Posts

Showing posts from August, 2021

भाषा समृद्ध करणारी कविता : शब्दांची नवलाई

Image
फोटो स्त्रोत गुगल - भाषा समृद्ध करणारी कविता : शब्दांची नवलाई मराठी भाषा ही इतर भाषेच्या तुलनेत वेगळी असून ती अलंकाराने नटलेली आहे. शब्दसौंदर्य आणि अर्थसौंदर्य हा या भाषेमध्ये गोडवा निर्माण करतो. याचा योग्य वापर व प्रयोग करून कवी एकनाथ आव्हाड यांनी शब्दांची नवलाई या कवितेतून आपली मातृभाषा कशी समृद्ध होत जाते आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.   एकनाथ आव्हाड यांचे बालसाहित्य लेखनासाठी मोठे योगदान असून त्यांचे ‘बोधाई’, ‘गंमत गाणी’, ‘अक्षरांची फुले’, ‘हसरे घर’, ‘मज्जाच मज्जा’, ‘तळ्यातला खेळ’, ‘पंख पाखरांचे’, ‘आभाळांचा फळा’, ‘खरंच सांगतो दोस्तांनो’ हे बालकविता संग्रह, ‘मजेदार कोडी काव्यकोडी’ संग्रह, निष्फळ भांडण, ‘राजा झाला जंगलाचा’, ‘थेंबे थेंबे तळे साचे’, ‘जरा ऐकून तर घ्या’, ‘आनंदाची बाग’, ‘एकदा काय झालं’ हे बालकथासंग्रह, ‘नव्याने बहरावे’, ‘बालकोश’, ‘बालनिसर्गायन’, ‘प्रिय हा भारत देश’ हे इत्यादी पुस्तके प्रकाशित झाले आहेत. चैत्रेय, टाँनिक, बालनिसर्गायन चे संपादन त्यांनी केले असून बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात त्यांच्या कवितेचा समावेश झाला आहे. बालभारतीच्या अभ्यासक्रम समित...

सांजवात

Image
फोटो स्त्रोत गुगल - ‘सांजवात’ आनंदीबाई शिवराम शिर्के जन्मदिनांक : ३ जून १८९२ मृत्युदिनांक : ३१ ऑक्टोबर १९८६.      ‘सांजवात’ या आत्मचरित्रामुळे मराठी साहित्यात मानाचे स्थान मिळवणार्‍या आनंदीबाई शिवराम शिर्के या शंभर वर्षांपूर्वीच्या काळातील एक मान्यवर लेखिका होत. ज्या काळात स्त्री-शिक्षणालाच समाजाचा मोठ्या प्रमाणात विरोध होता, त्या काळात खानदानी मराठा कुटुंबातील या स्त्रीने आपली सुधारक मते ठामपणे मांडली आणि दृढपणाने ती अमलातही आणली.      आनंदीबाई म्हणजे पूर्वा-श्रमीच्या अनसूया गोविंदराव शिंदे. त्यांचा जन्म मुंबईतील चिंचपोकळी येथे झाला. त्यांचे मूळ गाव होते पुणे जिल्ह्यातील मंचर तालुक्यातील रांजणी, पण आजोबा व्यापारानिमित्त चिंचपोकळीला स्थायिक झाले होते. त्या काळच्या प्रथेप्रमाणे त्यांचा बालविवाह झाला नव्हता. वयाच्या अठराव्या वर्षापासून त्या लेखन करू लागल्या होत्या. ‘मराठा मित्र’मध्ये त्यांची ‘बेगम आरा’ ही कथा प्रकाशित झाली, त्या वेळी ‘मराठा मित्र’चे सहसंपादक शिवराम शिर्के यांच्याशी त्यांचा परिचय झाला. त्यातूनच दोघांचा पत्रव्यवहार व नंतर स्नेह वाढल...

ऋतुचक्र'

Image
             'फोटो स्त्रोत गुगल - ऋतुचक्र' ऋतू म्हणजे सृष्टीला त-हे त-हेने बदलवणारा काळाचा अगदी छोटासा भाग. दुर्गाताई भागवतांंचे 'ऋतूचक्र' वाचल्यानंतर आजूबाजूला बघण्याची आपली दृष्टी बदलून जाते. दरवर्षी त्याच त्याच क्रमाने आसंमंतात होणारे तेच तेच बदल, केवढे विस्मयकारक असतात, हवा, पाणी, झाडे, पाने, फुले, नद्या-नाले, प्राणी, पक्षी, किटक आणि आपणसुद्धा याच निसर्गचक्राचा एक भाग आहोत हे अतिशय सुंदर पद्धतीने आपल्या लक्षात येते.  वर्षारंभीच्या चैत्र महिन्यापासून सुरुवात करून फाल्गुन संपता संपता पुन्हा चैत्राची ओढ लागण्याच्या काळापर्यंत या कालचक्राची अतिशय सुंदर सफर लेखिकेने आपल्याला घडवली आहे. ऋतू बघण्यासाठी रानावनात जाण्याची गरज नाही, तर सजगपणे मनाचेही डोळे सतत उघडे ठेवले, तर आपण अगदी रंगून जाऊ अशा बऱ्याच गोष्टी घडताना, बदलताना आणि या बदलातून पुढच्या ऋतूचे संकेत देताना आपल्याला समजतात. ही समज येणे फार सुखद असते. ऊन, पाऊस, थंडी, आणि त्या त्या ऋतूमध्ये येणारी फुले, फळे, भाज्या आणि आणखी थोडेफार, यापलीकडे आपण ऋतूंच्या बाबतीत जास्त जात नाही. ऋतुचक्...

एका कोळीयाने

Image
फोटो स्त्रोत गुगल - एका कोळियाने लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे यांचे "The old man and the sea" हे गाजलेले पुस्तक. १९५२ मध्ये प्रकाशित झाले, १९५४ सालचा पुलित्झर पुरस्कारही याला मिळाला. जगातील अनेक भाषांमधे भाषांतरे झाली.  मराठीचे सौभाग्य असे, की मराठीत भाषांतर करण्यासाठी याला लाभले साक्षात् आपले पु. ल. अगदी छोटेसे पुस्तक आहे. पण हातात घेतले , की संपवल्याशिवाय खाली ठेवलेच जात नाही, इतके जबरदस्त आहे. मूळ पुस्तक, त्याचा विषय, मांडणी आपल्याला खिळवून ठेवतेच, आणि भाषांतरकारालाही जागोजागी दाद देत आपले वाचन चालते. भाषांतरित पुस्तकाचे नावच "म्हातारा आणि समुद्र" असे सरळ न ठेवता "एका कोळियाने" असे आहे. ही मराठीतली कविता ज्यांना माहित आहे, त्यांना पुस्तक वाचल्यावर पटेल, की याहून समर्पक नाव या कथेसाठी असूच शकत नाही.  क्यूबामधील समुद्रावर मासेमारी करण्यात आयुष्य गेलेला एक खूप म्हातारा कोळी- सँटियागो, याची ही गोष्ट.  सलग ८४ दिवस समुद्रावर जाऊनही एकही मासा न मिळाल्याने अपयशी असा शिक्का बसलेला तो, त्याच्यावर पूर्ण विश्वास असलेला, त्याची काळजी घेणारा त्याचा मदतनिस एक ल...

साद घालतो कालाहारी

Image
फोटो स्त्रोत गुगल - साद घालतो कालाहारी सन 1974 च्या दरम्यान मार्क आणि डेलिया ओवेन्स हे अमेरिकी दाम्पत्य आपले घर आणि त्यातील वस्तू विकून थोडे पैसे उभे करतात . आफ्रिकेतील कालाहरी वाळवंटात वन्यजीवांच्या संशोधनासाठी जातात .सुरुवातीला पैशाचे फार पाठबळ नसताना आपले वन्यजीवांवरील संशोधन सुरू करतात .वाळवंटातील हा एकाकी भूभाग तोपर्यत मानवी स्पर्शापासून दूर होता .अनंत अडचणी सोसून तेथे सात वर्षे दोघेही राहतात .या प्रवासादरम्यान बर्याच चांगल्या वाईट प्रसंगाचा अनुभव त्यांना आला. ते सर्व वाचतांना वाचकांना त्या वातवरणात रममाण होऊन एक वेगळं विश्व अनुभवल्याचा आनंद मिळतो. जंगलामधे एक तंबु ठोकुन थोडक्या वस्तु घेऊन उदरनिर्वाह करायचा. सिंह आणि कोल्हे यांचा अभ्यास करतांना अनेक थरारक प्रसंगांचा सामना करायचा. कधी सिंह अगदि ४-५ फुटापर्यंत जवळ येऊन उभे आहेत तर कधी डेलिया ऐकटी असतांना रात्री सिंह तंबुला घेराव घालुन धुडघुस घालताहेत. कधी जोराचा पाऊस येऊन सबंध तंबु वाहुन गेलेला आहे तर कधी जीवनावश्यक वस्तुंची निर्माण झालेली कमतरता आहे. अचानकपणे हजर होउन जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारा मित्रसुध्दा आहे. क...

नारायण मूर्ती - 'मूल्य जपणारं एक अद्वितीय आयुष्य’

Image
. फोटो स्ञोत गुगल. ‘नारायण मूर्ती - 'मूल्य जपणारं एक अद्वितीय आयुष्य’  प्रेरणादायी व मार्गदर्शक जीवनचरित्र... मूळ तमीळ लेखक एन. चोक्कन यांनी ‘नारायण मूर्ती : मूल्य जपणारं एक अद्वितीय आयुष्य’ हा ग्रंथ लिहिला असून त्याचा गुजराती अनुवाद अदित्य वासू यांनी केला आहे व त्याचा मराठी अनुवाद अंजनी नरवणे यांनी केला आहे. ‘नारायण मर्ती : मूल्य जपणारं एक अद्वितीय आयुष्य’ हे चरित्र मेहता पब्लिशिंग हाऊसने देखण्या मुखपृष्ठासह आकर्षक स्वरूपात प्रकाशित केले आहे. इन्फोसिस या जगप्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनीच्या संस्थापकांपैकी एक आणि देशातल्या प्रमुख उद्योगपतीपैकी एक असणाऱ्या नारायण मूर्तीच्या जीवनाची कथा अलिखित करणारं हे चरित्र! अनंत अडचणीतून मार्ग काढून एखादी व्यक्ती यशाचं शिखर कसं गाठू शकते याची प्रेरणा देणारं व मार्गदर्शन करणारं नारायण मूर्तींचं जीवनचरित्र त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पदर सहजसुंदरतेने उलगडून दाखविते. एका गरीब ब्राह्मण कुटुंबात २० ऑगस्ट १९४६ रोजी नारायण मूर्तींचा जन्म झाला आणि हेच नारायण मूर्ती सध्या इन्फोसिस टेक्नोलॉजीज लिमिटेड या बेंगलोर स्थित जागतिक सॉफ्टवेअर सल्लागार कंपनीचे...

काबूल-कंदाहारकडील कथा

Image
फोटो स्ञोत गुगल - काबूल-कंदाहारकडील कथा “प्रतिभा रानडे” हे नाव पाकिस्तान, काश्मीर या संदर्भातल्या लेखांमध्ये वाचले होते. पण त्यांचे पुस्तक पहिल्यांदाच वाचले. लेखिकेने स्वतः अफगाणिस्तानात वास्तव्य केले होते. त्याकाळात त्यांना अफगाणिस्तान आणि अफगाणी समाजजीवन जवळून पहायला मिळाले. त्याच्याच कथा या पुस्तकात आहेत.७० च्या दशकात कम्युनिझमचा आणि रशियाचा प्रभाव अफगाणात वाढत होता. रशियाला हवा तसा अफगाणिस्तान घडावा म्हणून रशियन तंत्रज्ञ आणि पैसा अफगाणात ओतला जात होता. रस्ते, रेल्वेमार्ग रशियाला सोयीचं सोयीचे बनवले होते. त्याला काटशह म्हणून अमेरिका आणि इतर युरोपियन देशही अफगाणला तशीच मदत करत होते. पण त्यातून विकास होतच नव्हता. अफगाणला खेळणं म्हणून वापरलं जात होतं. त्यातूनच राजसत्ता उलथवून टाकण्यात आली. आणि सुरू झाले अस्थैर्याचे राजकारण. एका नेत्याला हटवून-मारून दुसऱ्याने सत्ता काबीज करायची. जुन्या सत्ताधीशाला भांडवलशाही, भ्रष्ट, देशद्रोही ठरवून त्याच्या समर्थकांना तुरुंगात टाकायचं, ठार करायचं हा नेमच झाला. परकीय शक्तींचं राजकारण आणि अस्थीर वातावरणात आपल्याच देशात निर्वासितासारखे जीवन अफ...

चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियान- एक शोधयात्रा’

Image
(सदर फोटो गूगल वरून घेतला आहे) ‘चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियान- एक शोधयात्रा’ माथा ते पायथा या जल व्यवस्थापनाच्या कामामुळे चित्तेनदीचा पूर व होणारी जमिनीची धूप यावर नियंत्रण मिळाले. नदीकाठच्या विहिरींचा भूजल पातळीत लक्षणीय वाढ झाली. खोऱ्यांतील गावांची टँकर मुक्ती, भूमिहीनांना रोजगाराची उपलब्धी, दुष्काळमुक्तिकडे दमदार वाटचाल, पिण्याच्या पाण्याच्या भटकंतीवर पूर्णविराम, शिवारात वाढती जलसमृद्धी हे लक्षणीय बदल घडून आले. राजेश प्र.लेहेकर ‘चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियान: एक शोधयात्रा’ हे पुस्तक संतोष लेंभे यांनी लिहिले आहे. ‘सर्वांसाठी पाणी’ या पुस्तकातील ‘लोकसहभागातून जलव्यवस्थापन’ या विषयाचे जमिनीवरील प्रगटीकरण म्हणजेच ‘चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियान’ होय. ग्रामविकास संस्थेचे सचिव नरहरी शिवपुरे यांच्या पुढाकारातून औरंगाबाद शहरापासून 12 किमी अंतरावरील चित्ते नदीखोऱ्यात हे अभियान राबविण्यात आले आहे. खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात माथा ते पायथा या क्रमाने जलसंधारणाच्या व जलव्यवस्थापनाच्या माध्यमातून चित्ते नदीचे पुनरुज्जीवन करण्यात आले. 6 फेब्रुवारी 2015 पासून या कार्यात या कामाला प्रत्यक...

पाणी प्रश्नांवर उत्तरे सुचविणारे पुस्तक. - सर्वांसाठी पाणी वेध पाणी प्रश्नांचा

Image
फोटो गुगलवरून घेतला आहे पाणी प्रश्नांवर उत्तरे सुचविणारे पुस्तक. - सर्वांसाठी पाणी वेध पाणी प्रश्नांचा ‘क्रियेवीन वाचाळता व्यर्थ आहे हे संतवचन आहे. अनेक विद्वान वेगवेगळ्या विषयांवर पांडित्यपूर्ण विवेचन करत असतांना आपण बघत असतो. परंतु विचारांना प्रत्यक्ष कृतीची जोड असेल तरच तो विषय खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांच्या हृदयाला हात घालू शकतो. त्यांना कार्य करण्यास प्रवृत्त करू शकतो. असाच एक प्रयत्न ग्रामविकास संस्थेचे सचिव नरहरी शिवपुरे यांनी पाणी व्यवस्थापन या विषयावर आधारित ‘सर्वांसाठी पाणी – वेध पाणी प्रश्नांचा’ व ‘चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियान- एक शोधयात्रा’ या दोन पुस्तकांच्या प्रकाशनाच्या माध्यमातून केला आहे. शिवपुरे यांनी ग्रामविकास संस्थेच्या माध्यमातून पाणीप्रश्नावर लोकचळवळ उभी केली. त्याद्वारे गेल्या 24 वर्षात प्रामुख्याने औरंगाबाद जिल्हा तसेच जालना, लातूर, नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात जलसंधारण व्यवस्थापनाच्या माध्यमातून मोठे काम उभे केले. ‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीनुसार स्वानुभवाच्या आधारावर पाणी प्रश्नांच्या सर्वंकष आढावा घेऊन त्या वरील समस्या, आव्हाने व उपाय या...

आपण सारे अर्जुन

Image
फोटो स्ञोत गुगल -- आपण सारे अर्जुन ‘माणूस परमेश्वराची सर्वोत्कृष्ट निर्मिती’ - व. पु. काळे यांच्या ‘आपण सारे अर्जुन’ या पुस्तकातील हे पहिले वाक्य. सहजगत्या निसटलेल्या या वाक्यातून माणूस उलगडायचा अयशस्वी प्रयत्न, तरीसुद्धा त्यालाच चिकटून राहून घसट करून कोण माझा आणि कोण माझा नाही असं गणत पुन:पुन्हा मांडूनही नापास होणारा तो माणूस. खरं तर माणूस म्हणजे एक कोडं! आणि एक माणूस एकदाच हे तर महाकोडं. माणूस जन्म घेतो तो एकटाच आणि शेवटपर्यंत एकटाच राहतो; पण आयुष्यभर नात्यांमध्ये लपेटून वावरतो. माणूस माणसाला ओळखतच नाही. अगदी माझी माझी म्हणवणारी माणसं जेव्हा केसानं गळा कापतात, तेव्हा रक्ताचा एक टिपूसही न येता रक्तबंबाळ होणं म्हणजे खरा खून! कोण, केव्हा, का, कधी, कुठे, कुणाशी कसा वागेल? सांगता येतच नाही. उरतात ते प्रश्न निरुत्तरीत. एका प्रश्नानं तर गीतेचा जन्म झाला. श्रीकृष्णाला रणागंणावर गीता सांगावी लागली; पण अर्जुनाला समजतच नव्हतं. प्रश्न, प्रश्न आणि पुन्हा प्रश्न. गुरुवर्य व्यासांनी महाभारात लिहिलं. व.पु.च्या मते तो ग्रंथ इतका परिपूर्ण आहे की त्यानंतर काहीच लिखाण झालं नसतं. तरी चाललं अस...

प्रिय पहिला पाऊस ...

प्रिय पहिला पाऊस ... माझं पहिलं प्रेम पावसावर आहे. त्यातल्या त्यात पहिल्या पावसावर आहे. पहिला पाऊस आला की एखादा लहानपणीचा बालमित्र ब-याच दिवसांनी भेटावा असं वाटतं. हवाहवासा दोस्त भेटल्यावर जो आनंद होतो, तोच आनंद मला पहिला पाऊस आल्यावर वाटतो. पहिल्या प्रेमातलं पहिलेपण आणि पहिल्या पावसातलं पहिलेपण हे जो पावसावर प्रेम करतो त्यालाच कळेल. त्यासाठी मात्र पावसावर मनापासून प्रेम करायला हवे. कुणाला सकाळच्या कोवळ्या उन्हात फिरायची हौस असते, तर कुणाला रात्रीच्या दाट चांदण्यात फिरायची हौस असते, तर कुणाला संध्याकाळच्या गार हवेत फिरायची हौस असते. मला मात्र पहिल्याच पावसात भिजत-भिजत भटकायची हौस आहे. कारण पहिला पाऊस येतो तो कोवळ्या उन्हातल्यासारखा गारांचा अंगणात सडा घालीत. जेव्हा पहिलाच गारांचा पाऊस अचानक येतो तेव्हा रात्रीचं आभाळ चांदण्यासकट अंगणात उतरल्याचा भास होतो. मग आनंदाच्या भरात मी वेडयासारखा ती गारांची फुलं पाऊस अंगावर झेलीत वेचत असतो, परंतु गारांच्या कळ्या फुलून त्याची मातीवर फुलं होऊन ती कधी मावळून जातील याचा नेम नसतो. म्हणून पहिल्या पावसातला आनंद गार फुलांसह मी अंगावरच झेलतो. एक लिंबू झेलू...

कोरोनाला पत्र

कोरोनाला पत्र सुरुवात कशी करू .... कोरोना तुला प्रिय कसं म्हणावं? पाहूणा म्हणून आलास आणि ठाण मांडून बसलास.पाहूण्यांची पाठ पाहायची सवय आम्हाला आहे,लाट पाहायची नाही. असं काही नांव असेल,असा काही रोग असेल असं वाटल ही न्हवतं.तूला नैवेद्य ही वेंटिलेटर, ऑक्सिजन सिलेंडर, रेमडेसिवर चा लागतो. तू त्सुनामी प्रमाणे अचानक आलास,जगावर राज्य करायला. अस्तित्वाचा प्रश्न येतो तेव्हा माणसें हतबल होतात. सेन्सेक्स खाली आणणारा, अनेकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान करणारा, मोठ्या स्पर्धा रद्द करणारा, अनेक व्यवसाय धोक्यात आणणारा, राष्ट्रप्रमुख यांचेही दौरे रद्द करायला लावणारा, तू जगभर आपले साम्राज्य प्रस्थापित करत आहेस. सर्व मानवजात देवानंतर तुझाच विचार करत आहे.देऊळ बंद करणं सोपं आहे.माणसें स्वतःला बंद करून घेत आहेत.माणसांनी उत्स्वही बंद केले. सामाजिक अंतर नाही तर मानसिक अंतर ही माणसं ठेवायला लागली.चेहऱ्याविना मुखवटेच सगळं ठरवतात. Man proposes,God disposes. आता हे चित्र बदलले आहे. Man proposes Corona disposes. हे खरंच आहे. आधी केलेले नियोजन लोकांना रद्द करावा लागंत आहे.१२० देश लाखो लोकांना लागण,हजारो मृत्यू असे त...

‘फॉर हिअर ऑर टू गो?’

Image
‘फॉर हिअर ऑर टू गो?’  पन्नास वर्षांपूर्वी महासागर ओलांडून अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या मराठी माणसांची वेधक कहाणी... अनेक गाजलेल्या इंग्रजी पुस्तकांचे मराठीत अर्थपूर्ण, सरस अनुवाद केलेल्या आणि अरुंधती रॉय यांच्या ‘द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ या कादंबरीच्या मराठी अनुवादासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेल्या अपर्णा वेलणकर यांचे पहिले स्वतंत्र पुस्तक ‘फॉर हिअर ऑर टू गो?’ इंग्रजी भाषा आणि संस्कृती यांचा प्रभाव पचवून आपल्या भाषेला टिकवून ठेवणे, परक्या संस्कृतीशी खुलेपणाने संवाद साधणे, परकी संस्कृती स्वीकारलेल्या भारतीय आप्तस्वकीयांशी संवादाचा सेतू बांधणे हे साध्य करून लेखिकेने प्रस्तुत पुस्तकात १९६०च्या दशकात उत्तर अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या मराठी माणसांच्या देशांतराचा अध्या शतकाचा सांस्कृतिक पट समतोल आणि विवेकी पद्धतीने मांडला आहे. स्वत:ची भाषा, संस्कृती आणि मूल्यव्यवस्था यांच्याशी एक गंभीर नाते असणाऱ्या तिसऱ्या जगातील या पत्रकार स्त्रीच्या पहिल्याच ‘स्वतंत्र’ पुस्तकात तिने जागतिकीकरण आणि बहुसांस्कृतिकता यांचे भलेबुरे परिणाम अनुभवलेल्या आणि तरीही आपल्या देशाशी, संस्कृ...

गप्पागोष्टीं’

Image
‘गप्पागोष्टीं’ मिरासदारांची हसवा-हसवी... कथा वाचता वाचता खळखळून हसण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर द.मा.मिरासदार आणि त्यांची पुस्तकं हा चांगला पर्याय आहे, हे पुन्हा एकदा ‘गप्पागोष्टीं’मधील कथा कुणी तरी ज्येष्ठानं आपल्या सहकाऱ्यांना, आपल्याभोवती असणाऱ्यांना, सांगाव्यातइतक्या सहजपणे लिहिल्या असल्याने त्या खरोखरच ‘गप्पागोष्टी’ वाटतात. कथासंग्रहातील ‘माझा कै. वृत्तपत्र व्यवसाय’ या पहिल्याच कथेतील नायक पत्रकारितेतील करिअर कशा प्रकारे संपुष्टात येतं याचं वर्णन करतो. वृत्तपत्र व्यवसायात असणाऱ्या प्रत्येकाला जवळची वाटावी अशी ही कथा. रुपया गडगडल्याची बातमी संपादकांनी सांगितल्यानंतर या तरुण पत्रकारासमोर उभं राहिलेलं चित्र, बजेटची बातमी करण्यासाठी बजेट घेऊन येऊन ते बातमी करेपर्यंतची कथा वाचून अगदी हसूनहसून पुरेवाट होते. घसारा निधी, चलन, फुगवटा, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष कर यांच्या पत्रकाराने केलेल्या व्याख्या तर किती हसावं आता असं होऊन जातं. ‘ड्रॉइंग मास्तरांचा तास’ या कथेत चित्रकलेचे शिक्षक आणि त्यांनी घेतलेली इतिहासाची उजळणी आहे. मास्तरांचे कुंजपुरा, बारभाई, पानिपतची लढाई याविषयीचे ‘ज्ञान’ ...

बेलभंडारा

Image
बेल भंडारा. लेखक, डॉ.सागर देशपांडे यांनी अवघ्या ३६६ पानांत हा अनोखा बेल-भंडारा अतिशय मनोभावे आणि अद्भुत रित्या उधळला आहे. हा बेल-भंडारा आहे…राजमाता सुमित्रा राजे भोसले यांनी गौरविलेल्या ‘शिवशाहिरा’च्या आठवणींचा ! हा बेल-भंडारा आहे… छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र ब्रह्मांडा पल्याड पोहोचविण्याचा ध्यास घेणाऱ्या ‘शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे’ या ऋषितुल्य इतिहास संशोधकाच्या आठवणींचा !!! या बेल-भंडाऱ्याचं मळवट प्रत्येक भारतीयानं आपल्या कपाळी मोठ्या अभिमानाने मिरवावं असंच आहे. ‘बाबासाहेब पुरंदरे’ हे नाव आज महाराष्ट्रालाच काय संपूर्ण देशाला सुपरिचित आहे. त्यांच्या उत्तुंग कार्याची पावती म्हणून त्यांना सरकारने तसेच अनेक खाजगी संस्थांनी पुरस्कार देऊन सन्मानित केलेलं आहे. तर असं हे व्यक्तिमत्त्व ‘घडतं’ कसं हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांच्याच मनात असते. बाबासाहेबांनी स्वतःचं चरित्र लिहावं यासाठी त्यांना अनेकांनी अनेकदा विनवलं. त्यात अनेक दिग्गजांसह अगदी पु.ल.ही आहेत. परंतु बाबासाहेबांनी फारसं कधी मनावर घेतलं नाही. ते फक्त आणि फक्त शिवमय होऊन राहिलेत. पण या पुस्तकाच्या निमित्ताने डॉ....

इंदिरा

Image
इंदिरा                                                इंदिरा नेहरू गांधी... आपल्या वादळी व्यक्तिमत्त्वाने भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात छाप पाडणार्या पोलादी महिला. 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांच्याच अंगरक्षकांनी त्यांची हत्या केली. त्यांनी आपलं जीवन जसं व्यतीत केले. अगदी तसाच मृत्यू त्यांना प्राप्त ाला. माणसांच्या गर्दीत असूनही शेवटी एकाकीच! एका महानाट्याचा, एक आयुष्याचा हा असा महाभयंकर शेवट झाला. ज्या युगात भारतीय राष्ट्रवादाने जन्म घेतला त्याच युगात इंदिरांजींचा जन्म झाला. त्यांचे पिता जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना ’क्रांतीचे अपत्य’ म्हणून संबोधले. शरीर मनाने कणखर अशा इंदिराजींनी स्वातंत्र्योत्तर भारतातील राजकारणात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावायची आहे. हे मुळी विधिलिखितच होते. एकेकाळी शरीरप्रकृतीने नाजूक व स्वभावाने लाजाळू व अंतर्मुख असलेल्या इंजिराजींनी एकदा राजकारणातील ही आपल्यावर पडलेली जबाबदारी स्वीकारली त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिले न...

भोवळ

Image
भोवळ                                                         देशात आर्थिक उदारीकरणाचे धोरण १९९१च्या जुलैमध्ये आल्यानंतर लगेच १९९२ मध्ये देशातील शेअर बाजारच नव्हे, बँकिंग उद्योगाला, रिर्झव्ह बँकेला आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेलाच हादरून टाकणारा रोखे घोटाळा घडला. हर्षद मेहता नावाच्या अतिहुशार शेअर दलालाने देशातील बँकिंग उद्योगतील कच्चे दुवे, नियामक यंत्रणांचा ढिसाळपणा, सरकारचा गलथानपणा आणि लालूच, लाचलुचपतीला बळी पडणारे अधिकारी, राजकीय पुढारी यांच्या 'कमजोरी'चा पुरेपूर गैरफायदा उठवून, 'सिस्टिम' पूर्णत: 'एक्स्प्लॉइट' करून 'झटपट अब्जाधीश' बनण्याचा आपला खेळ साधला. नंतर याच खेळात तो पुरता अडकून संपलाही. या 'सिक्युरिटीज स्कॅम'च्या पार्श्वभूमीला कादंबरीचा विषय बनविण्याचे यशस्वी कसब ज्येष्ठ पत्रकार, लेखक हेमंत देसाई यांनी दाखविले आहे. 'भोवळ' ही त्यांची पहिलीच कादंबरी नेमकी याच विषयावर आहे. या 'स्कॅम'चा सर्वाधिक फटका बसला तो सामान्य माणसालाच. देशातील ब...

व्हिन्सेंट व्हान गॉग

Image
व्हिन्सेंट व्हान गॉग आयर्विंग स्टोन लिखित, माधवी पुरंदरे यांनी अनुवादीत केलेले व्हिन्सेंट व्हान गॉगचे चरित्र. असं म्हटलं जातं की,कलाकार व महान व्यक्ती ह्या विक्षिप्त असतात,म्हणून त्या यशस्वी होतात.हा गुणंच त्यांना यशस्वी ठरवतो.परंतु ह्या गोष्टी असत्य आहेत. प्रत्येक व्यक्तीत विक्षिप्तपणा सापडतो,म्हणजे ते कलाकार किंवा महान व्यक्ती असतात का? मुळीच नाही. कलाकार किंवा महान व्यक्ती जिद्दीच्या व ध्येयवेडाच्या  जोरावर यशोशिखरावर पोहचत असतो.याचीच जाणीव व्हिन्सेंट व्हान गॉगचे चरित्र वाचल्यावर झाली. व्हिन्सेंट व्हान गॉग एक डच चित्रकार होता.ज्याला जीवनभर फक्त उपेक्षाच दान म्हणून मिळाली.गॉगच्या आयुष्याचा शेवट ही खूप शोकात्मक झाला. गॉग सुरुवातीला चित्रविक्रेता. सुस्वभावी,प्रेमळ,लाजाळू,व्यक्ती. गॉगचं पहिलं प्रेम उर्सुला.तिनंही गॉगला उपेक्षाच दिली. उर्सूलाला पाहण्यासाठी गॉग कित्येक मैल चालत असे.पण उर्सुलाने दाद दिली नाही. प्रेमभंगच्या दुःखात गॉगने चित्रविक्रेत्याची नौकरी गमावली.      येथूनच त्याच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं.  गॉग शिक्षक झाला,पण तिथेही त्याला उप...

"नाथ हा माझा"

Image
"नाथ हा माझा" शब्द अपुरे पडावे अशी बुद्धिमत्ता, सौंदर्याने लाजावे असे राजबिंडे रूप, कलेने पायाशी लोळण घ्यावी अशी अभिनय क्षमता..भारदस्त आवाजाची देणगी लाभलेले नाव एव्हाना आपल्या लक्षात आलेच असेन डॉ. काशिनाथ घाणेकर... निळ्या डोळ्यांची जादू कशी झाली ते सांगत आहेत त्याच्या पत्नी कांचन काशिनाथ घाणेकर...  "नाथ हा माझा.. या पुस्तकासाठी... खूप दिवसांपासून डॉ. काशिनाथ घाणेकरांबद्दल चर्चा सुरु होतीचं त्यांच्या जीवनपटावर आधारित चित्रपटामुळे....पण त्यांना अधिक जाणून घेण्यासाठी"नाथ हा माझा " उत्तम पर्याय आहे... डॉ. काशिनाथ घाणेकर एक असा अभिनेता ज्याने अभिनय स्वतःच्या अंगाअंगात मुरवून घेतला होता..पहिली पत्नी इरावती या निष्णात स्त्री रोग तज्ञ होत्या पण तरीही मातृत्वा पासून वंचित.. घाणेकरांना लहान मुलांची प्रचंड आवड पण इरावती बाईनंचा दत्तक मुलाला विरोध...घाणेकरांनी मग स्वतः ला अभिनयात झोकून दिले.. रायगडाला जाग येते यात त्यांनी केलेली संभाजी महाराजांची भूमिका लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली..याच नाटकाच्या निमित्ताने सुलोचना चव्हाण यांची एकुलती एक कन्या कांचन यांच्याशी...

वाचणाऱ्याची रोजनिशी.

Image
वाचणाऱ्याची रोजनिशी. वाचणाऱ्याची रोजनिशी. अप्रतिम पुस्तक. संग्राह्य असावं असं. गेल्या दशकात वाचन संस्कृती कशी होती, वाचक काय वाचत होते ह्या बद्दल तपशीलवार लिहिलं आहे. सतीश काळसेकर यांनी त्यांचा ग्रंथभांडार कसा वाढवला, तो डौलारा कसा उभा केला त्याचें रंजक किस्से, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील लेखक आणि त्या त्या पुस्तकांचे वाचक कसे घडत गेले ह्याच्या नोंदी ह्या पुस्तकात मुबलक प्रमाणात आहे. सतीश काळसेकर यांचं वाचन प्रचंड दांडगं  होत हे पुस्तक वाचताना आपल्या लक्षात येईलच. सुमारे पांच सहा वर्षात दर महिन्याला एक लेख प्रमाणे ह्या पुस्तकाचं लिखाण आहे. डिसेंबर २००३ ते जानेवारी २००९ पर्यंतचे लेखक ह्यात समाविष्ट आहे. काळसेकरांनी वाचकाला कोणत्या आव्हानांना सामोरी जावं लागतं ते ठळकपणे नमूद केलं आहे. अनेक कादंबऱ्या, काव्यसंग्रह, कथासंग्रह, ललित ह्या पुस्तकांबद्दल नव्याने माहिती मिळाली. ह्या पुस्तकात फक्त कुठल्या ग्रंथांबद्दल लिहून काळसेकर थांबत नाही तर ते त्यातील कविता किंवा उतारा देखील देतात, त्या सोबत अनेक अनियतकालिक, अनेक दिवाळी अंक, मासिकं त्या बद्दल काळसेकर भरभरून लिहितात, त्या...