सात्विक संताप मंदिरात आहेस तर , जाग जरा देवा , गाभाऱ्याला लागू देरे , बाहेरची हवा ..... । डोळे मिटून घेशी जणू ,पाहुनी पतन .... तुवा दिले माणसाला पृथ्वीचे वतन .... । विध्वंसाचा ठेका ,जगी माणूस मातावा .... त्याचे भय न्यारे , तुवा गाभारा गाठावा ...| उन्हामध्ये ताठल्या गा , भाविकांच्या रांगा .... कोरडेला कंठ , घाम धावे चहू अंगा .... । तुझ्या वाटे , भक्तीचाही व्यापार पाहावा ... तरी तुला आम्ही भक्त वत्सल म्हणावा ....| चराचरी व्यापलेला असशी म्हणती ... नित्य येते तुझ्या नसण्याची रे प्रचिती ....| अमानुष खेळ जगी ,चालला पाहावा .... सांग देवा तुला ,कुण्या राऊळी शोधावा ....| लेकीबाळी मरतात , वासनेच्या खेळी ... सांग कुठे असतोस , देवा तू त्या वेळी .... अणूरेणूतून तुझ्या असण्याच्या ओळी वाटे मला , कस तुझा पणाला लागावा .... । प्राक्तनाचे , प्रारब्धाचे , पाठ सारे धडे ... निष्पाप जीवांचा बळी , यातनांचे मढे .... माणसाला दिले मन बुद्धी , तू तोकडे .... माणसाचा लगाम तू पुन्हा हाती घ्यावा ..... । कोटी कोटी रूपातून , प्रकट होतोसी .... कोटी कोटी मनातून का न तू...