सांगावेसे वाटले, म्हणून
सांगावेसे वाटले, म्हणून काही पुस्तके आपण एखाद्या प्रदर्शनातून किंवा पुस्तकालयातून विकत घेतो. पुस्तकाच्या कपाटात व्यवस्थित ठेवतो.नंतर वाचू नंतर वाचू करता करता वाचल्याच जात नाही. आपण आपल्याच कामात आणि धावपळीत इतके मग्न होतो की आपल्या आवडत्या लेखिकेचं पुस्तक आपण विकत घेतलंय हे विसरून पण जातो. मग कधीतरी कपाट साफ करताना किंवा दुसरं पुस्तक हुडकून काढताना हे पुस्तक हाती लागतं .आपण त्याला बाहेर काढतो. असली-नसली धुळ झटकतो,आणि चाळता चाळता,वाचता-वाचता इतके रंगून जातो की असं वाटतं, अरे !आतापर्यंत का नाही वाचला आपण हा सकारात्मक प्रेरणा देणारा खजाना? आतापर्यंत आपण का गप्पा मारल्या नाही शांताबाईंशी या पुस्तकातून? 'सांगावेसे वाटले म्हणून' या ललित लेखनाच्या पुस्तकाबाबत अगदी तसेच झाले! केव्हा तरी पुस्तक विकत घेतले आणि आज अनेक वर्षांनी हाती पडल्यावर अक्षरशः अधाशासारखे वाचून काढले. खाली ठेवावेसेच वाटत नव्हते! प्रसिद्ध कवयित्री शांताबाई या पुस्तकात आपल्याशी चक्क गप्पा मारतात. जिव्हाळ्यानं मनापासून काहीतरी सांगतात. आणि तेवढ्याच मन लावून आपण त्या गप्पा ऐकत राहतो. आपली आजी किंवा आ...