे. "स्टीफन हॉकिंग" यांचा जन्म  १९४२ मध्ये इंग्लंड या ठिकाणी झाला. त्यांचे आई-वडील हे उच्चशिक्षित होते. स्टीफन यांना खेळामध्ये तसा जास्त रस नव्हता. स्टिफन १२ वर्षाचे असताना त्यांच्या दोन मित्रांनी आपापसात पैज लावली होती की,तो आयुष्यात काहीही करू शकणार नाही.परंतु दुसऱ्या मित्राला हे मान्य नव्हतं.वर्गामध्ये पहिल्या  ५ मध्येही स्टिफन याचा नंबर नसायचा.मात्र घड्याळ,रेडिओ कसे काम करतात हे पाहण्याचा त्यांचा उत्साह दांडगा होता. ८-९ वर्ष वयाचे असतानाच आपण भविष्यात काहीतरी मोठे शास्त्रज्ञ व्हावे.असे त्यांना मनापासून वाटायचे.विज्ञानामुळे आपल्याला सत्य समजेल.नुसते घड्याळ, रेडिओ बाबतच नाही तर आजूबाजूच्या सर्व वस्तूबाबत देखील माहिती मिळावी असे ...

माझी ललाटरेषा’

Image
‘माझी ललाटरेषा’ आपली वाटणारी कादंबरी... कुठल्याही परदेशस्थ भारतीय कुटुंबाची गोष्ट तशी आपल्या जिव्हाळ्याची. चारांतील एका घरातील तरुण-तरुणी हल्ली अमेरिकेत स्थायिक झालेले ऐकत असल्यामुळे या परदेशी भारतीयांच्या कथा, व्यथा आपल्या खास परिचयाच्या असतात. भारतातील नातेवाइकांचा गोतावळा, भारतीय लग्नपद्धती आणि अमेरिकेतील मोकळी आचार-विचारसरणी यांतील विरोधाभासही त्यामुळे आपल्याला चांगला ओळखीचा आणि जिव्हाळ्याचा विषय असतो. नफिसा हाजी लिखित ‘द रायटिंग ऑन माय फोरहेड’ या पुस्तकातून एका परदेशस्थ भारतीय-पाकिस्तानी वंशाच्या मुस्लीम परिवाराची गोष्ट उलगडते, तेव्हादेखील हाच जिव्हाळा कायम राहतो. ‘ते आणि आपण’ यांच्यातली साम्यस्थळे वारंवार नजरेत येत राहतात आणि आपल्याच आसपासची गोष्ट असल्यासारखे आपण त्या कथेत गुंतत जातो. भारतीय-पाकिस्तानी वंशाच्या अमेरिकन लेखिका नफिसा हाजी यांच्या या पुस्तकाचा ‘माझी ललाटरेषा’ हा अनुवाद शीला कारखानीस यांनी केला आहे. नफिसा जन्माने अमेरिकन असल्या, तरीही त्यांचे कुटुंब मुळात मुंबईचे. फाळणीनंतर कराचीला स्थायिक झालेले. त्यामुळे त्यांच्या लिखाणात मुंबई आणि कराचीचे संदर्भ डोकावत...

नारायण मूर्ती - 'मूल्य जपणारं एक अद्वितीय आयुष्य’

Image
‘नारायण मूर्ती - 'मूल्य जपणारं एक अद्वितीय आयुष्य’  प्रेरणादायी व मार्गदर्शक जीवनचरित्र... मूळ तमीळ लेखक एन. चोक्कन यांनी ‘नारायण मूर्ती : मूल्य जपणारं एक अद्वितीय आयुष्य’ हा ग्रंथ लिहिला असून त्याचा गुजराती अनुवाद अदित्य वासू यांनी केला आहे व त्याचा मराठी अनुवाद अंजनी नरवणे यांनी केला आहे. ‘नारायण मूर्ती : मूल्य जपणारं एक अद्वितीय आयुष्य’ हे चरित्र मेहता पब्लिशिंग हाऊसने देखण्या मुखपृष्ठासह आकर्षक स्वरूपात प्रकाशित केले आहे. इन्फोसिस या जगप्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनीच्या संस्थापकांपैकी एक आणि देशातल्या प्रमुख उद्योगपतीपैकी एक असणाऱ्या नारायण मूर्तीच्या जीवनाची कथा अलिखित करणारं हे चरित्र! अनंत अडचणीतून मार्ग काढून एखादी व्यक्ती यशाचं शिखर कसं गाठू शकते याची प्रेरणा देणारं व मार्गदर्शन करणारं नारायण मूर्तींचं जीवनचरित्र त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पदर सहजसुंदरतेने उलगडून दाखविते. एका गरीब ब्राह्मण कुटुंबात २० ऑगस्ट १९४६ रोजी नारायण मूर्तींचा जन्म झाला आणि हेच नारायण मूर्ती सध्या इन्फोसिस टेक्नोलॉजीज लिमिटेड या बेंगलोर स्थित जागतिक सॉफ्टवेअर सल्लागार कंपनीचे संस्थापक अध्यक्ष ...

प्लेइंग इट माय वे - सचिन तेंडूलकर .

Image
प्लेइंग इट माय वे - सचिन तेंडूलकर . भारत रत्न आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांचे आत्मचरित्र नुकतेच वाचले . खर म्हणजे आत्मचरित्र हे आयुष्याच्या शेवटच्या वळणावर लिहिण्याची पध्दत जगभर आहे. पण सचिन तेंडूलकर  यांच्या नावा भोवती असलेल प्रचंड  प्रसिध्दीच वलय  यामुळे फार लवकर त्याने हे  आत्मचरित्र लिहिले  सेलेब्रिटी मार्केटच्या दबावामुळे  असेच वाटते . क्रिकेट मधील अनेक नवीन जुन्या घटनांना उजाळा मिळाला .अनेक आजारातून ,घटनांतून त्यांनी मिळवलेले यश ,खेळ आणि कौटुंबिक जीवन सांभाळताना होणारी ओढाताण सुरेख मांडली आहे .फोटोपण छान आहेत ्यातूनही अनेक प्रसिद्ध व्यक्ती भेटतात .बोरीआ मजुमदार हे सहलेखक असून मेहता प्रकाशनने हे आत्मचरित्र प्रकाशित केले आहे .लिटिल मास्टर सचिन तेंडुलकर ने स्वतःच्या शब्दात घेतलेला स्वतःच्या कारकीर्दी चा आढावा. अत्यंत सुंदर पुस्तक प्रत्येकाने वाचावे असे.सचिनची जडणघडण वाचणं हा एक खूप आनंददायी अनुभव ठरू शकतो. सचिननं प्रत्येक वेळी दुखापतींवर केलेली मात, त्याची इच्छाशक्ती, खेळावरचं अतोनात प्रेम आणि कुटुंबाचा भक्कम पाठिंबा या गोष्टी पुस्तक वा...

कथा मारुती उद्योगाची

Image
कथा मारुती उद्योगाची  मूळ इंग्रजी पुस्तक :- The Maruti Story लेखक :- आर. सी. भार्गव(R.C. Bhargav)  सहलेखन :- सीता(Sita) मराठी अनुवाद :- जॉन कोलासो (John Colaco) ८० च्या दशकातल्या भारतात जेव्हा गाडी असणं हे फक्त श्रीमंतांच्य अवाक्यात होतं तेव्हा मध्यमवर्गीयांच्या स्वतःच्या गाडीचं स्वप्न जिने पूर्ण केलं ती म्हणजे “मारुती ८००” गाडी . “मारुती” हे नाव त्यामुळेच सर्वांना सुपरिचित आणि आपलेपणा वाटायला लावणारं आहे. तेव्हापासून आजपर्यंत मारुतीने भारतीय वाहन उद्योगावर आपला दबदबा कायम ठेवला आहे. त्यामुळेच मारुती-सुझुकी हे आजच्या भारतीय वाहन उद्योगातलं अग्रगण्य नाव. तर अशा ऐतिहसिक आणि यशस्वी वाहन उद्योगाची कहाणी म्हणजेच “कथा मारुती उद्योगाची”. आणि ही कथा संगतायत मारुतीच्या जन्मपासून यात सहभागी असलेले आणि कंपनीचे चेअरमन पद भूषवणारे आर. सी. भार्गव माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचं स्वप्न होतं – भारतात गाडी बनवायचं, “जनतेची गाडी” बनवायचं. आणि यातूनच त्यांनी गुरगावला सुरुवात केली मारुती उद्योगाची.(पण त्यांनी याचं नाव “मारुती” का ठेवलं हे गुपितच आहे. क...

तू भ्रमत आहासी वाया

Image
तू भ्रमत आहासी वाया  वपुंचं पुस्तक वाचन म्हणजे एक पर्वणीच. मला काही सांगायचं आहे पण मला शब्दच सापडत नाहीत आणि हे न सापडलेले शब्द म्हणजे व.पु.काळे याचे लेखन. वपुंची प्रत्येक कलाकृती वाचताना याचा प्रत्यय येतो. खरंतर वपुंनी कथेच्या तुलनेत कादंबरी कमी लिहिल्या. त्या काही कादंबरीं मधील एक म्हणजे 'तू भ्रमत आहासी वाया'  प्रेमभंगा नंतर काय? आत्महत्या की आयुष्य निराशेच्या गर्द अंधारात ढकलून द्यायचे? की प्रेमभंग करणाऱ्या प्रियकर/प्रेयसीला गुरू मानून एक नवीन आयुष्य सुरू करायचे. तैसी हे जाण माया| तू भ्रमत आहासी वाया| शस्त्री हाणीतलीया छाया| जैसी अंगी न रूपे|| या संत ज्ञानेश्वरांच्या एका ओवीने प्रेरित होऊन वपुंनी आपल्या आध्यात्मिक चिंतनाला लेखनीची ऐश्वर्यजोड देऊन लिहिलेली व जगण्याचे तत्वज्ञान सांगणारी ही लघु कादंबरी. सायरा, म्हणजेच वपुंच्या लेखणीतून जन्माला आलेली कादंबरीची नायिका.‌ नायिकेला स्वत:च्या प्रेमभंगातून आलेल्या अनुभवातून ती इतरांची आयुष्य कशी बदलते याची ही गोष्ट. खरंतर सायरा ही तुमच्या माझ्यासारखीच एक सामान्य पण तरी ती एक वेगळं रसायन वाटते. तिचे अवलोकन करणारा वाचक तिच...

पुस्तक – यश तुमच्या हातातलेखक – शिव खेरा

Image
पुस्तक – यश तुमच्या हातात लेखक – शिव खेरा You Can Win या जगप्रसिद्ध पुस्तकाचा मराठी अनुवाद म्हणजे यश तुमच्या हातात हे पुस्तक होय . विजेते वेगळाया गौष्टी करत नाहीत तर ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात .उच्च यशप्राप्तीची जिद्द बाळगणा र्यासाठी बहुमोल मार्गदर्शन करणारे हे पुस्तक आहे.  यशस्वी होणं म्हणजे नेमकं काय तर आपल्याला उत्तर देता येईल का? यशाची नेमकी आणि एकच एक व्याख्या करणं तसं अवघड आहे. पण एडविन ब्लिस यांनी यशाची एक व्याख्या केली, जी निश्चितच बऱ्याच जणांना आपलीशी वाटू शकेल. ब्लिस यांच्या मते, यशस्वी होणं याचा अर्थ कधीही अपयश न येणं असा नसून अंतिम ध्येय गाठणं असा आहे. प्रत्येक लढाई जिंकणं म्हणजे यशस्वी होणं नव्हे तर युद्ध जिंकणं म्हणजे यश मिळवणं. यशाच्या सर्वाना पटू शकेल अशा व्याख्येने सुरू होणारे आणि तिथपासून आपल्याला यशाचा नेमका मार्ग ‘आखून’ देणारे पुस्तक म्हणजे ‘यश तुमच्या हातात!’ ज्या-ज्या व्यक्तीला समृद्ध आणि परिपूर्ण आयुष्य जगायची आस आहे, ज्या-ज्या व्यक्ती सकारात्मकतेने जगण्याकडे पाहू शकतात अशा व्यक्तींसाठी हे पुस्तक लिहिले गेले आहे. पण नकारात्मक दृष्टिकोन असल...

आई समजून घेताना

Image
आई समजून घेताना  " आई समजून घेताना" हे उत्तम कांबळे ह्याच पुस्तक वाचनात आले "आई समजून घेताना" ही कथा आहे एका माय-लेकराची आणि एका उपेक्षित समाजाची. आई समजून घेताना आणि जे समजून घेतलं आहे ते शब्दांत व्यक्त करताना आपले शब्द थिटे पडत असल्याची खंत लेखकाने वारंवार व्यक्त केली आहे. तीच अवस्था ह्या पुस्तकाचा मित्रांना परिचय करून देताना माझी होते आहे. लोकशाही मध्ये कायद्यासमोर सर्व समान आहेत, पण समाजव्यवस्थेमध्ये सर्वांना समान हक्क आहेत का हा प्रमुख प्रश्न आहे. लेखकाच्या आईच नाव (इलंदा, लेखकप्रमाणे ती आता संपूर्ण महाराष्ट्राची अक्का झाली आहे) इलंदा ह्या नावाला कोणताही अर्थ नाही. मनुस्मृती वाचल्यानंतर लेखकाला ह्या नाव ठेवण्यामागचा इतिहास समजतो. नाव ठेवताना देखील समाज भेदभाव करतो. पण अक्काने आपल्या मुलांची नाव अर्थ असणारी ठेवली, उत्तम, सुदामा, सुशीला.... लेखकाचे वडील महार रेजिमेंट मध्ये साधे शिपाई. 'आई समजून घेताना' हे उत्तम कांबळेंचे पुस्तक वाचताना आणखी एका आईची ओळख होते. वयाच्या पन्नासाव्या वर्षी आठवणी ताणत लिहिलेले हे पुस्तक. जसे आठवत गेले तसे लिहित गेल्...

लिहावे नेटके' - भाषा, संस्कृती, अनुभूती यांचा समृध्द ठेवा

Image
'लिहावे नेटके' - भाषा, संस्कृती, अनुभूती यांचा समृध्द ठेवा भाषिक संस्कार/व्यवहार आणि त्यांचा एकंदर संस्कृती, अनुभूती वगैरेंवर होणारा दूरगामी परिणाम यांविषयीची ही चर्चा वाचून नुकत्याच हाती आलेल्या 'लिहावे नेटके' या पुस्तकसंचाची आठवण झाली. ज्याला एका भाषेमध्ये विविध प्रकारची अभिव्यक्ती समजते आणि करता येते त्याला या क्रिया इतर भाषांमध्येही करायला जमतात. शिवाय विविध ज्ञानशाखांमधली आपली जाण विस्तारायची असेल आणि त्या विषयांमध्ये नीट व्यक्त व्हायचं असेल, तर भाषा हेच प्रमुख साधन असतं. त्यामुळे भाषेवर किमान प्रभुत्व असणं आवश्यक असतं. पण आताच्या शिक्षणपध्दतीत हे पुरेसं होताना दिसत नाही. त्यामुळे कोणत्याच भाषेत लिहिताना नेमकेपणा, नेटकेपणा नसलेल्या पिढ्या आपल्यासमोर मोठ्या होत आहेत. यावर उपाय म्हणून माधुरी पुरंदरे यांनी मराठी शिकणार्‍या आणि शिकवणार्‍यांसाठी 'लिहावे नेटके' ही पुस्तकं निर्माण केलेली आहेत. पाचव्या-सहाव्या इयत्तेपासून वापरता येतील असे भाषेचे पाठ आणि स्वाध्याय असं या पुस्तकांचं स्वरूप थोडक्यात सांगता येईल. मराठी शिकणार्‍या परभाषिकांनाही ती मदत करतील....