काळाची जन्मकथा*
*काळाची जन्मकथा* लेखक : स्टीफन हॉकिंग प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन मराठी अनुवाद : डॉ. सुभाष के. देसाई पृष्ठे- २२६, मूूल्य- ३०० रुपये शास्त्रज्ञ म्हणजे काय किंवा हे शास्त्रज्ञ म्हणवणारे लोक नेमकं करतात काय हेदेखील जेव्हा कळत नव्हतं त्या वयापासून ते आजतागायत मला दोन लोकांविषयी कमालीचं कुतूहल होतं, आहे. ते म्हणजे भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि डॉ. स्टीफन हॉकिंग. दोघांनीही आपापल्या देशांत राहून जागतिक संशोधन क्षेत्राला दिलेलं योगदान खूप मोठं आहे. इतर क्षेत्रात मिळते तशी लोकप्रियता शक्यतो शास्त्रज्ञांच्या वाट्याला येत नाही कारण त्यांचं काम नेहमीच पडद्यामागे राहून अविरतपणे चाललेलं असतं. माणसाचे वयक्तिक आणि सामाजिक आयुष्य सुखकर करणाऱ्या अशा हजारो गोष्टी पडद्यामागे अपार मेहनत करून "शास्त्रज्ञ" बनवत असतात पण लोकप्रियता ही नेहमी त्यांच्यापासून चार हात दूरच राहते. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि डॉ. स्टीफन हॉकिंग हे सध्याच्या घडीला याला अपवाद मानता येतील. एखाद्या नेत्याच्या किंवा अभिनेत्याच्यादेखील वाट्याला येणार नाही अशी लोकप्रियता मिळवणारे हे दोन महान शास्त्रज्ञ! ...