Posts

Showing posts from April, 2021

कबियत्री शांता शेळके

*चतुरस्त्र लेखिका आणि कवयत्री शांता शेळके* कविता, कथा, कादंबरी, व्यक्तिचित्रे, बालसाहित्य,चित्रपटगीते,समीक्षा, आत्मकथन, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत लेखन शांता शेळके केलेल्या वृतपत्र, संपादक तथापि कवयित्री आणि गीतकार म्हणून आजच्या पिढीतही विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील इंदापूरचा. पुण्याच्या हुजूरपागा शाळेतून शालेय शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातच सर परशुरामभाऊ महाविद्यालयात पुढील शिक्षण घेतले. एम्.ए.च्या परीक्षेत मराठी हा विषय घेऊन तात्यासाहेब केळकर सुवर्णपदक त्यांनी मिळविले. त्यानंतर मुंबई येथे अल्पकाळ आचार्य अत्रे यांच्या नवयुग साप्ताहिकात नोकरी केली. पुढे नागपूर आणि मुंबई येथील महाविद्यालयांतून मराठीचे अध्यापन केले. बालसाहित्याच्या जगातही त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. अनेक नाटके, ध्वनी मुद्रिका, चित्रपटांसाठी त्यांनी विपुल गीतलेखन केले. ’तोच चंद्रमा’, ’कळ्यांचे दिवस फुलांच्या राती’, ’चित्रगीते’ ही त्यांची गीतसंकलने प्रसिद्ध आहेत. शांताबाईंनी हिंदी, इंग्रजी, संस्कृत या भाषांमधील साहित्याचे अत्यंत ओघवत्या शैलीत मराठी भाषांतर केलेले आहे. महाकवी कालिदासाचे ’मेघदूत’,...

जिथे मुलांना पंख फुटतात*

*जिथे मुलांना पंख फुटतात*                            मूळ लेखक- डॅनियल ग्रीनबर्ग                            अनुवाद   - नीलांबरी जोशी                           प्रकाशन- मनोविकास                            किंमत   -१८०                            पृष्ठ।     -१७७ 'सडबरी व्हॅली स्कूल' या आगळ्यावेगळ्या शाळेची अद्भुत गोष्ट.    *“या शाळेत मुलांना जबाबदार नागरिक म्हणून वागवलं जातं आणि मुलं स्वतःची जबाबदारी स्वतः घेतात. मुलांनी विचारेपर्यंत शिक्षक मुलांमध्ये ढवळाढवळ करत नाहीत. स्वतःला आतून काय आवडतं ती गोष्ट मुलं स्वतः शोधतात. आणि नंतर वेड्यासारखा तिचाच ध्यास घेतात. स्वतःच निवडलीअसल्यामुळे ती ती गोष्ट नीट शिकतात. ए...

गावास पत्र

प्रिय साळगाव --   तुला लिहिताना मला आज ही  आठवतयं , तुझं गाव कुठलं ? असा लहानपणी दुसऱ्या इयत्तेत असताना बाईंनी प्रश्न विचारला. मी म्हटलं आडेली ,सावंतवाडी  घरी येउन आईला सांगितलं तेव्हा ती हसून म्हणाली, 'अगं ते माझं आजोळ आहे. आपलं गाव  साळगाव , कुडाळ मध्ये, यापुढे कुणी विचारलं तर लक्षात ठेव. कोकणातलं गाव माझं ओढ लावतेय अशी जीवाला गावाकडची माती प्रेमळ आहे माझे गाव  साळगाव त्याचे नाव साद घालतात पुन्हा नव्याने माझ्या रक्ताची नाती ... सुंदर माझ्या कोकणात घर आहे माझे कौलारू परतुनी निघता मला अंगण सोडत नाही ही वाट दूर जाते पण मागे काढल्या खुणा कशी विसरू...  गाव .. आपलं घर आपलं  गाव , आपल घर हे आपलंच असतं पण आपण कधी त्याच्याकडे नीट डोळे भरून पहात नाही. आपण त्याला गृहित धरून जगत असतो. घराबाहेर नोकरीच्या निमित्ताने  मुंबईत  असलो तरी कितीही वेळ घालवला तरीही  गावाची व घराची ओढ  मला घेऊन येतेच. पण त्यासाठी आपण त्या वास्तूशी जिवाभावानी जोडलेले असावे लागते.  बरेचदा आपण त्या घराला विसरून जातो पण कधीतरी असा एखादा क्षण येतो की आपल्याला अचानकपणे आ...

हिमराणी*

Image
*हिमराणी* कापसापरी तरल धुक्याचा लेवुनिया  बुरखा  कोण असे ही स्वप्नसुंदरी ?झाकतसे स्वमुख दरीदरीतुन, गिरीराजीतुन ,खिदळत जलधारा "पहलगाम"च्या अंकावरती ,झुलते "लंबोदरा" शुभ्रधवल  त्या  हिमगुच्छांनी ,गिरीशिखरे फुलती रविराजाच्या आगमनाने ,अलोकित धरती उंच उंच ते चिनार ,पाइन,गगनाला भिडती उंच उंच त्या हिमशिखरांशी,जणु स्पर्धा करती  तेजकणांनी चमचम करती , मुकूट सोनेरी देई उधळून ,वैभव सारे,सुर्याची स्वारी जललहरीसह क्रीडा करती ,जलबिंदू सान  दंग होउनी ,भान हरपुनी,चालतसे नर्तन खळखळ मंजुळ नादमधुरते चाले मधुसंगीत  अवखळ चंचल लहरीमधुनी वाहे ती अविरत रूपवती ही,आली कोठून? कोठे ही चालली? अमूतकुंभा कठी घेउनी, उर्वशी अवतरली  हिमराणीचे करिती स्वागत , हिरव्या वूक्षतती कमान करुनी,वातेे हलुनी,मस्तक ते झुकवती  धुंद रम्य त्या वातावरणी ,सुखावले मनमन  थांबली गती,गुंगली मती,गेले भारावुन मोहमयी त्या  सूष्टीचे मज वाटे आकर्षण  अशीच कधीतरी देते दर्शन होता मी उन्मन

भिंती पलिकडची शाळा .

भिंती पलिकडची शाळा . मनुष्य स्वतः च्या अनुभवावरून , त्याला मिळालेल्या प्रेम ,स्नेह किंवा मैत्री ,राग,द्वेष, मत्सर  यांच्या बळावर स्वतः ला घडवतो . लेखिका म्हणते , याच प्रक्रियेला शिक्षण असे म्हणतात. कुठलेही बालक जन्माला येतानाच स्वंयशिक्षणाची प्रेरणा घेवून येते.  भिंतीपलीकडली शाळा ,  हे पुस्तक स्वानुभवातून ,काही उपक्रम राबवून माधुरी देशपांडे यांनी लिहीलेले आहे.    शिक्षणावर बोलू काही ,या संदर्भात ले  हे पुस्तक. शिक्षण हा बालकांचा हक्क आहे हे एकदा  मान्य केल्यावर प्रत्येकाला शाळेत प्रवेश मिळायला हवा. पण तसे घडत नाही. आपल्याला शाळा तर दिसते. शाळेतील भिंती ,बाकं ,दारे खिडक्या ,फळे ,बोर्ड आणि वर्गावर्गातील मुले , त्यांचे शिक्षक परंतु शिक्षण दिसते का हा खरा प्रश्न. लेखिकेला एके दिवशी  नर्सरी शाळेत जाताना रोज रडणारे अडीच वर्षाचे मुल दिसले आणि निरीक्षणातुन मग ही शाळा आकाराला आली. त्या मुलीमध्ये डाउन सिंड्रोम म्हणजे एक प्रकारचे मतिमंदत्व होते ( Genetic disorder ). ती मुलगी आणि स्वतः चा मुलगा नुकताच चालायला लागलेला.  आणि मग १९८८ साली ही दोन मुलांची शाळ...

भारतीय राष्ट्रजीवनाचा आधारस्तंभ - विवेकानंद यांचे शिक्षणविषयक विचार....

भारतीय राष्ट्रजीवनाचा आधारस्तंभ - विवेकानंद यांचे शिक्षणविषयक  विचार.... या विश्वात असे फार थोडे महापुरुष जन्माला येतात की ज्यांचे विचार एखाद्या अतिप्रचंड झंझावाती वादळाप्रमाणे सर्व दिशांना प्रसारित होऊन अवघं विश्व व्यापतात. जगाला त्यांचं म्हणणं ऐकावंच लागतं. वेगवेगळ्या स्थित्यंतरांमधून प्रवास करीत असताना रस्ता भरकटलेल्या मानवजातीला मार्गदर्शन करणारे ते दीपस्तंभ ठरतात. पथदर्शक ठरतात. अशा असंख्य मालिकेमध्ये स्वामी विवेकानंद नावाच्या तेजस्वी संन्याशाचं एक आगळंवेगळं स्थान आहे. विवेकानंदांच्या जीवनध्येयात केंद्रस्थानी भारत आहे ; पण भारताकडे बघण्याचा वैश्विक दृष्टिकोण हे त्यांचं वेगळेपण आहे. एका फार मोठ्या सामाजिक स्थित्यंतराच्या काळात त्यांचा जन्म झाला. राजा राममोहन राय यांच्यापासून भारतवर्षात परिवर्तनयुगास प्रारंभ झाला. त्यानंतरच्या काळात सुधारकांनी सुधारणांच्या नावाखाली चालविलेला धर्माचा ध्वंस, युरोपीय सभ्यतेच्या संकल्पनांची नव्याने झालेली ओळख, जगात चाललेला साम्राज्यवादी भस्मासुरांचा हैदोस आणि जिला आपल्या भविष्याची कल्पना करण्यासही उसंत नाही अशी परकीयांच्या गुलामगिरीत काळ कंठणारी आपल...

महात्मा गांधीजी यांची शिक्षणपद्धत ही जीवनदृष्टी – नयी तालीम

महात्मा गांधीजी यांची शिक्षणपद्धत ही जीवनदृष्टी – नयी तालीम ‘नयी तालीम’ हे सर्वोदयी व अहिंसक समाजनिर्मितीसाठी साधन आहे अशी महात्मा गांधी यांची भूमिका होती. गांधी यांनी ती पद्धत प्रथम दक्षिण आफ्रिकेत असताना तेथील आश्रमातील मुलांच्या शिक्षणासाठी वापरली. त्यातून त्यांचे चिंतन विकसित झाले. काँग्रेस प्रांतिक सरकारे भारतात 1937 साली स्थापन झाली. तेव्हा गांधी यांनी बुनियादी शिक्षणाची सविस्तर मांडणी वर्धा येथील शिक्षण संमेलनात केली. विदेशात उच्च पदवी घेतलेले व रविंद्रनाथ टागोर यांच्यासोबत काम केलेले आर्यनायकम पतिपत्नी यांनी शाळेची जबाबदारी घेतली. त्यानुसार वर्धा येथे आणि भारतात बिहार, ओरिसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, काश्मीर या राज्यांत शाळा सुरू झाल्या. ‘नयी तालीम’ पद्धतीच्या शाळा 1956 साली एकोणतीस राज्यांत अठ्ठेचाळीस हजार होत्या आणि त्यात पन्नास लाख मुले शिकत होती. गांधी यांच्या शिक्षणविचाराचा प्रसार इतक्या मोठ्या प्रमाणावर झाला होता. शासनाने मात्र, गांधी यांची ती शिक्षणपद्धत स्वीकारली नाही. शासनाने तो शिक्षणविचार सोडून दिला. त्यामुळे शाळा बंद पडत गेल्या. भारतात केवळ त्या प्रकारच्या पाचशे शाळ...

मराठी दिन

*मराठीच बोलू कवतूके तेव्हाच* आपल्याकडे  २७ फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन म्हणून पाळला जातो. कवी कुसुमाग्रज  यांचा जन्मदिवस हे त्याचे निमित्त असते.  परंतु वस्तूस्थिती अतिशय विपरित आहे.  राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनाचे कामकाज मराठीतून चालले किंवा महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा  मराठी भाषेतून चालवली गेली ,याचा अर्थ ती राजभाषा ठरली असे समजायचे कारण नाही .आज महानगरपालिकेच्या सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या इमारत विभागामध्ये इंग्रजी फाईलीशिवाय  दुसरे काहीच सापडणार नाही. कारण यांचे प्रमुख म्हणून येणारे  लोकही  अमराठीच  असतात. राज्य सरकारच्या सचिवांमध्ये ५० टक्कयांपेक्षा जास्त अमराठी सचिव असतात.  ते सामान्य माणसाची मातूभाषा कुठली आहे याला महत्व देत नाहीत. तर त्यांना कुठली भाषा सोयीची आहे , याला त्यांच्या दूष्टीने अधिक महत्व असते. मातूभाषेचा  अभिमान बाळगणे  आणि तिचा अधिकाधिक वापर होणे या दोन्ही गोष्टी सारख्याच  महत्वाच्या आहेत. केवळ पोकळ भाषणबाजी न करता  मराठी चे संवर्धन करण्याची आत्मियता  निर्माण झाली पाहिजे . याकरिता राज्यकर्...

एका समृद्ध शाळेचा प्रवास

एका समृद्ध शाळेचा प्रवास शाळेचा संपूर्ण परिसरच एक शैक्षणिक साधन बनावे म्हणून मुलांच्या अवतीभवती अनेकविध कल्पकतापूर्ण गोष्टी अंतर्भूत कराव्यात, यासाठी वाचकांना उत्स्फूर्त करण्याचे काम हे पुस्तक करते. मुलांचा तसेच शिक्षकांचाही विचार करून या सर्व कल्पना साध्या-सोप्या प्रकारे, हसत-खेळत वापरता येतील अशा असून, त्या महागड्या नाहीत. कल्पक शिक्षक, इंजिनियर, आर्किटेक्ट तसेच संस्थाचालकांच्या व अधिकार्‍यांच्या सहाय्याने अस्तित्वात असलेल्या शाळेच्या वास्तूतसुद्धा ‘बाला’च्या कल्पनांचा अंतर्भाव करता येईल. शिक्षणपद्धतीतील भौतिक, तांत्रिक, संस्थेच्या अधिकारक्षेत्रातील विचारपरिवर्तनामुळे हे शक्य होऊ शकते. या कबीर वाजपेयी लिखित या पुस्तकात भौतिक क्षेत्रावर भर देण्यात आलेला असून, वाचक व इतर संबंधित याचा मतितार्थ व इतर क्षेत्रातील संबंध समजून स्वत:च्या परिने त्याचा वापर करतील. कुठलीही शाळा, मग ती खेड्यातील असो, गावातील असो वा शहरातील असो, त्याच्या निर्मितीप्रक्रियेत अनेक लोकांचा सहभाग असतो. सरकार शाळेला परवानगी देते, संस्था त्यासाठी जागा उपलब्ध करते, आर्किटेक्ट तिचा आराखडा तयार करतात, मजूर व गवंडी ती बांधत...

एका शिक्षणमंत्र्याने केलेले प्रयोग’ : मनीष सिसोदिया प्रणित (शिक्षणाचे) दिल्ली मॉडेल...

‘एका शिक्षणमंत्र्याने केलेले प्रयोग’ : मनीष सिसोदिया प्रणित (शिक्षणाचे) दिल्ली मॉडेल...     आता केजरीवाल यांचे उजवे हात समजले जाणारे मनीष सिसोदिया यांचे पुस्तक आले आहे. ‘शिक्षा’ या नावाने ते इंग्रजी व हिंदी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. ‘एका शिक्षणमंत्र्याने केलेले प्रयोग’ असे त्याचे उपशीर्षक आहे. २०१५ ते २०१९ या काळात दिल्ली राज्याचे शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाची मांडणी या पुस्तकात आहे. या पुस्तकात महात्मा गांधी, त्यांची ‘हिंद स्वराज’मधील मांडणी, त्यांची ‘नई तालीम’ या नावाने परिचित असलेली शिक्षणविषयक संकल्पना, या सर्वांचा पुसटसादेखील उल्लेख नाही. कोणत्याही शिक्षणतज्ज्ञाचा उल्लेख नाही. आणि तरीही हे पुस्तक सर्वसामान्य जनतेने त्यांच्यासोबत राहिले पाहिजे, असे सांगणारे आहे. किंबहुना मनीष सिसोदिया शिक्षणक्षेत्रात करत असलेल्या कामासाठी तरी आणखी एकदा आम आदमी पक्षाला दिल्लीच्या सत्तेवर बसवले पाहिजे, अशी भावना कोणाही वाचकांच्या मनात उत्पन्न करणारे आहे.     त्यांचे वडील सरकारी शाळेत शिक्षक होते, याचा काही एक प्रभाव त्यांच्यावर असणार. शिवाय काही वर्षे पत्रकारिे...

माझी जीवनकहाणी’हेलन केलर, अनुवाद : माधव कर्वे

‘ माझी जीवनकहाणी’ हेलन केलर, अनुवाद : माधव कर्वे अलाबामा नावाच्या अमेरिकेतल्या राज्यात जून १८८० मध्ये एका गोड मुलीचा जन्म झाला. तेव्हाच्या अमेरिकेतल्या एका घरंदाज आणि सधन कुटुंबात या मुलीच्या जन्माने आनंदाचं उधाण आलं. या चिमुकलीच्या आयुष्याची सुरुवात अन्य साधारण मुलांप्रमाणेच झाली असली तरी एक-दीड वर्षांच्या वयात एका आजारपणामुळे ती कायमची बहिरी आणि अंध झाली. घरच्या सगळ्यांनाच हा आघात पचवणं अवघड होतं, मात्र, ‘आईच्या प्रेमळ समजूतदारपणेच या ठार अंधाऱ्या दिवसातही मी आनंदी राहू शकले.’ अशी एक आठवण या पुस्तकाच्या सुरुवातीलाच येते. पहिल्या सहा वर्षांत सारीच लहान मुलं आपल्या भवताली चाललेल्या घटनांमधून, मोठय़ांच्या अनुकरणांमधून अनंत गोष्टी शिकतात. आवाजाच्या आधारे भाषा शिकतात. आई-वडिलांचं अनुकरण करून, तसेच आवाज काढण्याचा प्रयत्न करून बोलायला शिकतात. इतरांना चालताबोलताना पाहून सामाजिक व्यवहारांचं भान घेतात. एक ना अनेक गोष्टी.. नेमक्या याच वयात या मुलीला अपंगत्व आलं. ऐकू न आल्याने पहिल्या वर्षांपर्यंत शिकलेल्या काही मोजक्या शब्दांवरच तिची भाषेची प्रगती थांबली. ‘वॉ वॉ’ असा काहीसा आवाज काढून वॉटर, अर्थ...

चंद्रकलेचे रुप सानुले*

*चंद्रकलेचे रुप सानुले* चंद्रकलेचे रुप सानुले , नील नभी विलसले सख्या रे मनात मी हसले -- निळे निळे हे झुलते अंबर  नाचे खाली विशाल सागर  चंद्रबिंब  ते नभी हासता , दरिया वर उसळे   -- धवल  चंद्रीका होती  विहरत  अम़ूतस्पर्शे  अवनी पुलकित  गंध प्रीतीचा मनी दरवळे , प्रीतीपुष्प उमलले -- आठवणींचे ओघळले सर तुझे सावळे रुप मनोहर  मोहून गेले, मला न कळले ,अशी कशी मी फसले --

एका उपेक्षित शैक्षणिक जगाची ओळख - सागरशाळा

एका उपेक्षित शैक्षणिक जगाची ओळख - सागरशाळा शहरी भागातले आणि मध्यमवर्गाचे उच्च मध्यमवर्गाचे प्रश्न हेच जणू सर्व समाजाचे प्रश्न आहेत अशा मांडणीचा हा काळ आहे. दप्तराचे ओझे, शाळाप्रवेश, फी वाढ, शाळेत जाण्यासाठी वाहनांची सुरक्षा, शाळेत फास्ट फूड खावे की नाही… हे सारे आज शिक्षणव्यवस्तेतील जणू जीवन मरणाचे प्रश्न बनले आहेत. हे सारे प्रश्न आहेत आणि ते नक्कीच महत्त्वाचेसुद्धा आहेत. पण या प्रश्नांच्या परिघाबाहेर एक वंचितांचे जग आहे. एक नाकारलेल्या माणसांचे जग आहे. जीवन-मरणाची लढाई लढताना ज्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्राधान्यक्रम सर्वात शेवटी असतो, अशा जगाकडे आपण दुर्लक्ष करतो. सक्तीचा शिक्षण हक्क कायदा २०१० साली आला. त्यामुळे देशातील शाळेत न जाणारी किमान २ कोटी मुले या कायद्याने आता आपोआप शाळेत बसतील, असे वाटले. पण तो कायदा येऊन   दहा वर्षे झाली, तरी ही परिघाबाहेरची मुले अजून परिघाबाहेरच आहेत. या पार्श्वभूमीवर या वंचित समूहातील मुलांचे प्रश्न घेऊन काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचे काम थक्क करून टाकते. ‘सागरशाळा’ हे पुस्तक असेच एका जगाविषयी आहे. ज्या जगाचा आपण विचारही केलेला नाही देवेन...

देशाच्या आर्थिक सक्षमीकरणात स्रियांचे योगदान*

*देशाच्या आर्थिक सक्षमीकरणात स्रियांचे योगदान* महिला स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव करुन देण्यासाठी आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. त्यासाठी तीच्या अंतरमनातून येणारा आत्मविश्वास, आणि धाडस हे तिला पाठबळ देत आहेत. आजही जगातील महिलांना विविध क्षेत्रात जसे की, सामाजिक, धर्मिक विधी, शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतीक, अशा प्रत्येक क्षेत्रात निर्णय घेण्यास त्यांना दुय्यम स्थान दिले जाते. महिला सक्षमीकरणाची समिक्षा ही मानवाधिकाराच्या नजरेतुन करण्याचे काम पंचायतराज करत आहे.  काहीकाळापूर्वी बिंजिग मध्ये जागतिक स्तरावर संपन्न झालेल्या ४ थ्या जागतिक संम्मेलनाचे घोष वाक्य होते, ‘‘महिलांच्या दृष्टीतुन जगाकडे पाहा.‘‘ महिला सक्षमीकरणात सर्वात महत्वाची बाब म्हणजे तिला माणुस म्हणुन जगण्याची संधी देऊन तिला तिचे व्यक्तिमत्व विकसित करण्यास समाजातून प्रोत्साहन मिळावे. महिला सक्षमीकरणाचा अर्थ महिलांना भीक नको आहे, कोणाची दया नको आहे, तर त्यांना पुरुषांप्रमाणे समान संधी हवी आहे. आणि यासाठीच महिलासक्षमीकरण महत्वाचे ठरते.  महिला सक्षमीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरु आहे. महि...

करून दाखव*

*करून दाखव* विचार काय करतेस, काहितरी करून दाखव.. वेळ जाईन निघून, प्रवाहामध्ये तरून दाखव.. लाखो आले अन गेले, बोल घेवडे सगळे.. स्व:ता काही नाही केले, फ़क्त लोकाना उपदेश दिले.. उपदेशाचं कडू तु पिऊन तर बघ.. सत्याची कास धरून तर बघ.. कुणीतरी आपल्या भल्याच सांगत असतं.. एखाद्यावर विश्वास ठेवून तर बघ.. यश आपल्याच हातात असतं. सौ.मनिषा कडव

शिक्षक – विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त "प्रिय मुख्याध्यापक"

शिक्षक – विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त  "प्रिय मुख्याध्यापक"   आपण जे शाळेत शिकतो आणि आपण जी काही नोकरी करतो त्याचा एकमेकांशी काहीही संबंध नसतो, असं म्हणतात. आपण जे शाळेत शिकतो आणि आपण जी काही नोकरी करतो त्याचा एकमेकांशी काहीही संबंध नसतो, असं म्हणतात. उदहारणच द्यायचं झालं तर कॉमर्स शाखा असलेली मुलं शाळेत किंवा आर्ट्स शाखेचे विद्यार्थी बँकेत नोकरी करतात. म्हणजे मुलं आज शाळांमधून जे काही शिकत आहेत, त्या शिक्षणाचे त्यांच्या आयुष्यात काय महत्त्व आहे, काय उपयोग आहे, शिक्षण अर्थपूर्ण करण्यासाठी त्यात काय बदल करावे लागतील, शिक्षणाचा मुलांच्या स्वातंत्र्याशी आणि देशाच्या हिताशी काही संबंध आहे का? शाळांनी त्यासाठी काय करायला हवं, शिक्षणाशी संबंधित छोटया पण महत्त्वाच्या गोष्टींचा मुलांच्या मनावर कसा परिणाम होतो, असे अनेक प्रश्न आपल्या मनात डोकावतात. पण आपण त्याचा पुढे काहीही उपयोग करत नाही. केवळ विचार करतो आणि सोडून देतो. मात्र नेमक्या याच प्रश्नांकडे लेखक शंकर मुसाफिर यांनी ‘प्रिय मुख्याध्यापक’ या त्यांच्या पुस्तकातून लक्ष वेधले आहे. या पुस्तकाचा अनुवाद डॉ. प्रदीप गोटुस्कर यांनी के...

भारतीय राष्ट्रजीवनाचा आधारस्तंभ - विवेकानंद यांचे शिक्षणविषयक विचार....

भारतीय राष्ट्रजीवनाचा आधारस्तंभ - विवेकानंद यांचे शिक्षणविषयक  विचार.... या विश्वात असे फार थोडे महापुरुष जन्माला येतात की ज्यांचे विचार एखाद्या अतिप्रचंड झंझावाती वादळाप्रमाणे सर्व दिशांना प्रसारित होऊन अवघं विश्व व्यापतात. जगाला त्यांचं म्हणणं ऐकावंच लागतं. वेगवेगळ्या स्थित्यंतरांमधून प्रवास करीत असताना रस्ता भरकटलेल्या मानवजातीला मार्गदर्शन करणारे ते दीपस्तंभ ठरतात. पथदर्शक ठरतात. अशा असंख्य मालिकेमध्ये स्वामी विवेकानंद नावाच्या तेजस्वी संन्याशाचं एक आगळंवेगळं स्थान आहे. विवेकानंदांच्या जीवनध्येयात केंद्रस्थानी भारत आहे ; पण भारताकडे बघण्याचा वैश्विक दृष्टिकोण हे त्यांचं वेगळेपण आहे. एका फार मोठ्या सामाजिक स्थित्यंतराच्या काळात त्यांचा जन्म झाला. राजा राममोहन राय यांच्यापासून भारतवर्षात परिवर्तनयुगास प्रारंभ झाला. त्यानंतरच्या काळात सुधारकांनी सुधारणांच्या नावाखाली चालविलेला धर्माचा ध्वंस, युरोपीय सभ्यतेच्या संकल्पनांची नव्याने झालेली ओळख, जगात चाललेला साम्राज्यवादी भस्मासुरांचा हैदोस आणि जिला आपल्या भविष्याची कल्पना करण्यासही उसंत नाही अशी परकीयांच्या गुलामगिरीत काळ कंठणारी आपल...

वाचन प्रेरणा दिन

*वाचाल तर वाचालच पण वाचवालही* २३ एप्रिल वाचन दिन या निमित्ताने मी आपल्याला नेहमिच पडणार्‍या प्रश्नाविषयी थोडे बोलणार आहे. का वाचाव? काय वाचाव? वाचनामुळे काय मिळत?(वाचनामुळे मिळणारे फायदे)  असे प्रश्न आपल्याला नेहमीच पडतात.  वाचनामुळे आपल्या ज्ञानात भर पडत असते, आपण नवनवीन माहिती मिळवीत असतो, नवनवीन गोष्टी शिकत असतो. वाचनाचे महत्त्व हे शीर्षकामुळे अधोरेखित झालेले आहेच. या आधी आपण वाचाल तर वाचाल ही उक्ती ऐकली असेल, पण त्यापुढे जाऊन वाचाल तर इतरांना वाचवाल असे म्हटले तर वावगे ठरणार नाही! वाचनामुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावतातच, त्याचबरोबर आपलं मन आल्हादित होत, मनाला शांती मिळते.  आपल्या आवडीची पुस्तके वाचनाने मन प्रगल्भ होते. वाचनाने नवीन माहिती मिळण्यास मदत होते. त्याचा स्वतःसाठी तसेच इतरांसाठी उपयोग होत असतो. चुकीच्या सवयींना, आचार-विचारांना योग्य ती दिशा मिळते.  वाचन ही एक वेळ सत्कर्मी लावण्यासाठीची उत्तम सवय आहे आणि यासाठी आपल्याला सहजपणे वेळ काढता येतो. त्याला कसलीही पूर्व तयारी लागत नाही. वेळ जात नसेल  तर वाचन ही अगदी सुयोग्य गोष्ट आहे.  वाचनाने आपण एखाद्य...

वाचन प्रेरणा दिन

नमस्कार, मी सौ.मनिषा राजन कडव एक शालेय ग्रंथपाल  शाळेत माझ्या विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती वाढीस लागावी यासाठी मी सदैव तत्पर राहणारी. आज जगातील सर्व लहान ,मोठ्या करोनाग्रस्त रुग्णांना दिलासा मिळेल अशी छोटेखानी  गोष्ट मी  सांगणार आहे यातून जीवनाकडे स्वास्थ्य देणारी सकारात्मक उर्जा कशी मिळवता येऊ शकेल याचा बोध आपणास नक्कीच होईल.    ​रशियन लेखक टॉलस्टॉयची गोष्ट. त्याला एक गरीब बेरोजगार भेटायला आला. त्यांच्यात असा संवाद झाला. तरुण : मी दरिद्री आहे, बेरोजगार आहे, माझ्याकडे कवडीही नाही, जगू कसा? माझं दारिद्र्य कसं हटेल?    रशियन लेखक टॉलस्टॉयची गोष्ट. त्याला एक गरीब बेरोजगार भेटायला आला. त्यांच्यात असा संवाद झाला. तरुण : मी दरिद्री आहे, बेरोजगार आहे, माझ्याकडे कवडीही नाही, जगू कसा? माझं दारिद्र्य कसं हटेल? टॉलस्टॉय : हे पहा, माझा एक मित्र मानवी शरीराच्या अवयवांचा व्यापार करतो. तू त्याच्याकडे तुझे डोळे विकलेस तर वीस हजार रुबल मिळतील. तरुण : अरे बापरे! माझे डोळेच गेले तर मी कसा पाहीन? काही झालं तरी मला डोळे विकायचे नाहीत.  टॉलस्टॉय : मग दोन्ही हात वीक,...

टाॅस्टाॅलस्टाॅय

Image
नमस्कार, मी सौ.मनिषा राजन कडव एक शालेय ग्रंथपाल  शाळेत माझ्या विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती वाढीस लागावी यासाठी मी सदैव तत्पर राहणारी. आज जगातील सर्व लहान ,मोठ्या करोनाग्रस्त रुग्णांना दिलासा मिळेल अशी छोटेखानी  गोष्ट मी  सांगणार आहे यातून जीवनाकडे स्वास्थ्य देणारी सकारात्मक उर्जा कशी मिळवता येऊ शकेल याचा बोध आपणास नक्कीच होईल.    ​रशियन लेखक टॉलस्टॉयची गोष्ट. त्याला एक गरीब बेरोजगार भेटायला आला. त्यांच्यात असा संवाद झाला. तरुण : मी दरिद्री आहे, बेरोजगार आहे, माझ्याकडे कवडीही नाही, जगू कसा? माझं दारिद्र्य कसं हटेल?    रशियन लेखक टॉलस्टॉयची गोष्ट. त्याला एक गरीब बेरोजगार भेटायला आला. त्यांच्यात असा संवाद झाला. तरुण : मी दरिद्री आहे, बेरोजगार आहे, माझ्याकडे कवडीही नाही, जगू कसा? माझं दारिद्र्य कसं हटेल? टॉलस्टॉय : हे पहा, माझा एक मित्र मानवी शरीराच्या अवयवांचा व्यापार करतो. तू त्याच्याकडे तुझे डोळे विकलेस तर वीस हजार रुबल मिळतील. तरुण : अरे बापरे! माझे डोळेच गेले तर मी कसा पाहीन? काही झालं तरी मला डोळे विकायचे नाहीत.  टॉलस्...

प्रलय

थांबव हा प्रलय आता आज स्वाईन फ्ल्यु उद्या कोरोना अशा साथींवर येताहेत साथ मला माहित आहे रे  तुझ्यावर या मानवानेही केलाय आघात अरे पण एका दोघांच्या चुकीमुळे  तु घेणार आहेस का सगळ्यांचा जीव अरे तुला बाबा आज घरी दिसत नाही म्हणुन रडणार्‍या चिमुकल्यांची तुला थोडीशी तरी येऊदे कीव काय चालवलयस तु हे तु तरी असा निष्ठुर हौऊ नकोस पिल्लाने जरी आचळ चावले तरी माय नाही रे कधी  मारत तु ही जरा समज तुझं हे  मानव बाळ सुधारेल निश्चितच धडा घेईल या महामारीतून आणि लावेल झाडे धरणीवर तुही या धरतीवरून या कोरोनाचा  पसारा आवर,या कोरोनाचा पसारा आवर सौ.मनिषा राजन कडव कल्याण

चंद्रकलेचे रुप सानुले*

*चंद्रकलेचे रुप सानुले* चंद्रकलेचे रुप सानुले , नील नभी विलसले सख्या रे मनात मी हसले -- निळे निळे हे झुलते अंबर  नाचे खाली विशाल सागर  चंद्रबिंब  ते नभी हासता , दरिया वर उसळे   -- धवल  चंद्रीका होती  विहरत  अम़ूतस्पर्शे  अवनी पुलकित  गंध प्रीतीचा मनी दरवळे , प्रीतीपुष्प उमलले -- आठवणींचे ओघळले सर तुझे सावळे रुप मनोहर  मोहून गेले, मला न कळले ,अशी कशी मी फसले --

बखर बिम्मची (

पुस्तक परिचय - बखर बिम्मची (बालकथा ) लेखक - जी. ए. कुलकर्णी हमखास वाचलेच पाहिजे असे काही सदरात माझ्या पसंदीच्या यादीत जी.ए. कुलकर्णी हे नाव आलं ते या पुस्तकामुळे. फ़ार लहानपणापासून हे पुस्तक वाचनात आलं आहे.  बखर बिम्मची कथा आहे बिम्म बखर बिम्मची : बिम्म हा ३-४ वर्षांचा मुलगा आहे. अजुन शाळेत जायला सुरूवात झाली नाही. बब्बी (मोठी बहीण) शाळेत जाते म्हणून ती बिम्मसमोर थोडा शिष्टपणा दाखवते. बिम्मचे बाबा बाहेरगावी नोकरीला आहेत. त्यामुळे बब्बीसोबत खेळणं (किंवा भांडणं), तिच्यासोबत बरोबरी करणं आणि आईला आपल्या खोड्यांनी वैतागून सोडणं हा बिम्मचा प्रमुख दिनक्रम. यातील बहुतेक खोड्या या खोड्या नसून बिम्मच्या बालबुद्धीला पडणारे निरागस प्रश्न आहेत आणि आईलाही ते जाणवतं. त्या (बहुतांशी) निरागस खोड्या आपल्याला बिम्मच्या जास्तच जवळ आणतात. बिम्म मधील प्रत्येक गोष्ट आपल्याला आपल्या लहानपणीच्या मनात असलेल्या fantasy ची आठवण करुन देते. हळूहळू आपण पण बिम्मच्या विश्वात प्रवेश करतो. जीए आपल्या असाधारण कथांसाठी प्रसिद्ध आहेत. एवढ्या complex कथा लिहीणारे जीए बिम्म सारखं हळूवार लिहू शकतात हा जी.ए वाचलेल्या वाचका...