Posts

Showing posts from July, 2023

श्रावणमास

*विषय - श्रावणमास* *ऋतुरंग फुलूनी आला मम जीवना* *आषाढ श्रावण सरी बरसत घना* *मेघ जमुनी आले या उंच अंबरा* *कोसळती धरेवर रिमझिम जलधारा.(१)* *हिरवा शालू परिधान करुनी सजली धरा* *नवतरूनी नटली जशी भेटण्या वरा* *नक्षी  इंद्रधनुने तोरण बांधून अशी काढली* *जणू चित्रकारी  ही अवनीने रेखीली .(२)* *श्रावणमास हा  मम जीवनी आला*  *जगण्यास मज बेधुंद करुनी गेला* *चोहीकडे पसरली ही हिरवी छाया* *बहरता ऋतुराज मोहरे ही काया.(३)* *सुगंधित झाली ही अवघी अवनी* *जणू फोडली कोणी ही अत्तर दाणी* *किमया कशी ही निसर्गात घडली* *जादूगाराने छडी ही अशी फिरवली..(४)* *हर्ष उल्हास हा आज मनी बहरला* *सण उत्सव आनंद घेऊनी येती घरा* *सृष्टी नटून थटून आली या भरा* *श्रावणमासी ऋतुरंग हा जीवनी बहरला..(५)* *सौ मनिषा  राजन कडव*

संघर्ष हेच सामर्थ्य

Image
पाडून घेतल्या.  रवींद्र खंदारे यांचे जीवन म्हणजे अडथळ्यांची शर्यत आहे. लेखकाचे जीवनानुभव अतिशय दाहक आहेत. संकटे आली, तरी त्यांनी हतबल होऊन शिक्षणाचा ध्यास सोडला नाही. त्या सर्व संकटांतून तावूनसुलाखून निघाल्यामुळेच त्यांच्या जगण्याला तेज प्राप्त झाले आहे. प्रतिकूल परिस्थितीपुढे शरणागती न पत्करता ते झुंजत राहिले, म्हणून त्यांना ध्येयपूर्तीचा आनंद घेता आला. ह्या आत्मकथनाचे सार महात्मा फुले यांच्या 'शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही' ह्या मूलमंत्रात समाविष्ट झाले आहे. ह्या लेखनात लेखकाचे अतिशय समंजस, समजूतदार, ध्येयनिष्ठ, सोशीक आणि सहनशील व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबित झाले आहे. 'संघर्ष हेच सामर्थ्य' हे केवळ व्यथावेदना मांडणारे आत्मकथन नाही, तर जीवनाभिमुखतेचा संदेश देणारे आत्मकथन आहे. किंकर्तव्यमूढ होत चाललेल्या उगवत्या पिढीला अंतर्मुख करणारे हे आत्मकथन आहे. हे ह्या कलाकृतीचे मोठे यश म्हणावे लागेल.  ह्या आत्मकथनाची भाषा अतिशय साधी, सोपी, सरळ, प्रवाही आणि अनलंकृत आहे. लेखकाने कुठेही शाब्दिक कसरती केलेल्या नाहीत. त्यामुळे ह्या भाषेला साधेपणातले सौंदर्य लाभले आहे. लेखकाने केलेली प्रसंगचित्...

आता मव्ह काय

Image
आता मव्हं काय'! : लक्षणीय आत्मकथन  डॉ. देवीदास तारू यांचे 'आता मव्हं काय!' हे आत्मकथन मेहता पब्लिशिंग हाऊसने जून २०२३मध्ये प्रकाशित केले आहे. सावत्रपणाच्या जाचात बालपण करपून गेलेल्या एका उपेक्षित, पण प्रज्ञावंत मुलाची ही आतडी पिळवटून टाकणारी गोष्ट आहे. एकलव्याच्या निष्ठेने स्वतःला घडविणाऱ्या एका जिद्दी मुलाची ही प्रेरणादायी गोष्ट आहे. सुरुवातीच्या ८ पृष्ठांमध्ये लेखकाने आपल्या कुटुंबाची पार्श्वभूमी सांगितली आहे. माय जमनाबाई आणि बापू कचरू यांचा हा मुलगा. नाव जरी देवीदास असले, सगळे 'दैदास्या' ह्या नावानेच पुकारतात. बापू नांदेड टेक्स्टाईल्स मिलमध्ये मजूर. लग्नानंतर नऊ वर्षांत पहिल्या बायकोला मूलबाळ होत नाही, म्हणून कचरूने दुसरी बायको करून आणली. गिरजाबाई तिचं नाव. हीच लेखकाची सावत्र आई. दुसरी पत्नी गिरजाबाई काळी असूनही आवडती, तर पहिली पत्नी जमनाबाई गोरी असूनही नावडती. गिरजाबाईला गंगाधर नावाचा मुलगा झाल्यानंतर दोन तीन वर्षांनी जमनाबाईच्या पोटी 'दैदास्या' जन्मला. लेखकाने आपल्या सख्ख्या आईचे वर्णन एका वाक्यात केले आहे : 'दिसायला गोरी, पण तोंडात सुरी'.  लेखक...

मानाचा मुजरा

*मानाचा मुजरा  छत्रपती शिवाजी महाराजांना* गौरव राजांचा करु जय जय शिवराया नसे तुमच्यावीण कोणी स्वराज स्थापाया ||धृ || शहाजी जिजाऊ उदरी जन्म झालासे  शिवनेरी गडावरती तुतारी वाजतसे  महाराष्ट्रावर भवानी माता प्रसन्न असे  हिंदू धर्म रक्षणार्थ शिवाजी अवतरसे ||१ || रामायण महाभारत गोष्टी सांगूनी  जिजाऊ साहेब करिती संस्कार शिवमनी  दादोजी कोंडदेव शिक्षण देऊनी  शिकवीती शिवबांना लढावे कसे रणी ||२ || मावळ प्रांतातील शूर सवंगडी जमले  करांगुली रक्ताने महादेवा अभिषेकीले  हर हर महादेव म्हणता बाहू सरसावले  स्वराज्यासाठी प्रथम तोरणा जिंकीले ||३ || प्रतापगडावरी अफझलखान आला  राजे भेटती त्यासी विषारी वाघनखाला  घेऊनी दूर सारिले सय्यद बंडाला  कोथळा बाहेर काढला मारून खानाला ||४|| पुण्यात शायिस्तेखान लाल महाली येता  बेसावध क्षणी त्यावरी हल्ला करता  गनिमी कावा साधून तोडियले बोटा भयाने खान दिल्लीस पळूनिया जाता ||५|| औरंगजेबाने दिल्लीस भेटीस बोलविले  कपटाने राजांना कैदेत टाकीले  बहुयुक्तीने राजे पेटा-यात बसले  कोणाच्याही नकळत आ...

बुद्धिमत्तेने विजय निळविला

Image
*बुद्धिमत्तेने विजय मिळवला*  चतुर्दंत हत्ती एका जंगलात हत्तींच्या गटासह राहत होता.  तो त्या गटाघा प्रमुख होता.  एकदा त्या जंगलात अनेक वर्षे पाऊस पडला नाही.  दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. चतुर्दंताने काही हत्तींना जंगलातून पाण्याच्या शोधात पाठवले.  त्याने येऊन एका तलावाविषयी सांगितले. सर्व हत्ती दुसर्‍या दिवशी तेथे पोहोचले आणि त्यांनी मनसोक्त पाणी प्यायले, आंघोळ केली आणि दिवसभर जलक्रीडा खेळले.  त्या तलावाभोवती पसरलेल्या गवतावर ससे राहत असत.  हत्तींच्या येण्या-जाण्याने अनेक ससे पायाखाली दगावले. हत्ती निघून गेल्यावर सशांना वाटले की हत्ती रोज इथे येत असतील तर आपल्यापैकी कोणीही जिवंत राहणार नाही.  एका वृद्ध सश्याने सुचवले की आपल्या एका सोबत्याने चंद्राचा संदेशवाहक म्हणून हत्तींच्या राजाकडे जावे आणि चंद्र देवाला निरोप द्यावा की या तलावाभोवती त्याच्या नातेवाईकांचे वास्तव्य आहे, ज्यांच्या हत्तींना ते चिरडले जाण्याची भीती होती. त्यांच्या पायाखाली.  हत्तींनी भगवान चंद्र देवाचे म्हणणे ऐकले नाही तर त्याच्या क्रोधाने हत्तींचा नाश होईल.  लंबकर्ण ...

सिनेमा पाहणारा माणूस

Image
"सिनेमा पाहणारा माणूस"  तुमची शालांत परीक्षा आहे. शेवटचा पेपर गणित दुपारी ३ वा आहे आणि तुम्ही सकाळी घरातुन निघता. मॅटिनीला देव आनंदचा " तेरे घर के सामने " पाहता आणि ’ इक घर बसाऊंगा तेरे घर के सामने’ असं गुणगुणतच गणिताचा पेपर सोडवायला घेता. ( आणि १०० पैकी ९४ गूण मिळवता) असं करणारा माणूस हा ठार वेडा किंवा सिनेमावेडा असला पाहिजे. सिनेमाने ज्यांचं अवघं जगणं व्यापुन टाकलं आहे अशी काही माणसं असतात. राज कपुर म्हणायचे " आय ड्रीम सिनेमा.. आय लिव्ह सिनेमा.. आय ब्रीद सिनेमा". अशोक राणे हे त्यापैकी एक. म्हणुनच ते म्हणतात " थिएटरमधे अंधार पडला की मला खूप सुरक्षित वाटतं.. अगदी अ‍ॅट होम वाटतं !"   सिनेमा पाहणारा माणूस आणि तेही सातत्याने सिनेमा पाहणारा माणूस म्हणजे वाया गेलेला असा समज आहे. आज साठी ओलांडल्यानंतरही अशोक राणे वर्षाला ३०० च्या वर सिनेमे पाहतात. शाळेत नेहमी पहिल्या नंबरचा विद्यार्थी असणारे अशोक राणे यांना खरं तर केमीकल इंजिनिअर व्हायचं होतं. पण विधीलिखित काहीतरी वेगळंच होतं. लहानपणापासून असणारं सिनेमाचं वेड त्यांना अशा वळणावर घेऊन गेलं की सिनेमा हाच ...

वाचन का करावे?*

* "पुस्तके कशाला वाचायची? पुस्तकी ज्ञानातून कधीही जीवनाचे शिक्षण मिळत नाही" "इतरांच्या अनुभवातून आणि चुकांतून शिकण्यासाठी पुस्तके वाचावीत! त्या चुका आपण करून नये यासाठी!" "पण मला स्वत:च्या अनुभवातून शिकायचे आहे. हे जग मोठी अनुभवाची शाळा आहे. चुका करत करत शिकणे मला आवडते! माझे स्वत:चे तत्वज्ञान मी निर्माण करणार! अनुभवातून!" "मान्य आहे. अरे पण, जीवनातल्या सगळ्याच गोष्टी स्वत:च्या चुकांतून शिकून शिकून त्यातील तत्वज्ञान कळेपर्यंत आपले वय पण वाढत जाते. समजा तुला अनुभवातून शिकत शिकत एखादी गोष्ट समजली पण तोपर्यंत त्या अनुभवाचा उपयोग करण्याचे वय आणि वेळ निघून गेली असेल तर? आणि तुझ्या अनुभवातून आणि चुकांतून तू जो निष्कर्ष काढला तो जसाच्या तसा जर का या आधीच कुणी महान लेखकाने व्यवस्थित पुस्तकरूपात लिहून ठेवलेला असेल तर? तेवढा आपला वेळ नाही का वाचणार? एखादी चूक होण्यापूर्वीच आपण ती टाळू शकणार!" "पण लेखकाची आणि आपली पार्श्वभूमी, आजूबाजूची परिस्थिती वेगळी असते. लेखकाचे सगळे अनुभव आपल्याला कसे लागू होतील? सांग बरे?" "अरे! सगळे अनुभव नाही लागू होण...

निश्चय

Image
निश्चय  ती मागे वळून पाहत होती . तीचा भूतकाळ आठवत होती. मन कसं खिन्न झाल होत. इथपर्यत पोहोचण्यासाठी तीने प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. आज ती नोकरीच्या बाबतीत समाधानी होती पण भूतकाळातील तिची अवस्था आठवून ती फार अस्वस्थ होत होती. ती बी.ए. झाल्यावर ती MPSC पास झाली आणि तिची नेमणूक कमिशनर ऑफीसमधे कनिष्ठ लिपीक म्हणून नेमणूक झाली. आणि ती कामावर रूजू झाली. सरळ साधी रहाणी तिची असली तरी ती कामामध्ये फार हुशार होती. त्यांच्या ऑफीसच्या परिक्षा पास करत ती आज या पदापर्यंत होती. ती मुख्य लिपिक पदापर्यंत पोहोचली होती. स्नेहल स्वभावाने खरच सरळ साधी होती. तिला गर्व असा कधीच नव्हता. तिच आयुष्य खूप चांगल चालल होत. पण फक्त भूतकाळातल्या कटू आठवणी सोडल्या तर सर्व काही व्यवस्थित होत. ती अत्यंत गरीब अशा कुटूंबात जन्माला आली होती. अभ्यासात हुशार असल्यामुळे परिस्थीतीला चार हात लांब करत ती आज येथे पोचली होती. आज तिच्या मैत्रिणीचा साखरपुडा ठरला होता. ती आपल्या होणार्‍या पतीविषयीच्या गोष्टी हिच्याशी सांगत होती. तीला आनंदाने या गोष्टी सांगताना पाहून हिला मनातून फार खीन्न वाटत होत. माझ्याच बाबतीत ...

नीलची युक्ती

Image
नीलची युक्ती रेवा नदीत अनेक विविध जातीच्या लहान मोठ्या जलचर प्राण्यांची रेलचेल होती. एकमेकांवर यांची उपजिवीका अवलंबून होती. नदी वर्षाचे बाराही महिने पाण्याने भरलेली असे . लहान मासे शेवाळ खात. तर मोठे मासे लहान माश्यांना खाऊन आपली उपजिवीका करत असत. यातले मोठे मासे नेहमी छोट्या माशांना तुच्छ लेखत असत. नेहमी मोठमोठ्या वल्गना करत असत. छोट्या माशांना शक्तीप्रदर्शन करून घाबरवत असत. नील नावाचा छोटा मासा हे सगळं रोज पहात असे. त्याला आपल्या या छोट्या माशांबद्दल खूप वाईट वाटत असे. तो नेहमी विचार करत यातून कसं बाहेर पडता येईल . तो नेहमी हा विचार करत असे. असाचं विचार करत करतं तो नदीत फिरत असतानां तो एका मोठया खडकाच्या गुहेत येतो. जी बाहेरून फार अरूंद असते . आणि आतून फार मोठी होती. गुहेत आल्यावर त्याला ही गुहा पाहून आपल्या मुक्तीचा मार्ग मिळाल्यासारख वाटलं आपल्या कुटूंबियांना,मित्रांना एक सुरक्षेच स्थान मिळाल्याचा आनंद त्याला झाला. नील गुहेतून बाहेर पडताना त्याच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता. पण ही गोष्ट त्याने कोणालाही सांगितली नाही. असेच मोठे मासे सारखे त्यांना त्रास देत असत. हे सगळ पाहून ए...

वासुदेव

वासुदेव एक मोरपिशी टोपी एका हातामधे पावा नाचणारा वासुदेव कधीतरी आठवावा चार आणे मुठीतून घेत वाकायचा जेव्हा मोरपिसांचा संभार डोळ्यापुढे झुकायचा. आणे हातात घेऊन पुन्हा गाणे गात राही बाळमनावर माझ्या पीस थांबूनच राही आठवणी अशा काही रंग डोळ्यांवर निळा चिमुकल्या स्वप्नांवर जडे मोरपिशी डोळा वासुदेवाची भूपाळी बाळ-मुठीतले नाणे, मोरपिस आणि पावा मनी रुजवते गाणे  सौ.मनिषा राजन कडव

होळी

होळी स्वप्नांची पेटते होळी वेदनांचे तप्त निखारे मन होरपळून निघत आगीत नारळा प्रमाणे भावनांची होते राख भोवती रिंगण निराशेचे तरी सूर्योदय घेऊन येतो नवीन रंग आशेचे निराश जीवन पुन्हा नव्याने रंगीत होते पुन्हा स्वप्न साकारण्यात मन तल्लीन होते....         सौ. मनिषा राजन कडव

वळेसार

*वळेसार* पारिजात निवडुन घे किंवा बकुळ घे वेचुन अबोलीचा गजरा घाल वा चाफा माळ खोचून हळुवार वेणीशी खेळताना तुटले केस वेचुन घे नखाने जमिन उकरताना अंगणभर नाचुन घे डोळ्यांचा मनाशी चालला असतो लपंडाव धक्का देत मन कधी कधी मनावर येतो डाव पदराच्या शेवाला कितीदा भर भर पडतो पिळ स्पंदनाच्या ताला वर श्वासांची घुमते शीळ मावळतीला कलता उन्हं मोत्यांची नयनी धार अलगद साजण येतो मागुन श्वासात भिनतो वळेसार सौ. मनिषा राजन कडव

नंदू हत्तीचे मित्र

Image
नंदू हत्तीचे मित्र  एक  नंदू हत्ती एकटा मित्रांच्या शोधात जंगलातून फिरला. त्याला लवकरच एक माकड दिसले आणि त्याने विचारले, ‘माकडदादा, आपण मित्र होऊ शकतो का?’  माकडाने पटकन उत्तर दिले, ‘तू मोठा आहेस आणि माझ्यासारखा झाडांवर डोलू शकत नाही आणि इथून तिथून उड्या देखिल मारू शकत नाहीस, त्यामुळे मी तुझा मित्र होऊ शकत नाही.’ निराश झालेल्या  नंदू हत्तीने त्याचा शोध सुरूच ठेवला त्याला पुढे त्याला  ससा भेटला सशाला  भेेटल्यावर विचारले, ‘आपण मित्र होऊ शकतो का, ससोबा?’  सशाने हत्तीकडे बघितले आणि उत्तर दिले, “तू इतका मोठा आहेस की माझ्या बिळातही बसू शकत नाही. तू माझा मित्र होऊ शकत नाहीस.”  मग,  नंदू हत्ती  चालत राहिला मग त्याला वाटेत.बेडूक भेटेला  त्याने विचारले, "बेडूकराव, तू माझा मित्र होशील का?"  बेडकाने उत्तर दिले, “तू खूप मोठा आणि जड आहेस; तू माझ्यासारखी उडी मारू शकत नाहीस. मला माफ करा, पण तू माझा मित्र होऊ शकत नाहीस.”  वाटेत भेटलेल्या  प्रत्पेक   प्राण्यांना  नंदू हत्ती विचारत राहिला, पण नेहमी सारखेच उत्तर मिळाले. दु...

डाॅ.खानखोजे

Image
डॉ. खानखोजे : नाही चिरा ... देशाला स्वातंत्र्य मिळून जुनं झालंय. काही ठराविक नावे वगळता स्वातंत्र्यसंग्रमातल्या प्रसिद्ध व्यक्तींचाच विसर पडलाय, मग अप्रसिद्ध/अप्रकाशित अग्रणींची आठवण राहणे कसे शक्य आहे ? त्यामुळेच पांडुरंग सदाशिव खानखोजे नावाच्या प्रखर क्रांतिकारक, एक उत्तुंग कृषितज्ञ अस्तित्वात होता हे सत्य चारचौघांशिवाय फारसे कुणाला ज्ञातच नाही. त्यांच्यासारखे अनेक क्रांतिकारक स्वातंत्र्यासाठी पराकाष्ठा करत होते त्या सर्वांचा आदर ठेवून असे म्हणावेसे वाटते की खानखोजे यांच्या इतका आवाका, संचार फार कमी लोकांचा असेल. चित्रपटातसुद्धा सापडणार नाही इतके वादळी जीवन जगलेला हा क्रांतिकारक ! या विलक्षण व्यक्तिमत्वाचा ७ नोव्हेंबर हा जन्मदिवस, त्यानिमित्ताने त्यांच्यावर वीणा गवाणकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाची आणि त्याद्वारे या महान व्यक्तिमत्वाची ही ओळख. डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा जन्म वर्ध्याचा, १८८४ सालचा. १८५७ च्या क्रांतीत सहभाग घेतलेल्या आजोबांचा घरात वारसा लाभलेला. लहान वयातच पांडुरंग खानखोजे यांनी विविध संघटनांची स्थापना केली आणि कार्यकर्त्यांच्या गुप्त बैठका घेऊन क्रांतिकार्य अधिक व...

अबोलीचा गजरा

*अबोलीचा गजरा* अबोलीच्या फुलांची बहरून बाग आली  त्या भडकपणाची भुरळ मनाला पडली  मी गेले तडक फुलांच्यापाशी सुंदर गुंफण फुलांची मी तिथेच केली  मन अधीर झाले परिधान कराया तो गजरा  कसर वेणीची... जाईजुई मोगऱ्याची ...  मग अशी भरून निघाली ...  मी तयार झाले आता बायकांत मिरवाया  नववधूसारखी नटले ... पाऊले बावरी झाली ...  जरी नसे सुगंध याच्या ओटीपोटी  रंगात जादू भरली ज्याच्या, ते हे फुल,असे नांव "अबोली " सख्या - मैत्रिणी  साऱ्या जमतील जेव्हा माझ्या  त्यांत मी उठून दिसेन .... अबोलीच्या फुलांपरी दिसले जरी अबोल मी  कुणी छेडता मला यासमयी ... लाजून चूर होईन ... किती तरी सुगंधी फुले उमलली अवतीभवती माझ्या  अबोलीच्या फुलांशी अनुबंध असे हा जुनाच माझा     केसरी फुलांचे हसणे दर्शवते शुभ शकुनाला ...  मी भाग्यवान मुलगी ... याचा मला मिळे निर्वाळा ...                       सौ. मनिषा राजन कडव

म्हणावे कशाला...*

*म्हणावे कशाला...* धुंदी फुलाची गंधात आहे, आकार नाही म्हणावे कशाला  गातात पक्षी बागेत माझ्या, सत्कार नाही म्हणावे कशाला... माळून स्वप्ने येते मी डोळा, कां दंश व्हावा तुझ्या पापणीला?  दाबून पीडा जगते युगांची, चित्कार नाही म्हणावे कशाला.... सृष्टीत साऱ्या जरी भास त्याचे, करती तमाशा उगा शोधण्याचा बांधून देऊळ देवास कोंडी, दिशांत दाही म्हणावे कशाला....   नाहीच जमले जरी आज काही, विषादास थारा देतो  मनी ना  आशा उद्याची स्वप्नांत वाहे, नाहीच ग्वाही म्हणावे कशाला... -  सौ. मनिषा राजन कडव

ग्रंथालये हेच खरे सोबती

Image

घर

Image

विश्र्वास

Image
विश्वास  रेवापूर  नावाच्या गावात एका मेंढपाळाकडे काही शेळ्या व गायी होत्या रोज सकाळ संध्याकाळ तो त्यांना चरायला घेऊन जात असे. चचचच असं उच्चारताच त्याच्या हाकेसरशी सर्व गुरे व मेंढ्या वाटेला लागत असत. मेंढ्यांना दुसर्‍याच्या शैतात बसविणे. गाईंचे दुध विकणे, शेती करणे, शेणखत विकणे हा त्याचा व्यवसाय होता. यातील एका शेळीने दोन जुळ्या शेळ्यांना जन्म दिला होता. दोन्ही बाळ गोंडस होती. जंगलात चरायला जाताना सगळ्यांन सोबत येत असत. . रोज गवत खाऊन झाल्यावर ते तळ्यावर पाणी पिऊन घरी जात असत. एके दिवशी हे सगळे जंगलातून गवत खाउन येत असताना. एका खड्ड्यातून वाचवा वाचवा तसा आवाज ऐकू येऊ लागला. तेव्हा या दोन्ही शेळीच्या पिल्लांनी त्या खड्य्यात वाकून पाहिले. तर त्यात एक कोल्हा पडला होता. त्यातील एका पिल्लाने त्याला विचारले तू आत कसा पडलास. तो म्हणाला यातील पाणी फार गोड आहे असं मला समजल म्हणून उडी मारली. तू पण बघ पिऊन त्या पिल्लाला पण गोड पाणी पिण्याची लालसा झाली आणि त्याने पाणी पिण्याचे ठरविले. त्याचा भाऊ त्याला मनाला तू या कोल्ह्यावर विश्वास ठेवू नको. मला असं मनातून वाटतयं हा विश्वास ठेवण्या योग्य...

घर

घर... स्मिताने छकुल्याचा हात धरला आणि तडक घराच्या उंबऱ्याची वेस ओलांडून ती रेलवेस्टेशनच्या दिशेने निघाली. काल जरा जास्तच बोललो आपण असं तिला सारखं मनात खात होतं. "हा माझा प्रश्न आहे" हे वाक्य अश्रुधारा बनून वैनींचा पदर पूर्ण दिवसभर भिजवत होतं. जाऊबई खरं तर खूप प्रेमळ आणि काळजी घेणाऱ्या होत्या. पण प्रेमळ असलं म्हणजे त्या व्यक्तीला आपली मतं नसतात का? असे रमेशरावना वाटत होते. रमेशराव आणि वहिनी म्हणजे शिवपार्वतीचा जोडा वाटे. मुलं शाळेत गेली होती आणि रिकाम्या घरात हा असा भावनांचा महापूर सुरू होता.या घराला नवीनच! स्मिता तीन महिन्यांपूर्वी महेशशी लग्न होऊन आपल्या सासरी आली , आणि लवकरच ती त्या घराची कधी झाली ते कळलं ही नाही.आपल्या दक्ष आणि प्रेमळ स्वभावाने तिने थोड्या काळात सर्वांचे मन जिंकून घेतले होते. आणि मोठ्या जाऊबाई तर जाऊ नाहीच मोठी बहीण,कधी आई अशाच. ही स्मिता लेक होऊन राहिली होती. स्मिता म्हणजे अगदी जाऊबाईंच्या ओठावर वसलेलं गाव झालं होतं. पण मग आज काय झालं होतं? दादर हुन सुटणारी स्लो कल्याण पकडली स्मिताने. त्याच गाडीला भांडुपला महेश चढला. ठाण्याला सगळ्या कागद पत्रांची पूर्तता ...

शांत

शांत बसण मनात खुप काही असत सांगण्यासारख पण... काही वेळा शांत बसणच बर असतं... आपल दुःख मनात ठेवुन अश्रु लपवण्यातच आपल भल असतं... एकांतात रङलं तरी चालेल लोकांमध्ये मात्र हसावच लागतं... जीवन हे असच असत ते आपल असल तरी इतरांसाठी जगावच लागतं.... सौ. मनिषा राजन कडव

आई

आई तू असतीस तर.... आज तू असतीस तर...  आई आज तू असतीस तर  आज तीन पिढ्या मिळून (तू,मी, दिव्या) खूप धमाल केली असती, गेलो असतो खूप दूर दूर फिरायला ..  तू असतीस तर,  आई मी सुट्टी घेऊन साळगावला आले असते, तू असतीस तर, तू,मी, दिव्या तिघांनी मिळून काजवे पकडले असते  लाईट बंद करून आपण काजवे बाटलीत भरून  तिघांनी तिघांच्या आवडीची पुस्तके वाचली असती  तू असतीस तर  आज मी तुझ्या कुशीत  विसावले असते  सगळ्या जगाला विसरून मस्त झोपले असते.  आज तू असतीस तर  तिघी मिळून गोवऱ्या थापल्या असत्या  आज तू असतीस तर  आपण एकमेकांच्या वेण्या घातल्या असत्या  आज तू असतीस तर  तिघी नववारी साडी नेसून देवदर्शनाला गेलो असतो  आज तू असतीस तर  पण ....तुलाही तुझ्या आईची आठवण आली असती ना??? मग मी तुझी आई झाले असते पण तू नाहीस असं वाटतच नाही  तू आहेस तू तिथेच आहेस  तू कायम माझ्या बरोबर आहेस  आहेस ना आई !!!! सौ. मनिषा राजन कडव

तू

*तू खरंच खूप खास आहेस..* डोळे मिटून जेव्हा स्वतःला शोधशील, तेव्हा कळेल.. तू खूप खास आहेस... . आयुष्य म्हणजे आपल्याला हवं ते मिळवण्यासाठी करावा लागणारा प्रवास आहे.. मग प्रवासात कधी दरी,  कधी पर्वत.. कधी वादळ, तर कधी वाळवंट आहे.. कधी ऊन,  तर कधी मुसळधार पाऊस आहे.. कधी गालिचे,  तर कधी काट्यांची फौज आहे.. पण नजर लक्ष्यावर असेल,  तर प्रवास हा एक मौज आहे..! अशा असंख्य लक्ष्यांची तुझी आस आहे.. डोळे मिटून जेव्हा स्वतःला शोधशील.. तेव्हा कळेल,.... तू खरंच खूप खास आहेस.. वेदनांचे स्वतःचे एक महत्त्व आहे.. त्या सहन केल्यास तरच  तुझं एक ’अस्तित्त्व’ आहे.. पण जर हार मानून गेलीस.. तर मात्र पराभवाचे प्रभुत्व आहे.. प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर,  कधी शुभेच्छा,  तर कधी शिव्या-शाप आहे.. दुर्लक्ष केलंस तर कळेल, तुला तर तुझ्या स्वप्नांचाच इतका व्याप आहे..! काहीही झाले तरी डगमगू नकोस, तुझ्यात प्रचंड साहस आहे.. . डोळे मिटून स्वतःला शोधशील तर कळेल.. तू खरंच खूप खास आहेस. सौ. मनिषा राजन कडव

स्तब्ध

स्तब्ध का?कोण? जाणे आज मी स्तब्ध झाले  आसवांचे तुषार आज गालावर आले आई तूझी आज खुप आठवण आली तुझ्या जाण्याने हि दुनियाच परकी झाली तुझ्या जाण्याने तर रूसणेच बंद झाले हसण्याचे हि खरं वांदे झाले तुझ्या होती लांब केसांची शेपटी आता तर तिलाही मी दिलीय सुट्टी तू तर घेतलीस माझ्याशी कट्टी म्हणूनच मी ही घेतलीय पुस्तकांशी बट्टी आई तूझी उणीव कधीच भरणार नाही पण तू सतत माझ्या सोबत आहेस म्हणून मी ही हार मानणार नाही सौ. मनिषा राजन कडव

स्त्री काय आहेस तू

स्त्री काय आहेस तू... जिवाश्मांची वसूंधरा तू, यौवनाची कामिनी तू, हिमतीची वाघिण  तू कुळाची स्वामिनी तू... आकाशी धगधगती सौदामिनी तू, ओलावून बरसणारी श्रावणी तू, उन्हात गारव्याची सौमिनी तू, थंडीच्या शहार्‍यात उबेची दुलई तू... पतीची अर्धांगिनी तू, लेकराची माऊली तू, भावाची पाठराखीण बाहीण तू, मैत्री जपणारी सखीण तू... ज्ञानाचा प्रसार करणारी विद्या तू, स्वरांची सुरेल सरस्वती तू, शब्दातून जिवंत अशी कविता तू, साहित्याचे जल वाहणारी सरीता तू... चंद्राच्या अस्तित्वाला जागणारी पोर्णिमा तू, चांदण्याच्या सहवासाला भावणारी अमावस्या तू, आकाशी अस्तित्वातली नक्षत्र वैभवी तू,  स्वप्नात घेवून जाणारी निद्राणी तू... तेजस्वी ओजस्वी द्रोपदी तू, दृष्ट रावण लंका विध्वंसकारणी सीता तू, सावळ्या कान्ह्याची यशोदा माय तू, गार्गी मैत्रेयीची वाचा  तू... शिवबाची जिजाऊ तू, राणी झाशीची बळकट बाहू तू, पेशव्यांची आवड मस्तानी तू, राजयोगिनि अहल्या तू... पौराणातली आदिशक्ती तू, प्रभुची नितांत भक्ती तू, सळसळत्या मावळ्यांची जय भवानी तू, राक्षसांना बधणारी काली माता तू.. आजच्या युगाची प्रगती तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती ...

मोठी माणसे

Image
‘मोठी माणसे" ‘मोठी माणसे’ : पारतंत्र्य आणि स्वातंत्र्य यांच्या संधिकाळातील ही माणसे आहेत. त्यांच्या जीवननिष्ठेचा एक पदर स्वातंत्र्याच्या चळवळीशी आणि दुसरा समाजाच्या प्रबोधनाशी जोडला गेलेला आहे. ज्येष्ठ लेखक आणि ९६व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नरेन्द्र चपळगावकर यांचा ‘मोठी माणसे’ हा व्यक्तिचित्रसंग्रह नुकताच समकालीन प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. यात आचार्य जावडेकर, शंकरराव देव, काकासाहेब गाडगीळ, केशवराव जेधे, श्रीपाद अमृत डांगे, आचार्य भागवत, स्वामी रामानंद तीर्थ, एस.एम. जोशी, अच्युतराव पटवर्धन, नानासाहेब गोरे, मधू लिमये आणि गंगाप्रसाद अग्रवाल अशी बारा व्यक्तिचित्रे आहेत. या संग्रहाला चपळगावकर यांनी लिहिलेली ही प्रस्तावना… ज्यांच्याबद्दल  लिहावेसे लेखकाला वाटले ते लिहिले, अशा बारा मोठ्या माणसांची व्यक्तिचित्रे या पुस्तकात एकत्र केली आहेत. साधारणतः १९२० ते १९७० अशा पन्नास वर्षांच्या काळात जे महाराष्ट्राच्या समाजजीवनात कार्यरत होते आणि ज्यांचे मोठेपण  लेखकाला भावले, अशांची ही व्यक्तिचित्रे आहेत. एका दृष्टीने पारतंत्र्य आणि स्वातंत्र्य यांच्या संधिकाळातील ही माणसे...

चांगलाच धडा मिळाला

Image
चांगलाच धडा मिळाला !! गावाकडच्या घरी एका सावकाराकडे असलेल्या कोंबडेरावांचा थाट काही और होता. उंचापुरा, डौलदार आणि त्याचा तो भरदार तुर्रा! तो चालायचा तेव्हा जणू एखाद्या राजाची स्वारी निघाल्यासारखी वाटे. सावकाराच्या घरातील इतर कोंबडे, कोंबड्या, बदकं, कुत्रे, मांजरी, गाढवं या कोंबडेरावाला जरा वचकून असत. हे कोंबडेराव सावकारांचे फार आवडते. कुणीही पाहुणे त्यांच्याकडे आले की सावकार कोंबडेरावांची विशेष ओळख करुन देत. येणारा प्रत्येक पाहुणा कोंबडेरावांचं मनसोक्त कौतुक करायचा. त्याच्या जागी दुसरं कुणी असतं तर या अशा कौतुकानं शेफारुनच गेला असता. त्याला गर्वही झाला असता. पण कोंबडेरावांचं तसं काही झालं नाही. त्याचे पाय जमिनीवरच राहिले. तो सावकारांचा आवडता असल्याने त्याला इतर प्राण्यांपेक्षा, ते त्याला चांगलं खाऊ पिऊ घालत. काजू-बदाम देत. आपल्या सोबत्यांसोबत खान्यापिन्याचा बाबत सावकार भेदभाव करतात हे बघून कोंबडेरावांना वाईट वाटे. यातून त्याने आपल्या बुध्दीने एक मार्ग काढला. तो सावकारांची नजर चुकवून त्याला मिळालेले काजू-बदाम आलटून पालटून घरातील इतर कोंबड्या, बदकं, कुत्रा,गाढव आणि मांजरीला द...