Posts

Showing posts from January, 2023

एकीच बळ

एकिच बळ एका गावात एक वडाचं झाड होत. या झाडावर वेगवेगळे पक्षी आपली घरटी बांधून रहात होते. झाड सदानकदा फळांनी बहरलेलं असायचं. त्यामुळे विविध जातीच्रा पक्षांची सारखी रेलचेल असायची.या झाडावर आणि  झाडाच्या ढोलीत काही किटक पण रहात असत. झाडावरच्या फळांचा आस्वाद घेत असतं.रस्त्याने येणारे जाणारे वाटसरूही सावलीसाठी येथे झाडाखाली आराम करत असत. या झाडाच्या मुळाशी काही मुंग्यांचे वारूळ होते. मुंग्या फार कष्टकरी होत्या.त्या त्यांच्या वारूळातून शिस्तबध्द पध्दतीने बाहेर येऊन आपल्यासाठी लागणारे दाणे ,खाऊ जमा करत असत व  पुन्हा आपल्या वारूळात जात असत. त्या झाडावर एक माकडाचे जोडपे आपल्या लहान पिल्लासह रहात असे. ते माकडाचे पिल्लू फार वात्रट खोडकर होते. त्य्याच नाव होत चिंटू, तो रोज या मुंग्याना जाताना येताना पहात असे. ते पिल्लू स्वतः तर पोट भरण्यासाठी कष्ट घेत नसे. आपल्या आईवडिलांनी आणलेले अन्नच खात असे. पण या मुग्यांची रोजची ये जा अन्न मिळविण्यासाठी चाललेली गम्मत पाहून त्याला त्यांची खोड काढण्याची लहर येत असे. तो इतरांच्याही अशाच खोड्या काढत असे. त्याला असं करण्यात फार गंमत वाटे. त्याची आई त्याला...

वेड करडू

*वेड करडू* एका जंगलाच्या शेजारी एक सुंदर खेडेगाव होतं जंगलाच्या कडेला लागूनच एक शेतकऱ्याचे कुटुंब वास्तव करत होते या शेतकऱ्यांनी गुराढोरांसोबतच कोंबडी व काही बकऱ्याही पाळल्या होत्या यापैकी एका बकरीने दोन करडूंना जन्म दिला होता .यातील यातील शेळीच एक करडू शांत होतं तर दुसरा फार उपद्व्यापी होता .शेळी नेहमी पिल्लांना सांगत असे ही तुम्ही जंगलाच्या दिशेने कधीच जाऊ नका .इथेच खा तिथेच खेळा शेतकरी शेतावर जाताना नेहमी आपल्या घरासमोरच्या कुरणावर या शेळ्यांना चरण्यासाठी सोडत असे .शेतकऱ्याने पाळलेली ही जनावरे सर्व एकत्र खेळत असत. या शेळीच्या पिल्लांसोबत कुत्र्याची पिल्ले व कोंबडीची पिल्ले खेळत असत. पण शेळीच हे दुसरं बाळ फारच मस्तीखोर होतं सारखं इकडे तिकडे जात असे. शेळी त्याला फार समजावत असे की आजूबाजूला जाऊ नको शत्रू असतात. ते आपल्याला हानी पोहोचवू शकतात. पण तरीही हे पिल्लू ऐकत नसे. त्याला जंगलात जाण्याची जंगल पाहण्याची भारी ओढ होती. झाडावर बसलेले पशुपक्षी झाडावर बसलेले पक्षीही त्याला सांगत असतात की तू आईचा एकच जा एकदा काय झालं हे शेळीचे पिल्लू नजर चुकवून जंगलाच्या दिशेने गेलं झाडावर बसलेला कावळा च...

जिद्द

*जिद्ध* जिंकण्याची जिद्द आहे.. तोकडेसे पंख माझे प्राण सुद्धा विद्ध आहे अंतरी माझ्या नव्याने जिंकण्याची जिद्द आहे जाच स्वप्नांना अता माझ्या नको येथे कुणाचा लंघण्या क्षितिजास घेते कौल माझ्या मानसीचा सूर्य घेतो जन्म जेथे तीच माझी हद्द आहे अंतरी माझ्या नव्याने जिंकण्याची जिद्द आहे पंख पसरुनी धरावी सावली या भूतलावर पेलुनी घनभार शिंपावे मृदेवर धुंद अत्तर हे अनाहत विश्व सारे.. मी तयाचा मध्य आहे अंतरी माझ्या नव्याने जिंकण्याची जिद्द आहे पिंजरा तोडून घ्यावी मी भरारी अंतराळी आणि रेखाव्यात रेषा मीच माझ्या भव्य भाळी ईश पाठीशी उभा, मी झुंजण्याला सिद्ध आहे अंतरी माझ्या नव्याने जिंकण्याची जिद्द आहे जिंकुनी घेईन सार्‍या या दिशांना एक हाती मी अहंकारात वा गर्वात ना सोडेन माती मार्ग खडतर खास तरिही ध्येय माझे शुद्ध आहे अंतरी माझ्या नव्याने जिंकण्याची जिद्द आहे - सौ. मनिषा राजन कडव

ओळख

*ओळख* माणसाची ओळख असावी स्वभावातून  पण नसावी नावातून  माणसाची ओळख असावी वागण्यातून  पण नसावी देखणेपणातून  जिद्द असावी दुस-याला हसवण्यात  पण नसावी दु:ख देण्यातून  जिद्द असावी यशस्वीपणे जिंकण्यात  पण नसावी न लढताच हरण्यात  नात्याला ओढ नसावी पैशाची  पण ओढ असावी प्रेमाची  माणसाची ओळख असावी कर्तुत्वातून पण ओळख नसावी आळशी पणातून   माणसाला ओळख असावी गरिबीला साथ देण्यातून  पण ओळख नसावी श्रीमंतीला वंदन करण्यातून !! सौ. मनिषा राजन कडव

मन

*मनाच्या कोर्‍याच्या कागदावर* मनाच्या कोर्‍याच्या कागदावर लपल्यात युगायुगाच्या आठवणी शब्दात न सांगता येणारी मनात दडवलेली गुजगाणी।।१॥ वर्षानुवर्षे लोटतात  कडुगोड अनेक क्षण काही व्यक्त तर काही अव्यक्त राहून जातात मनोमन॥२॥ आठवतात गाबुळलेल्या चिंचा खातानाच्या आठवणी  झाडावरून काढताना कशी झालेली त्वचा केविलवाणी ॥३॥ कापसाच्या म्हातारी मागे धावताना  लागलेली ती टक्कर आणि आई मारेल म्हणून आलेली ती चक्कर ॥४॥  अशा कितीगं मनपटलावर कोरल्या गेल्यात बालपणीच्या त्या करवंदाच्या जाळीगत   आंबट गोड साठवणी॥५॥ सौ. मनिषा राजन कडव

मनाच्या कोर्‍या कागदावर

मनाच्या कोर्‍याच्या कागदावर लपल्यात युगायुगाच्या आठवणी शब्दात न सांगता येणारी मनात दडवलेली गुजगाणी।।१॥ वर्षानुवर्षे लोटतात  कडुगोड अनेक क्षण काही व्यक्त तर काही अव्यक्त राहून जातात मनोमन॥२॥ आठवतात गाबुळलेल्या चिंचा खातानाच्या आठवणी  झाडावरून काढताना कशी झालेली त्वचा केविलवाणी ॥३॥ कापसाच्या म्हातारिच्या मागे धावताना  ती लागलेली ती टक्कर आणी आई मारेल म्हणून आलेली ती चक्कर ॥३॥  अशा कितीगं मनपटलावर कोरल्या गेल्यात बालपणीच्या त्या करवंदाच्या जाळीगत   आंबट गोड साठवणी॥४॥

मनाच्या कोर्‍या कागदावर

*मनाच्या कोऱ्या कागदावर* कोरा कागद कवी मनाचा कोरा कागद जेव्हा रंगतो शब्दांच्या निलाईने अंतरातील उठलेल्या भावनांना उजळवतो आपल्या लेखणीने घेऊन प्रत्येक क्षणा क्षणांना ओळीच्या कडव्यात जेव्हा रचतो शब्दरूपी वाक्याना अर्थ देऊन काव्याच्या रचनेतून साकारतो हळूहळू साकारलेल्या रचनेतून नव्या भावनेची काव्यमूर्ती प्रगटते साहित्य वाचतांना आपल्याशी ती बोलते असे मनोमन जाणवते असा हा कवी मनाचा कोरा कागद रोजच रंगत असतो नव्या रचनेतून न बोलणाऱ्या अंतरातील भावनांना व्यक्त करतो आपल्या शब्द काव्यतून... सौ. मनिषा राजन कडव

नाते युगायुगाचे

*नाते युगायुगांचे* नाते तुझे नी माझे, सांगू नको कुणाला  या धुंद कस्तुरीचा, अनुमान ना जगाला  नाते तुझे नी माझे, एकाच या क्षणाचे  सामावले तयात, सुख सार जीवनाचे  नाते तुझे नी माझे, आहे  युगायुगांचे   त्याला न नाव काही ,या भूतलावरीचे  नाते तुझे नी माझे जणु एक पारिजात  गंधाळल्या क्षणांना मी माळले मनात  नाते तुझे नी माझे,  जन्मास ना पुरावे  भोगून भोग सारे, आत्म्यात ते उरावे सौ. मनिषा राजन कडव

पाऊस

पाऊस सूर्य समुद्र तापवतो आणि काळा ढग भरून येतो त्यात प्रत्येकाचा वाटा असला तरी पाऊस कौतुक घेऊन जातो पावसावरच्या रागाला माझ्या आज काही कारण नाही ओले होत होते मी एकटीच पण माझं भिजणं विनाकारण नाही. सौ. मनिषा राजन कडव *लपवणारा पाऊस....* पाऊस तरीही पडणार होता तिला तसाच रडवणार होता डोळ्यांनी बरसण्याचं कारण हेच, की पाऊस एकट्यालाच भिजवत होता आपण सगळेच कसे पावसात हसू शकतो, रडू शकतो हास्य आपोआप पसरतं आणि रडणं आपण लपवू शकतो सौ.मनिषा राजन कडव *रिमझिम पाऊस* रिमझिम सरीत या, मन वेडे सुपीक व्हावे, आनंदाचे भरघोस पीक, या अंतःकरणावरी डोलावे……. कष्टकरी देहाचे या, मृदेमधी मिसळन व्हावे, पावसाचे काही टिपूस मिळूनी, मृदेवरी त्या वृक्ष फुलावे…. सौ. मनिषा राजन कडव.

वेड करडू

एका जंगलाच्या शेजारी एक सुंदर खेडेगाव होतं जंगलाच्या कडेला लागूनच एक शेतकऱ्याचे कुटुंब वास्तव करत होते या शेतकऱ्यांनी गुराढोरांसोबतच कोंबडी व काही बकऱ्याही पाळल्या होत्या यापैकी एका बकरीने दोन करडूंना जन्म दिला होता .यातील यातील शेळीच  एक करडू शांत होतं तर दुसरा फार उपद्व्यापी होता .शेळी नेहमी पिल्लांना सांगत असे ही तुम्ही जंगलाच्या दिशेने कधीच जाऊ नका .इथेच खा तिथेच खेळा शेतकरी शेतावर जाताना नेहमी आपल्या घरासमोरच्या कुरणावर या शेळ्यांना चरण्यासाठी सोडत असे .शेतकऱ्याने पाळलेली ही जनावरे सर्व एकत्र खेळत असत. या शेळीच्या पिल्लांसोबत कुत्र्याची पिल्ले व कोंबडीची पिल्ले खेळत असत. पण शेळीच हे दुसरं बाळ फारच मस्तीखोर होतं सारखं इकडे तिकडे जात असे. शेळी त्याला फार समजावत असे की आजूबाजूला जाऊ नको शत्रू असतात. ते आपल्याला हानी पोहोचवू शकतात. पण तरीही हे पिल्लू ऐकत नसे.  त्याला जंगलात जाण्याची  जंगल पाहण्याची भारी ओढ होती. झाडावर बसलेले पशुपक्षी झाडावर बसलेले पक्षीही त्याला सांगत असतात की तू आईचा एकच जा एकदा काय झालं हे शेळीचे पिल्लू नजर चुकवून जंगलाच्या दिशेने गेलं झाडावर बसलेला क...

वेड करडू

*वेड करडू* एका जंगलाच्या शेजारी एक सुंदर खेडेगाव होतं जंगलाच्या कडेला लागूनच एक शेतकऱ्याचे कुटुंब वास्तव करत होते या शेतकऱ्यांनी गुराढोरांसोबतच कोंबडी व काही बकऱ्याही पाळल्या होत्या यापैकी एका बकरीने दोन करडूंना जन्म दिला होता .यातील यातील शेळीच एक करडू शांत होतं तर दुसरा फार उपद्व्यापी होता .शेळी नेहमी पिल्लांना सांगत असे ही तुम्ही जंगलाच्या दिशेने कधीच जाऊ नका .इथेच खा तिथेच खेळा शेतकरी शेतावर जाताना नेहमी आपल्या घरासमोरच्या कुरणावर या शेळ्यांना चरण्यासाठी सोडत असे .शेतकऱ्याने पाळलेली ही जनावरे सर्व एकत्र खेळत असत. या शेळीच्या पिल्लांसोबत कुत्र्याची पिल्ले व कोंबडीची पिल्ले खेळत असत. पण शेळीच हे दुसरं बाळ फारच मस्तीखोर होतं सारखं इकडे तिकडे जात असे. शेळी त्याला फार समजावत असे की आजूबाजूला जाऊ नको शत्रू असतात. ते आपल्याला हानी पोहोचवू शकतात. पण तरीही हे पिल्लू ऐकत नसे. त्याला जंगलात जाण्याची जंगल पाहण्याची भारी ओढ होती. झाडावर बसलेले पशुपक्षी झाडावर बसलेले पक्षीही त्याला सांगत असतात की तू आईचा एकच जा एकदा काय झालं हे शेळीचे पिल्लू नजर चुकवून जंगलाच्या दिशेने गेलं झाडावर बसलेला कावळा च...