Posts

Showing posts from May, 2021

बुद्धांच्या संस्कारक्षम गोष्टी '

Image
' बुद्धांच्या संस्कारक्षम गोष्टी                मुलांच्या संस्काराचा पाया हा मूलत: लहान वयातच रचणे गरजेचे असते. कुंभार ज्याप्रमाणे ओल्या मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुरेख मडक्याची घडण बनवतो अगदी त्याचप्रमाणे लहान वयातच मुलांच्या व्यक्तिमत्वाला आकार देणे गरजेचे आहे. बालपणीच त्यांच्या मनावर संस्कारांचे बीज रोवले तर त्यानुसार त्यांची पुढील वाटचाल यशस्वीपणे योग्य दिशेस चालू रहात असते. आजच्या स्पर्धेच्या युगात अनेक पालकांना कामाच्या प्रचंड व्यापामुळे, मुलांकडे संपूर्ण लक्ष देणे शक्य होत नाही. त्यामुळे मुलांना खेळणी, मोबाईल अशा भौतिक वस्तूंमध्ये गुंतवून ठेवले जाते. मोबाईलचे नाविन्य हे नेहमीच मुलांसाठी आकर्षणाचे केंद्रस्थान राहिले आहे . मोबाईलच्या याच आकर्षणाचे व्यसनात रुपांतर होते आणि यांचे दुष्परिणाम आपल्याला ज्ञातच आहेत. आपल्या मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी सर्वाधिक महत्वाचे आहे की , अतिशयोक्ती, अंधश्रद्धेवर आधारित अशा गोष्टी ज्या मुलांची बौद्धिक ज्ञानाची पातळी खालावतील अशा साहित्यापासून‌ त्याना दुर ठेवणे. मुलांच्या विरंगुळ्य...

हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ' -भालचंद्र नेमाडे*****

Image
' हिंदू:  जगण्याची समृद्ध अडगळ' -भालचंद्र नेमाडे ***** कोण आहे? मी मी आहे. खंडेराव. ह्यावर स्तब्धता. मग मी विचारतो, तू कोण? मी तू आहेस, खंडेराव. .. इथून सुरू होणारी या 'मी' ऊर्फ 'खंडेराव'ची, खरं तर 'मी आणि खंडेराव'ची कथा सांगणारी 'हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ' नावाची कादंबरी आपल्या पुढ्यात पेश करते- तब्बल सहाशे पानांचे एक समृद्ध पाल्हाळ आणि तरीही शेवटी काही तरी राहून गेल्याची, काहीतरी अधुरेच असल्याची एक अस्वस्थ टोचणीही. आपल्या जातीजमातींच्या एकमेकांत अडकलेल्या अपुर्‍या-अधुर्‍या आयुष्यांच्या कहाण्या आणि त्यांचे एकमेकांवरचे, एकमेकांच्या जन्मांनाच संपूर्णत्व देणारे समृद्धसुंदर परावलंबित्वही. हिंदू म्हणून जन्माला आल्याचा, आयुष्यभर तोंडाची चवच बनून बसलेला कडवट विखार आणि या धर्मातल्या कधीही नीट न उमगलेल्या नितांतसुंदर गोष्टींचे मधाळ चवीचे निरूपणही. वारसा म्हणून पदरी पडलेल्या रीतीभातीपद्धतींतला निराशाजनक फोलपणा आणि पूर्वापार, बापजाद्यांपासून चालत आलेल्या अनंत आचाराविचारांतलं सौंदर्य आणि अर्थपूर्ण परिपूर्णपणही. आपल्या जातिव्यवस्थेतल्या सार्‍या...

प्रेरणादायी मृत्युंजय

Image
प्रेरणादायी  मृत्युंजय         शिवाजी सावंत यांच्या लेखणीतुन साकारलेली भव्य दिव्य कादंबरी. लहानपणापासुनच त्यांना महाभारताविषयी असलेले आकर्षण व त्याला असलेली अभ्यास संशाेधनाच्या तपस्येची जाेड यातुन खरतरं मृत्युंजयाचा प्रवास सुरु झाला. मृत्युंजयसाठी सतत सहा सात वर्ष त्यांनी अभ्यास केला. संपुर्ण भारतभर प्रवास करून मनन चिंतनाने ही कथा त्यांनी डाेळस बनविली        खरतर हि सु्र्यपुत्र कर्णाची जीवणगाथा. कुंतीभाेज नगरातुन सुरु झालेली ही गाथा संपते ती कुरुक्षेञावर कितीतरी चित्तथरारक, रंजक, वादग्रस्त आणी दु:खद प्रसंगांनी भरलेलं आणि भारलेलं हाेत कर्णाचं जीवन. अंगराज कर्ण, दानशुर कर्ण, दिग्वीजयी कर्ण,जेॆष्ठ पांडवपूञ कर्ण,महारथी कर्ण,श्रे्ष्ट धनु्र्धर कर्ण अश्या ह्या कर्णावर नियतीने माञ अविरत घाव केले. त्याला सुतपुञ म्हणून जगाने हिनवले, कवच कुंडलांविना शापीत कर्ण म्हणून थाेरांनी त्याला डिवचले पण अशा सर्व प्रसंगांना निर्धारानं तोंड देत, मरणालाही हसत हसत कवटाळनारा हा मृत्युंजय म्हणुनच प्रेरणादायी ठरताे.        शिवाजी सावंतांची...

एक होती सारा

Image
-एक होती सारा  एक होती सारा” अर्थात सारा शगुफ्ता एक पाकिस्तानी कवयित्री अमृता प्रीतम यांच्यामुळे सर्वांना माहीत झाली. बाई म्हणून, कवयित्री म्हणून तिचा जो पाकिस्तानमध्ये छळ होत होता. त्याबद्दल सारा शगुफ्ता अमृता प्रीतम यांना पत्र पाठवते. त्या पत्रांमधून त्यातल्या मजकूरांमधून, कवितांमधून अमृता प्रीतम त्या पत्रांच्या कवितांच्या तुकड्या – तुकड्या मधून साराच्या कवितेची ताकद, तिचे दुःख समजून घेते. तिला जगण्याची उमेद देतात आणि त्या दोघी एकमेकींच्या सख्या होऊन जातात. दोघींना एकमेकीं बद्दल पत्राच्या माध्यमातून संवाद साधल्या शिवाय चैन पडत नाही. ‘आशयघन’ अंकाच्या स्त्री विश्व विशेषांकाचे संपादन करताना संपादक तथा कवयित्री संजीवनी तडेगावकर यांना “मोर आपले पाय बघून रडतो, मी माझी माणसं बघून रडते” ह्या सारा शगुफ्ताच्या ओळी वाचायला मिळतात. तिच्या बद्दल अधिक जाणून घेण्याच्या उत्सुकतेने संजीवनी तडेगावकर सारा बद्दल अधिक माहिती मिळवतात आणि त्यातूनच मराठी वाचकांसाठी ‘एक थी सारा’ हे सारा शगुफ्ताचे अमृता प्रीतम यांनी लिहिलेले जीवन चरित्र आपल्याला मराठीत अनुवादित रूपात ‘एक होती सारा’ वाचायला मिळ...

मराठी साहित्यविश्वाला लाभलेला "प्रेषित"

Image
मराठी साहित्यविश्वाला लाभलेला "प्रेषित"  " प्रेषित " ही विज्ञान कादंबरी मी जेव्हा पहिल्या प्रथम वाचली  तेव्हा नुसती थक्कच  नाही तर पूर्णपणे भारावून गेले होते. इतका की खगोलशास्त्रज्ञ होण्याची मी (दिवा)स्वप्नं पाहू लागले. मला वाटते की डॉ.जयंत नारळीकर यांच्यासारख्या महान व्यक्तींची आपल्या देशाला खूप गरज आहे. नारळीकर केवळ संशोधनातच अद्वितीय नव्हते तर खगोलशास्त्र या विषयावर लोकांमध्ये गोडी निर्माण व्हावी यासाठी मातृभाषेतून समाजाला समजेल अशा भाषेत ( कथा - कादंबरी रुपाने) कित्येक पुस्तकांची देणगी दिली आहे  असो, तर हे सर्व सांगायचा मूळ हेतू जयंत नारळीकर यांच्या 'प्रेषित' या कादंबरीचे अवलोकन करणे हा आहे. 'प्रेषित' ने कित्येक शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनात एक वेगळी दिशा दिली असणार याची खात्री आहे. ज्या मुलांना शिक्षणाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर अशी मार्गदर्शक पुस्तके मिळतात ती मुले भाग्यवान होय. तर 'प्रेषित' ची सुरुवात होते ती अमेरिकेतील जॉन प्रिंगल या एका शास्त्रज्ञाच्या वेगवान प्रवासाने. सायक्लॉप्स टाऊन या अवाढव्य परिसरात जेव्हा जॉन दाखल ...

एका स्त्रीची संर्घषगाथा - नाॅट विदाउट माय डाॅटर"

Image
एका स्त्रीची संर्घषगाथा  - नाॅट विदाउट माय डाॅटर" इराण मध्ये १५ दिवस राहून पुन्हा अमेरीकेला परतू ह्या पतीद्वारे कुराण वर हात ठेऊन दिलेल्या खोट्या अश्वासनाला बळी पडून इराण मध्ये अडकलेल्या आई आणि तीच्या ५ वर्षाच्या मुलीची ही सत्य कथा लिहिली आहे  बेट्टी महमूदी व सहलेखक  विल्यम हाँफर  या दोघांनी याचा मराठीत अनुवाद केला आहे लीना सोहोनी यांनी . इराण या मायभूमीतून एक तरुण अमेरीकेला आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी येतो, आपल्या हुशारीने यशस्वी होऊन अमेरिकेत स्थायिक ही होतो. पुढे तो एका अमेरिकन तरुणीच्या प्रेमात पडतो. निट विचारविनिमय करुन ते ह्यूस्टन मधील मशिदीत लग्न करतात. त्यांचा सुखद संसार सुरु असताना पुढे ते एका गोंडस मुलीला जन्म देतात. तो तरुण म्हणजे डाॅ. सय्यद बोजहोर्ग महमूदी (टोपणनाव मूडी), ती अमेरिकन तरुणी म्हणजे ह्या पुस्तकाची लेखिका बेट्टी महमूदी, आणि त्यांच्या सुखात भर घालणारी जन्मास आलेली ती गोंडस मुलगी म्हणजे माहतोब. मूडी आपली पत्नी बेट्टी आणि मुलगी माहतोब ह्यांना घेऊन फक्त १५ दिवसांसाठी इराण मध्ये आपल्या नातेवाईकांना भेटायला येतो. येथे तो आपली मोठी बह...

छावा"

Image
"छावा" "छावा" या दोन अक्षरातच सर्व सार सामावलंय कादंबरीचं. सिंहाच्या पोटी छावाच जन्म घेतो नि जन्माला आल्यापासून ते अखेरच्या श्वासापर्यंत तो सिंहच राहतो. संभाजीराजे सुद्धा असेच एक सिंहपुत्र होते. ज्या आदरणीय शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र घडवला, मराठ्यांचे नाव देशात उज्ज्वल केले, हिंदवी स्वराज्याचा पाया रचला, त्या मराठी स्वराज्याच्या मंदिरावर महाराजांच्या या पुत्रानं स्वतःच्या कर्तृत्वाने, बलिदानाने सुवर्ण कळस चढवला. या अशा अतिशय सुंदर कादंबरीचा मला आलेला अनुभव आणि त्यातून मी जे काही शिकले तेच आज मी तुमच्यासमोर मांडतेय. शब्दांमध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या समजून घ्याव्यात अशी विनंती करते. संभाजीराजांचा जन्म १४ मे, इ.स. १६५७ रोजी पुरंदर येथे झाला. शिवाजी महाराज आणि त्यांच्या प्रथम पत्नी सईबाई यांचे ते पुत्र. लहानपणीच आईच्या प्रेमाला मुकलेल्या संभाजीराजांना जीवनाचे धडे परिस्थितीनेच शिकवले. प्रत्येक छोट्या-मोठ्या प्रसंगांनी ते काहीतरी शिकत गेले, स्वतःला घडवत गेले. परिस्थितीच्या प्रत्येक तडाख्यातून तावून-सुलाखून निघूनच त्यांच्या आयुष्याचा काळ हा सुवर्णकाळ...

नटरंग

Image
नटरंग  नटरंग म्हणजे कलेचा ध्यास, कलेसाठी तळमळणारा जीव नि याच कलेपायी वेचलेलं जीवन. ग्रामीण भागातील जीवनावर आधारलेली हि कादंबरी म्हणजे एका सामान्य माणसाची कलेच्या संघर्षासाठी असलेली असामान्य कथा.    कथेचा नायक म्हणजे कोल्हापुरातील, कागल गावातील गुणा मांग. जिथे मांगवाडा म्हणजे दरिद्री, दुःखानं गांजलेली, परिस्थितीशी कसबस दोन हात करत पोटापुरतं मिळवणारी लोक राहत तो भाग. अशाच मांगवाड्यात राहणारा, घरादारासाठी कष्ट करत, दुसऱ्यांच्या शेतात राबणारा शेतमजूर गुणा.    आखाड्यात कुस्त्या खेळून मिरवणारा पैलवान वीर, पण सामान्य माणसांमध्ये देखील असामान्यत्व असतंच कि, किंबहुना सामान्य माणसांच्या स्वप्नांना कष्टाची जोड मिळाली कि त्यांची स्वप्न पुरी होतात आणि तीच सामान्य माणसं मग असामान्य म्हणून ओळखली जातात. गरिबी नि हलाखीत जीवन काढलेल्या, साधं-सरळ आयुष्य जगणाऱ्या गुणाचं देखील असच एक स्वप्न असत. आणि ते म्हणजे "तमाशा".    तमाशा म्हणजे एक लोककला. आजच्या काळात जिथे समाज इतका पुढे गेलेला आहे, तिथे सुद्धा तमाशाला नाव ठेवणारे सुशिक्षित लोक आहेतच कि. पण त्या काळातही त...

शोध ' - रहस्यमयी कादंबरी.

Image
' शोध '  -   रहस्यमयी कादंबरी.               खूप वर्षानंतर असे पुस्तक हातात आले . एखादा चित्रपट पुढे सरकतो त्याप्रमाणे अतिशय वेगवान आणि उत्कंठावर्धक अशी ऐतिहासिक तथ्यांवर आधारीत स्व. मुरलीधर खैरनार लिखित 'शोध 'कादंबरी आहे .              छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर १६७० साली दुसरी स्वारी केली व प्रचंड संपत्ती लुटून आणली. ही संपत्ती रायगडावर न्यायची होती. परंतु वाटेत राजांना मुघल सरदारांशी लढाई करावी लागली व संपूर्ण खजिना रायगडावर नेणे शक्य नव्हते म्हणून त्यांनी त्याचे दोन भाग केले. एक भाग स्वराज्यात सुखरूप पोहचला. दुसरा भाग गोंदाजी नारायण या सरदारांकडे देऊन तो नाशिक जिल्हयातील साल्हेरच्या मार्गाने रायगडावर पोहचवावा अशी योजना केली. परंतु गोंदाजी नारायण मुघलांच्या ताब्यात सापडले . सापडण्या अगोदर त्यांनीे खजिना कोठेतरी लपवून ठेवला.(बागलाण ,सातमाळा भागात हा खजिना असल्याच अजून समज आहे.त्यावर आधारीत ही कादंबरी आहे )खजिना हरवल्याची हकिकत ज्यांना माहीत होती त्यांनी वेळोवेळी या संपत्तीचा शोध नाश...

आठवणीत राहणारा - 'गोट्या’

Image
आठवणीत राहणारा  - 'गोट्या’  ‘गोट्या’ हे पात्र ना.धो. ताम्हनकर यांनी ते शब्दचित्र रेखाटले तेव्हाच मराठी रसिकांच्या मनावर ठळकपणे छबी उठवून गेले होते. मुलांच्या मराठी वाचनात ‘गोट्या’ला अग्रस्थान असे.  १९४० च्या दशकात टीव्ही सोडाच रेडिओही दुर्मीळ होता. सुशिक्षित माणसे त्यांचा वेळ वाचनात घालवत. तरुण-तरुणींसाठी आणि प्रौढांसाठीही विविध प्रकारचे वाङ्मय सहजतेने उपलब्ध होत असे. मात्र लहान मुलांसाठी फारसे काही वाचण्यास उपलब्ध नसे. तशा परिस्थितीत 'खेळगडी' नावाचे मासिक सुरू झाले. ते भा.ल. तथा काका पालवणकर यांनी चालवले होते. त्याच मासिकातून 'गोट्या' मालिका नियमितपणे अक्षरसाहित्य रूपात प्रसिद्ध झाली. ताम्हनकर यांनी गोट्याची व्यक्तिरेखा अकृत्रिम शैलीत साकार केली होती. 'गोट्या' हा मुलगा बघता बघता सर्वसामान्य घरातलाच एक होऊन गेला. खरे तर, तो कोणाच्याच घरातला नसतो. तो अवमानित जिणे जगत असताना एकुलती एक सुमा नावाची मुलगी असलेल्या एका कुटुंबाला सापडतो. ते ‘दादा-वहिनी’ गोट्याला घरी आणतात. सुमाला तर भाऊ मिळतोच पण त्याचबरोबर महाराष्ट्रातील तमाम मुलामुलींना त्यांच्या हक्क...

धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी 'ताई मी कलेक्टर व्हयनू '

Image
धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी 'ताई मी कलेक्टर व्हयनू ' या पुस्तकात एका सामान्य कुटुंबाततील श्री.राजेश पाटील  हा  विद्यार्थी कसा IAS पदापर्यंत पोहोचतो,यासंदर्भात त्यांनी केलेली धडपड याचे यथार्थ वर्णन त्यांनी या पुस्तकात केलेले आहे. सुरुवातीला सामान्य खेड्यातील कसे वातावरण, राहणीमान, त्यांचे वर्तन याविषयी वर्णन केले आहे.           ते त्यांच्या आईला 'ताई' म्हणत आणि वडिलांना 'अण्णा'.. आपल्या परिवाराची परिस्थिती सुधारण्यासाठी, परिस्थिती शी त्या दोघांनी केलेले दोन हात लेखकाने पुस्तकात मांडले आहे. गावात असलेल्या शेतकऱ्यांची किती नाजूक परिस्थिती असते तसेच तो वेळोवेळी कसा तो सावकार, बी-बियाणे खरेदी दुकानदार तसेच व्यापाऱ्यांच्या कडून कसा नाडला जातो, अडचणीत ओढला जातो.. प्रसंगी गहाण ठेवलेली शेती कशी सावकारच्या घशात जाते हे अशोक व तुकाराम यांच्या उदाहरणासहित वर्णन केलेले आहे.. शेतकरी खोट्या प्रतिष्ठा जपण्यासाठी लग्न, बारसे, तेरावा, गावजेवान असे विविध धार्मिक कार्य मोठा खर्च करून साजरे केल्याने कसा कर्जाच्या जाळ्यात ओढला जातो व शेवटी त्याची शे...

सारांश शून्य

Image
सारांश शून्य या पुस्तकांचे मनोगत व्यक्त करताना लेखक संजय कळमकर  म्हणतात की, ' अनेक शिक्षकतज्ञ वेगवेगळ्या प्रकारचे लेख लिहून शिक्षणात अमूक बदल झाला पाहिजे, शिक्षकांने तमूक केले पाहिजे, असं सांगून मोकळा होता. बहुतेक वेळा तो शिक्षण पद्धतीवर टिका करतो. परंतु सुधारण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे हे मात्र सांगत नाही.' लेख लिहिणं, चर्चासत्रात मोठ्या मोठ्या गप्पा मारणं, सल्ले देणं वेगळी गोष्ट आहे. परंतु प्रत्यक्ष वर्गावर जाऊन शिकवणं ही वेगळं आहे.  याचे समर्थ करताना लेखक म्हणतो की, ' पहिलीच्या मुलांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्षमतेचा अभ्यास करून त्यावर लेख लिहिणारा प्रत्यक्ष पहिलीच्या वर्गावर दहा मिनिटे सुध्दा टिकणार नाही. बाराखडीतील अमुक एक अक्षर लिही असं सांगेपर्यंत तर एखादं पोरगं चड्डीत शू करते तेव्हा अशा अचानक आलेल्या संकटाला फक्त शिक्षकच तोंड देऊ शकतो.' या पुस्तकात लेखकाने अगदी शिक्षणमंत्र्यापासून ते जिल्हा परिषदेत शिपाई म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीच्या कामाच्या पद्धती, त्रुटी व उपाययोजना सुचविल्या आहेत.  या पुस्तकाचा हिरो आहे 'नारायण जगदाळे' नावाचा एक ...

क्रौंचवध

Image
क्रौंचवध स्वातंत्र्य पुर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील शेती, शेतकरी स्थिती व त्यांची अवस्था..      वाल्मिकी कोणी बनाव....?       [क्रौंचवधकादंबरी यातील श्रमिक व शेतकरी]             (काळ बदला पण शेतकऱ्यांच्या रूपाने होणारे क्रौंचवध थांबले नाहीत ...)  मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः|यत्क्रौञ्चमिथुनादेकमवधीःकाममोहितम्ः ||             क्रौंचपक्षाचे एक जोडपे आनंदाने झाडावर प्रणयक्रीडा करित बसले होते. एका पारध्याने बाणाने त्यातले नर पाखरू मारले. ते मरून खाली पडल्यावर जोडीदारणीने जो आक्रोश केला,तो वाल्मीकी ऋषींच्या ह्र्दयाला जाऊन भीडला. वाल्मीकीचा शोक अनावर झाला.व वरील श्लोकाच्या रूपाने प्रगट झाला. एका पक्षीणीच्या दुःखाने त्या महर्षीचे अंतःकरण व्याकुळ झाले. खरी कला अशीच सह्रदय असते. जगातले कुठलेही दुःख तिला पाहवत नाही. उत्तर रामायणातील या काव्यात्मकतेचा आधार घेऊन वि. स. खांडेकर यांनी "क्रौंचवध" ही कादंबरीची निर्मिती केली.              ...

परीघ - स्ञीयांसाठी संदेश

Image
परीघ  -  स्ञीयांसाठी संदेश पुस्तक नेहमीप्रमाणे कौटुंबिक आहे ही कादंबरी. माणसाची विशेषत: स्त्रियांची नाती आणि त्यातून दिसणारे स्त्री स्वभावाचे विविध पैलू हे वैशिष्ट्य आहे ह्या कादंबरीचं. सुधा मूर्ती इतकं सविस्तर वर्णन करतात आणि प्रत्येक गोष्ट इतकी उलगडून सांगतात की त्याचा प्रभाव नक्कीच राहतो. तसं बघायला गेलं तर अगदी साधी कथा पण वास्तव दर्शन घडवणारी. "लिहायला माणूस काहीही लिहू शकतो किंवा लेखक वेगळा माणूस वेगळा" असं त्यांच्या बाबतीत बोलणंच नको. कारण उत्तम निरीक्षण आणि मानवी जीवनाचा दांडगा अनुभव आहे. या लेखिका सुधा मुर्ती यांच्या कादंबरीचा सुंदर अनुवाद उमा कुलकर्णी यांनी केला आहे.  कथेची नायिका मृदुला सर्वसामान्य स्त्रीचे प्रतिनिधित्व करते. खेडेगावात राहणाऱ्या, सरकारी शाळेची शिक्षिका असणाऱ्या, ह्या सुंदर तरुणीचं लग्न संजय नावाच्या एका हातात व्यंग असलेल्या डॉक्टरशी होतं आणि पुढे त्यांचा संसार कसा सगळी संकटं पार करून बहरतो हे तर प्रत्येक घराचं चित्र, पण प्रत्येकाची केस वेगळी कारण प्रत्येकाची तत्व, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा. प्रत्येक दाम्पत्याची एकमेकांशी ज...