Posts

Showing posts from October, 2022

स्वभावाला पत्र

*स्वभावाला पत्र* प्रिय स्वभाव,             आम्हा सर्व मनुष्य प्राण्याच्या आयुष्यात तुला खूप महत्व आहे. मुळात आमच्या व्यक्तिमत्वाची पारखच तुझ्यावरून केली जाते. काल सहजच एक मैत्रिण बोलून गेली, (मनिषा ) तुझा स्वभाव फार हळवा आहे. ती सिंपथि होती कि काय कुणास ठावूक पण अप्रत्यक्षपणे तिने  माझ्यात तुला अधोरेखित केले. म्हणूनच आज मुद्दाम तुला पत्र लिहितेय.      स्वभाव,तू प्रत्येकातच दडलेला आहे. कधी कोणामध्ये फटकळ,कधी मृदू,भोळा निरागस,तापट लबाड तर कधी चांगला कधी वाईट या आणि अशा कित्तेक स्वरुपात तू असंख्य व्याक्तीत्वामध्ये जागा घेतली आहेस. आपण जेव्हा एखाद्याबद्दल बोलतो कि याचा स्वभाव असा आहे...तसा आहे...तेव्हा आपण हे कशाच्या आधारावर बोलतो..त्याचं इतर लोकाशी व्यवहार करताना आढळून आलेलं वागणं.. त्याच्यातील चांगल्या-वाईट वागण्याच कमी जास्त प्रमाणात इतरांना होत असलेले दर्शन...त्यातून प्रदर्शित होणार संवाद-विसंवाद...वपुंनी काय म्हटलय कि कुठलाही माणूस हा कायमचा वाईट नसतो ...फक्त तो आपल्याला हवा तसं वागत नसतो एवढंच.व्यक्ती आणि वल्ली यात वपुंनी व्यक्तिनिहाय ...

गांधी का मरत नाही

गांधी का मरत नाही ?' चौकटीत न मावणारा गांधी समजून घेतांना.... दोन ऑक्टोबर हा दिवस महात्मा गांधी जयंती म्हणून आपण सर्वजण साजरा करतो. या साजरे करण्यात कार्यालयीन, शासकीय सोपस्काराचा गंध अधिक असतो. बाकी 'महात्मे' वेगवेगळ्या जातीने वाटून घेतले. ह्या इत जातीच्या चौकटीत म.गांधी बसू शकले नाही. कम्युनिस्ट, आंबेडकरी, आरएसएस हे वैचारिक टोक असलेल्या चळवळीतील अभ्यासकांनी, माणसांनी संघ गांधींना कधी जवळ केले नाही. अगदी गांधीवाद्यांनी गांधीना नीट समजून कर घेतलेलं दिसत नाही. तरीही शासकीय कार्यालयाच्या भिंतीवरील गांधीजींच्या बो फोटोची अपरिहार्यता टाळता आली नाही. विचार पुसता आले नाहीत. या देऊ पार्श्वभूमीवर अलीकडे रावसाहेब कसबे यांचे 'गांधी पराभूत राजकारणी 'आणि विजयी महात्मे' जगदीश कदम यांचे 'गांधी समजून घेतांना' ही वि पुस्तकं गांधी विचाराची नव्याने मांडणी करतात. ह्यात चंद्रकांत वानखडे लिखित 'गांधी का मरत नाही' हे पुस्तकही वेगळ्या मांडणीने लक्षात राहिलं. आरंभी पुस्तकाचे शीर्षक पाहून हा माणूस गांधींना मेल्यावरही मारायला का उठला ? हा प्रश्न मनाला अस्वस्थ करून गेला, प...

रातराणी

*रातराणी* त्या पूर्वेकडल्या, लहानशा गावात एक बंगली, सुंदर तेथ विराजित - असे तियेच्या चहुबाजूंनी पर्णफुलांचे दाट आवरण जणु निसर्गराजाने दिधलेले तिला एक वरदान त्या बागेमध्ये होती गर्दी एकच नाना वृक्षलतांची, कुणि होते वृद्ध वयाने, कुणि फुलती नव तेजाने कुणि अजुनि रंगती बालपणची स्वप्ने पाहुनी त्या पलीकडे अति सुंदर ताठ्यात उभी ही कोण ? शोभे जणु कुणि तरी स्वर्गिची अप्सरा अवतरली भूवरी - होते जवळच सुंदर एक सरोवर ज्यातून उडती अन् चमकती शुभ्र तुषार त्या जलामध्ये ती राणी न्याहाळत होती कान्ति आरस्पानी   आज पौर्णिमा, स्वच्छ चांदणे नीलाकाशी विखुरली सुमने अशा मुहूर्ती, राणी सुंदर सज्ज झाली मांडण्या स्वयंवर - ती बहरली होती चहुबाजुने आणि नटली अंगप्रत्यंगाने घेउनिया सुंदर ओढणी तलम फुलांची जाळीतून खुलते कांती नवतेजाची - घेतले तियेने ' जाई 'स अपुल्यासंगे आणि निघाली स्वयंवरासी सुंदर नवरसरंगे - त्या बागेमध्ये जमले नृपती अनेक गुलाब, चंपक आणि पारिजातक तो तिकडे होता उभा मत्त निशिगंध चहूबाजुला पसरित होता धुंद सुगंध - ही राणी रात्रिची गेली गुलाबापाशी परि जाता जाता काटा रुतला पायी पाहून फजिती, गर्वानेही गु...

मृत्यूचे थैमान

*मृत्युचे थैमान* निसर्ग कोपला पुर हा दारी आला घरदार वाहून गेला मृत्यू सामोरी आला॥१॥ गडगडाट ढगांचा लखलखाट विजांचा थयथयाट पाण्याचा सुस्कारा श्वासांचा ॥२॥ सोसाट्याचा वारा छप्पर नाही घरा बेफाम हा वारा ओघळणार्‍या अश्रुधारा ॥३॥ निर्सगाचे रौद्ररूप अनूभवले खूप शोधकार्याचे स्वरूप विसरली तहानभूक ॥४॥ सौ.मनिषा राजन कडव १६/ए ,ओमशिवमकृपा को .हौ.सो गुरुनानक शाळेजवळ ,रामबाग -४ कल्याण (पश्चिम) ४२१३०१

पहाट

|| *पहाट*॥ झुंजुर मुंजुर पहाट पक्ष्यांचा किलबिलाट, सोनेरी किरणांनी उजळे प्रकाशाची वाट......... धुक्याची दुलई मंद पहाटवारा, अंगा शिरशिरे धुंद गारवा बोचरा......... नभी घननिळ्या बगळ्यांच्या माळा, डोंगराआडचा सूर्य करे डोळा किलकिला......... दवबिंदूचे शिंपण दारी प्राजक्ताचा सडा, परसाच्या रानामागे घमघमला केवडा......... नव्या स्वप्नांची रोज नवीन पहाट, चैतन्याच्या उत्साहाने भारलेली जगरहाट......... सौ.मनिषा राजन कडव

फडफडे तिरंगा

कवितेचे शिर्पक -*फडफडे तिरंगा* फडफडे अंबरी उंच तिरंगा झेंडा  घे प्रणाम आमुचा  विश्व विजयी  ध्वजराजा..।.१।। "भ्रद्राय राजते" "मुद्रा" रे  तव अंकी त्या महाप्रतापी  अशोक सम्राटाची.।।..२।। तव रंग तीन द्योतक  पावित्र्याचे अन् चैतन्याचे  द्योतक ऐश्वर्याचे...।।३।। सौंदर्य सत्य आणि शिव ही परब्रम्हाचे तू दाखविसी आम्हा प्रकटरूप जणू त्याचे....।।४।। तू प्रतिक अससी अमुच्या स्वातंत्र्याचे  त्यासाठी  आम्ही साहित्या कष्टाचे ..।।..५।। तू प्रतीक आमुच्या आशा-आकांक्षांचे  ज्या फडफड करती सदैव हदयी त्यांचे.....।।.६।। तू प्रतीक प्रीती आणि  बंधु-भावांचे  तू प्रतीक  आमुच्यामधील  सख्यत्वाचे.,.…।।७।। तू प्रतीक राष्ट्रामधील मित्रत्वाचे तू  प्रतीक मानव-जातीच्या ऐक्याचे...।।८!! साकार स्वप्न  तू असशील विश्वशांतीचे तू स्फूर्तीस्थान असशी खरोखर आमुचे.,।।..९।। दे पंख आम्हा तू कर्तव्य-स्फूर्तीचे उड्डाण कराया गगनी उच्च  ध्येयाचे...!!..१०।। सौ.मनिषा राजन कडव manisha.kadav@gmail.com मोबा- 9869718659

माऊली रणचंडिके

[14/10, 7:36 pm] my jio no: *ऊठ माउली..रणचंडिके..!* ~~~~ ऊठ माउली..रणचंडिके..  जळशी तरी मन का मुके..? रणचंडिके..!! माया तुझी साऱ्यावरी.. पण हुंदका वाऱ्यावरी.. तुझिया मनाचे सोसणे.. पाहुनिया ठोका चुके.. रणचंडिके..!! या आंधळ्या सत्तेमुळे.. बघ जानकी कितीदा जळे.. तू पाजल्या पान्ह्यावारी.. का ही अशी आली पिके.. रण चंडिके..!! थांबू नको..टाळू नको.. आसू पुन्हा ढाळू नको.. अन्याय हा जाळावया.. तेजाब व्हावे हुंदके.. रणचंडिके..!! ~~~~ [14/10, 7:36 pm] my jio no: *मृत्युचे थैमान* निसर्ग कोपला पुर हा दारी आला घरदार वाहून गेला मृत्यू सामोरी आला॥१॥ गडगडाट ढगांचा लखलखाट विजांचा थयथयाट पाण्याचा सुस्कारा श्वासांचा ॥२॥ सोसाट्याचा वारा छप्पर नाही घरा बेफाम हा वारा ओघळणार्‍या अश्रुधारा ॥३॥ निर्सगाचे रौद्ररूप अनूभवले खूप शोधकार्याचे स्वरूप विसरली तहानभूक ॥४॥ कशी सांगु ही व्यथा वळवाच्या पावसाची कथा आले दैन्य माथा निसर्ग कोपला आता ॥५॥ सौ.मनिषा राजन कडव २४-०७-२०२१

बगळा

बगळा एकदा एका तळ्यात शिरला एक बगळा होता तो रंगानै आगळा आणि वेगळा येऊन बाता मारल्या मी करेन तळ्याचा विकास तळ्याचा मोरक्याही होता  डोक्यानै भकास विश्वास ठेवला यावर जाणून न घेता हातातून काढून दिली त्याच्या हातात सत्ता मदार्‍याच्या माकडा सारखी तर्‍हा झाली त्याची काठी उगारून बगळा म्हणेल तसं कर आता ढँची ढँची तेल गेल तूप गेल  हाती इलं धुपाटणं रौज मरे त्याला कोण रडे हेच नेहमीच रडगाणं विकासाच्या नावावर बगळा मेद खाई तळ्यातल्या प्राण्यांंचे मात्र रोज हाल होई एकाच्यातही नव्हते धारिष्ट बोलण्याचे एकजुटीनै पुन्हा चांगले दिवस आणण्याचे रोज एक एक करून प्राणी येथील संपतील बगळा काम झाल्यावर बगळ्याचे मात्र अशाने सुगीचे दिवस येतील बगळ्याचं म्हणण एकच नरा आता सगळे जगू नका कोणी मी मात्र बसून खाईन  तुमच्या टाळूवरचं लोणी सौ.मनिषा राजन कडव कल्याण

बेडूकराव

आले बेडूकराव,आले बेडूकराव डराव डराव करून यांनी  भरला सगळ्यांना दम काय तर म्हणे आज पासुन मी तुमचा चेअरमन आजपासून इथे  मीच सांगेल ते होईल हाजी हाजी करेल माझी तोच पुढे जाईल आजपासून तुम्ही करा  तयार दही आणी लोणी सभा घेऊन सगळ्याची  मीच खाईन फक्त  खाणार नाही कोणी अरेरावी फक्त इथे  चालेल फक्त माझी हुशार लोक चालत नाहित मला हवीत हवी फक्त करणारी हाजी तुमच्यावर हुकूमत  चालवून मी स्वार होईन जास्तच चालवले कोणी डोके  तर त्याला बघून घेईन कुत्र्यासारखे शेपूट घालून  तुम्ही मिटींगला बसायचे मी टाॅमी म्हणताच तुम्ही  काॅय काॅय करून शेपूट हलवायचे निर्बुध्द लोकांच्या नगरीचा मी आहे राजा मी असताना कशी सुखी होईल माझी प्रजा सौ.मनिषा राजन कडव कल्याण

खुर्ची

*खुर्ची* खुर्चीवर बसायची एकदा माकडांना सुटली हाव एकाच खुर्चीवर सगळी माकडे कशी बसतील हो राव।।१॥ शिक्षित प्रशिक्षित आणि भलत्यांचीच पडली पुढे उडी लंगडत फेंगडत पुढे आले म्हणे मी उभारेन गुढी ॥२॥॥ सत्तेसाठी खुर्चीवर  सगळ्यांच्याच उड्या पद मिळावे म्हणून सरकारपुढे सर्वांच्या पायघड्या ॥३॥॥ चॅक चॅक करत लाळघोटेपणा करत करतयं हाजी हाजी सरकार म्हणतय पिळशील सगळ्यांना तरचं खुर्ची तुझी ॥४॥ उपाशी तापाशी कोरोनाने मरेनात का सगळे खुर्ची फक्त आपली आहे आपले होईलच सगळे चांगले ॥५॥ खाउ पिऊ मजेत राहू आनंदाने पाय पसरा मरेनात उपाशी सगळे आपल्या घरी मात्र दिवाळी दसरा ॥६॥

चंद्रकलेचे रुप सानुले*

*चंद्रकलेचे रुप सानुले* चंद्रकलेचे रुप सानुले , नील नभी विलसले सख्या रे मनात मी हसले -- निळे निळे हे झुलते अंबर  नाचे खाली विशाल सागर  चंद्रबिंब  ते नभी हासता , दरिया वर उसळे   -- धवल  चंद्रीका होती  विहरत  अम़ूतस्पर्शे  अवनी पुलकित  गंध प्रीतीचा मनी दरवळे , प्रीतीपुष्प उमलले -- आठवणींचे ओघळले सर तुझे सावळे रुप मनोहर  मोहून गेले, मला न कळले ,अशी कशी मी फसले --

थांब आता

थांबव हा प्रलय आता आज स्वाईन फ्ल्यु उद्या कोरोना अशा साथींवर येताहेत साथ मला माहित आहे रे  तुझ्यावर या मानवानेही केलाय आघात तुझ्या या रौद्र रूपात तु किती हाहाकार करशील पिकलेल्या पानासोबत कवळे ही नेशील अरे पण एका दोघांच्या चुकीमुळे  तु घेणार आहेस का सगळ्यांचा जीव अरे तुला बाबा आज घरी दिसत नाही म्हणुन रडणार्‍या चिमुकल्यांची तुला थोडीशी तरी येऊदे कीव काय चालवलयस तु हे तु तरी असा निष्ठुर हौऊ नकोस पिल्लाने जरी आचळ चावले तरी माय नाही रे कधी  मारत तु ही जरा समज तुझं हे  मानव बाळ सुधारेल निश्चितच धडा घेईल या महामारीतून आणि लावेल झाडे धरणीवर तुही या धरतीवरून या कोरोनाचा  पसारा आवर,या कोरोनाचा पसारा आवर सौ.मनिषा राजन कडव कल्याण

करून दाखव

*करून दाखव* विचार काय करतेस, काहितरी करून दाखव.. वेळ जाईन निघून, प्रवाहामध्ये तरून दाखव.. लाखो आले अन गेले, बोल घेवडे सगळे.. स्व:ता काही नाही केले, फ़क्त लोकाना उपदेश दिले.. उपदेशाचं कडू तु पिऊन तर बघ.. सत्याची कास धरून तर बघ.. कुणीतरी आपल्या भल्याच सांगत असतं.. एखाद्यावर विश्वास ठेवून तर बघ.. यश आपल्याच हातात असतं. फक्त त्या वळणावर चालून तर बघ सौ.मनिषा राजन कडव ग्रंथपाल डी.एस.हायस्कूल,शीव

मुरली

*मुरली*                   नको नको राधे करू ,माझा बाई असा हेवा  । मीही सखी मुकूंदाची ,तुझ -माझा नाही दावा  ।। असशील गोकुळीची, लाडकी ग गौळण तू  वेडावते माझ्या स्वरे,सारे गोकुळ परंतू  ।। सौदर्याने तुझ्या बाई ,भुलविसी गिरीधर . परी माझ्या नादापायी ,उभे डोले चराचर  ।। हरि अधारांचे बाई ,  तुझे-माझे  एक सुख  परि माझ्या येते कानी , त्याच्या अंतरीची हांक ।। कधी व्याकूळसी राधे , विरहात जळसी तू  वचनाने कटिबध्द ,मीच कान्ह्याशी परंतू। ।। सैरावैरा धावतात,हरिपायी गवळणी  धुंडतात परी स्वर , कुठे येतो माझ्या कानी  ।। राधे जाईल गोकुळ , आणि गौळण गोधन  यमुनेच्या काठी परी, राहिल ग माझी धून. ।।

हिमराणी

*हिमराणी* कापसापरी तरल धुक्याचा लेवुनिया  बुरखा  कोण असे ही स्वप्नसुंदरी ?झाकतसे स्वमुख दरीदरीतुन, गिरीराजीतुन ,खिदळत जलधारा "पहलगाम"च्या अंकावरती ,झुलते "लंबोदरा" शुभ्रधवल  त्या  हिमगुच्छांनी ,गिरीशिखरे फुलती रविराजाच्या आगमनाने ,अलोकित धरती उंच उंच ते चिनार ,पाइन,गगनाला भिडती उंच उंच त्या हिमशिखरांशी,जणु स्पर्धा करती  तेजकणांनी चमचम करती , मुकूट सोनेरी देई उधळून ,वैभव सारे,सुर्याची स्वारी जललहरीसह क्रीडा करती ,जलबिंदू सान  दंग होउनी ,भान हरपुनी,चालतसे नर्तन खळखळ मंजुळ नादमधुरते चाले मधुसंगीत  अवखळ चंचल लहरीमधुनी वाहे ती अविरत रूपवती ही,आली कोठून? कोठे ही चालली? अमूतकुंभा कठी घेउनी, उर्वशी अवतरली  हिमराणीचे करिती स्वागत , हिरव्या वूक्षतती कमान करुनी,वातेे हलुनी,मस्तक ते झुकवती  धुंद रम्य त्या वातावरणी ,सुखावले मनमन  थांबली गती,गुंगली मती,गेले भारावुन मोहमयी त्या  सूष्टीचे मज वाटे आकर्षण  अशीच कधीतरी देते दर्शन होता मी उन्मन

एकाकी तारा

एकाकी तारा. एकाकी त्या ताऱ्यापरी  वाटे असावे जीवन आकाशी  जो चमकून ,प्रकाशितो गगन -- लहानसे अन् निर्मळ ,रुप त्या ताऱ्यांचे असे  आणि शुभ्र पांढरा तो , नेत्र तेजःपुंज भासे -- चांदण्यांही  अनेक  त्या आकाशात चमकती आणि चंद्रासवे रात्री ,फेर धरूनी नाचती -- रूपं त्यांचे ते क्षणिक ,जीवनही अन् क्षणिक  चंद्राविना जिणे  त्यांना ,वाटे  व्यर्थ - निरर्थक -- सायंकाळी आकाशात ,लाख चांदण्या दिसती  आणि सुर्योदयापूर्वी , प्रकाशी त्या नष्ट होती  -- असे त्यांचे ते जीवन ते , दुजावरती निर्भर  नसे त्यांना स्व-अस्तित्वच , आणि मन अन् स्वभाव -- स्वयंपूर्ण तारा जगे , स्वाभिमानाने जीवन  आपुल्याच जीवनात ,असे तोही परीपूर्ण -- अढळ ते ध्येय  त्यांचे , अमर अन्  ते जीवन  येऊ दे संकटे परी , आपुला मार्ग आक्रमित -- नको  जिणे  चंद्रिकेचे ,निर्जीव  नि अस्पष्टसे एकाकी  त्या ताऱ्यापरी ,वाटे जीवन असावे  -- सौ.मनिषा राजन कडव.

स्वातंत्रवीरांना सलाम

*नॅशनव लायब्ररी बांद्रा आणि वर्ल्ड व्हिजन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने* *सावित्रिबाई फुले रात्रशाळा राज्यस्तरिय साहित्य स्पर्धा स्पर्धा क्रं. १* *कवितेचे नाव* *स्वातंत्र्यवीरांना प्रणाम*  दिव्य प्रभा तुझी ती शुक्रास लाजविते | नेत्रव्दयांत तुझिया  विद्युल्लताच विलसे  ||धृ|| व्योमीं विनायका तू  उड्डाण उंच  करीशी | संचार स्वैर करिशी  मेघासवेही रमशी ||१|| वर्षाव तेथ करिसी चैतन्य ओज यांचा  | वर्षाव अमृताच्या  कवने मधुर त्यांचा  ||२|| "तान्हाजीचा पवाडा " "सप्तर्षि" काव्य "कमला"  | गमली मुकुंद मुरली  "मुर्ती दुजी  ती" सकला  ||३|| वक्तृत्व दिव्य तुझे  रणशिंग मजसी गमले  | स्वातंत्र्य युध्द लढण्या  पाचारिंते जना जे  ||४|| तव लेखणी असे वा  ज्वालाग्राही  विषारी | पारदास्य नाशकारी  दौर्बल्य क्लैब्य हारी ||५|| जणु रुद्र नेत्र तिसरा  ते चरित मॅझिनीचे | स्वातंत्र्य समर  तेंही ज्वालामुखीच भासे  ||६|| सशस्त्र क्रांती बीजे स्थापूनी मित्र मेळा | तू पेरिली पुढे तो स्वातंत्र्य वृक्ष झाला...

आठवण

आठवण एकट्याने रंगवता येत नाहीत मैफिली असं म्हणत ते उठून गेले एकेकटे आता खरंच रंगली मैफल सारेच निघून गेल्यावर पण बरे झाले ते उठून गेले  मी हरवलेली माझ्यात  आठवणींची मैफल रंगली नसतीच त्यांच्या गलक्यात ... सौ.मनिषा राजन कडव.

स्वस्वपान

स्वप्न कधी कधी स्वप्ने छान पडतात ..!! कधी कधी स्वप्ने छान पडतात हवी हवी अशी मस्त वाटतात स्वप्नात आपले वय दिसत नसते जसे स्वप्न तसे वय होऊन जाते कधी असतो आपण मस्त तरुण मन सुद्धा जाते गाणे गाऊन प्रेम सुद्धां अगदी छान जमून जाते प्रेमामध्ये मन हरवून जाते कशी मस्त मस्त ती दिसत असते अगदी हवी तशी वाटत असते रंगी बेरंगी फुलपाखरासारखी मनात कशी झुलत बसते ...? अशी स्वप्ने अशी स्वप्ने कशी अलगद अलगद येतात .? साखर झोपेत कशी गाणी गाऊन जातात अशी स्वप्न मोडू नये असे खूप वाटून जाते पण स्वप्नाना शेवट असतो हे खूप खरे असते तरीही काही स्वप्ने खूप काही देऊन जातात तुमचे मन टवटवीत नि सकाळ छान करून जातात ...! सौ.मनिषा राजन कडव .

काय हवय स्त्रीला

काय हवय स्त्रीला सोने चांदी हिरे अहो नकोत हिर्‍यांच्या माळा फक्त कौतुकाने बघा डोळा दमून जेव्हा ती घरी येते कोणी देते का कपभर पाणी इकडून तिकडून मिळतात फक्त टोमणे क्षणोक्षणी तिही दमते जरा असाही विचार करा घरी आल्यावर हवा असतो तिला प्रेमाचा निवारा कडकडीत उन्हात उन्हाच्या झळात चालत असते तिही हो कुटूंबासाठी सायंकाळी घरी आल्यावर तिलाही हवा असतो हो शितल वारा तोंडाने बोलत नाही कधी ती पण तिचीही तळमळ होत असते सगळे अपमान सहन करताना आतून दाटून येत असत तिलाही यावेळी अपेक्षा असते गोड फूंकरीची. कपडे वाळत घालताना  एखादा कोपरा दुमडला जाऊन  तो दमट राहू नये म्हणून काळजी घेणारी ती  एखादा दुःखी कोपरा   दुमडते मुद्दाम  नात्यात ओलावा टिकावा म्हणून झोपताना बिछान्यावर  घातलेल्या चादरीला  चुण्या पडू नयेत म्हणून  काळजी घेते  ती आणि आयुष्याच्या  चादरीला  अनुभवांच्या चुण्या पाडाव्यात  म्हणून  झटत असते  ती स्त्री घेतेच काळजी  प्रत्येक बारीक सारीक गोष्टीची पोळी लाटताना चुकला आकार  नाही आला गोलावा बाई  लाटणं फिरवते  त्या चुकी...

मना मनातील आई

कविता - मना मनातील आई..! जरी माझ्याकडे तिची पाठ आहे  तरी मला ती पूर्ण पाठ आहे वाकली असेलही सावलीत  ती कण्याने अजून ताठ आहे......................|| दु:ख मनात कोंडिले  सुख चोहीकडे शिम्पिले  जखमेवरी दिसल्या खपल्या  अंगणात आनंदाचे सडे .......................|| स्वाभिमानी मुठ तिची कधी उघडी झाली नाही  दारिद्र्याची झुंबरे कधी घरात टांगली नाही ............................|| उन्हां-तान्हात वाटचाल झाली  काट्यानची  पायाखाली भुई चांदणसावली दिली तिने दिल्या ओंजळीत जाईजुई ................|| अप्रूपाची नसे हो कहाणी घरोघरी असते अशी बाई डोकावून बघा आत तरी ही तर मनामानातली आई ..............|||                                                            सौ . मनिषा राजन कडव.  १६-ए ओमशिवमकूपा को- हौ- सो गुरुनानक शाळेजवळ ,रामबाग -४ कल्याण (पश्चिम) - ४२१३०१

प्रेम मिलाप

प्रेम मिलाप तुझ्याच पायी तुझ्याच सवे पाहिले मी मम ऱूप नवे ध्यास तुझा श्वास माझा हरवून बसले मी कशी रे सख्या आगंतुक तु कोठुन आला मज लागला तुझाच लळा ह्रदयात शिरला तु अन झाला सगळाच घोटाळा मम लागेना काहिच गोड लागली बस तुझीच ओढ फिरते वेड्या मीरा वानी मी अन दिसतो सगळीकडे तू दिसतो सर्वत्र तू चित्तचकोर काय करावे या मनमंदिराला जिथे ठाकला तुझाच वास आळविते तुझला हि राधा एकदा तरी तु समोर ये माझ्या तू अन मिटव हा कायमचा प्रेम मिलाप

दुरावा

माझा तु आहेस म्हणून म्हणून तुझ्याशी मी भांडते ममातील काही दुःख मी तुझ्या पुढ्यात मांडते रडता येत नाही म्हणून आवाज कापरा  होत असतो उलट सुलट कधी कधी बोलुन तुला देत असते तु धरला अबोला की मीही मनात कुढत असते तुही समजून घेत जा थोडे प्रेम असुदे तुझेही जरा वेडे तुझ्यामुळेच ओळख माझी  तुझ्यामुळेच माझी जोडी नको धरू अबोला रूसू नको   लटक्या रागाने बघू नको तुझ्याशिवाय अपूर्ण मी दुराव्याने तू वागू नको

प्रेम रंग

*प्रेम रंग* रंगते मी नेहमीच तुझ्या रंगांमध्ये हसते मी नेहमीच तुझ्या हसण्यामध्ये खरंच खूप सोपी नसत दुसऱ्यान मध्ये रंगण तुझ्या साठी केलंय मी माझं सोपी जगणं तुझ्या माझ्यातले रंग अशेच नेहमी उमलु दे तुझ माझ प्रेम कायमच मनी बहरूदे रंगताना मला तुझी साथ असुदे चुकली जरी वाट माझी तरी हाथी हाथ असुदे.... सौ.मनिषा राजन कडव

अश्रू

*अश्रू* दु:ख तसे प्रत्येकाच्याच नशिबी असते देवाने लिहिलेले काही लोकांना चिमुठभर तर काहींना मुठभर वाटलेले दु:ख तसे लहान मोठे येत नाही हाताने मोजता हातांना येते ते फक्त दुसऱ्यांचे अश्रू पुसता अश्रू म्हणजे दु:खाची पावती पापण्यांचा उंबरठा ओलांडल्यावर गालावरून सरसर ओघळती पुसण्यास जर नसले हात सांत्वनाचे तर धरतीमातेला जाऊन मिळती काही अश्रू करतात फक्त डोळ्यात निर्माण ओलावा पापण्यांच्या चिरेबंदी वाड्यात असे त्यांचा विसावा आयुष्य एखाद्याचे संपल्यावर अश्रूंची धार बरसते ठाव नसते त्यांना बरसल्यावर की त्यांचेही आयुष्य संपते अश्रूंना न रंग असतो ना असतो त्यांना गंध स्वत: ढळून दुसऱ्याचे मन मोकळे करण्याचा छंद अश्रू असतात सदा अबोल त्यांचा किंचितही न होई आवाज मेलेल्या सुखाच्या तिरडीवरती त्यांच्या फुलांचा निशब्द साज अश्रुंचे अनुशासन कमालीचे त्यांचे ढळणे देखील एका रांगेत उतरताना आपल्या गालावरुनी देतात दु:ख संपल्याचा संकेत प्रेम असफल झाल्यावरही लावतात अश्रू हजेरी पण सांगा मला या अश्रूंनी प्रेम करावे कोणावरी अश्रूंची ताकद निराळीच आगळीच त्यांची कर्तव्य दु:ख हलके करण्याचे त्यांच्यात विलक्षण सामर्थ्य नसतेच अश्रू...

जगण्याची जिद्द

जगण्याची जिद्द- एकाकी वाळवंटात उगवले एक रोपटे कोणीही सोबत नसताना वार्‍यावर डोले बापुढे॥१॥॥ कंटाळा यैत नसेल का त्याला एकटे असे राहताना आनंद कसा मिळत असेल वृक्ष जिवन जगताना॥२॥॥ कुणीही न सखा कुणी न संग सोबती गप्प उभे हे  स्तब्ध जागेवरती॥३॥॥ विचारले मी त्या रोपाला जिव तुझ्यात कोठूनी आला तडकलेल्या जमिनी मध्ये जिव तुला कसा नावरला॥४॥ दूरवर चोहीकडे बघता थेंब न एकही पाण्याचा ना दिसले जीवन कोठे वाळवंट होता पसरलेला॥५॥ प्रश्नार्थक नजर पाहून रोपटे तयावर उद्गारला अंकुरीत केले दैवाने जगण्याचा मोह मज होता॥७॥ जीवन एक संघर्ष आहे तो सुटला न कोणाला जिद्द उरी बाळगूनी जगण्याचा जणु नशाच चढला॥८॥ तहान भागवण्या धरतीची होईल मी ही एक कल्पवृक्ष जेव्हा येई माणसांला समज जीवन होईल मरणापरी सहज॥६॥ सौ.मनिषा राजन कडव

पुर्नजन्म

*पुनर्जन्म* वेड मला जडले ग  काट्यांतून हसण्याचे सुकलेल्या पुष्पांतुन पुन: पुन: फुलण्याचे मेंदीचा लाल रंग खुलवितसे अंग अंग परंतु ती जळीतसे  मनिचा अंतरंग हांसत ये ऋतू वसंत  उधळीत ये मधु सुगंध  ग्रीष्मातील तप्त ऊन फुलवितसे मम जीवन केतकीच्या मधु सुगंध दरवळतो आसमंत मला मात्र डोलवितो मस्त - सुस्त तो भुजंग विझलेल्या राखेतून  पेटते अग्निशिखा ज्वालेच्या तेजातून  मज मिळते संजीवनी वेड आहे मजसि खुळे असण्यातील नसण्याचे मृत्यूची ओढ मला देत असे पुनर्जन्म  सौ.मनिषा राजन कडव.

क्षण

विसाव्याचे क्षण आयुष्यात कधी तरी यावे स्वतःशीच स्वतःला बोलता तरी यावे ।।१।। सर्वांमध्ये असूनही एकटेच असतो आपण पण स्वतःच स्वतःला कधी ओळखतो का पण।२।। खूप काही मनात साचलेल असत तंद्री लागते कधी कधी पण व्यक्त मात्र होत नसतं ।।३।।

जीवन काव्य

*जीवन काव्य* मानवी भावभावनांचे वेगवेगळे भावविश्व उलगडतात फक्त काव्याच्या अंतरंगात कधी ओघळतात दुःखाचे अश्रू कधी साठवतात सुखाच्या आठवणी कधी उलघडत जाते कविता सुखाच्या हिंदोळ्यावर तर कधी घसरते ती दुःखाच्या लहरींवर या अनोख्या भावनांच्या विश्वात तरिही धागे जुळत जातात वेगवेगळ्या नात्यांचे कधी स्वप्नांच्या दुनियेत विहरतात तर कधी सत्याच्या दुनियेत जागवतात यातूनही गवसते एक नविन काव्य सौ.मनिषा राजन कडव

मन

बघता तुला समोर मन माझे मोहरले न सांगता तुला काही माझ्या मनातले तुला रे कसे कळले

भिती

धोका नको पलय नको मन याला भित असते ज्याला आपण घाबरत असतो त्यालाच सामोरी जावे लागते

रातराणी

*रातराणी* त्या पूर्वेकडल्या, लहानशा गावात एक बंगली, सुंदर तेथ विराजित - असे तियेच्या चहुबाजूंनी पर्णफुलांचे दाट आवरण जणु निसर्गराजाने दिधलेले तिला एक वरदान त्या बागेमध्ये होती गर्दी एकच नाना वृक्षलतांची, कुणि होते वृद्ध वयाने, कुणि फुलती नव तेजाने कुणि अजुनि रंगती बालपणची स्वप्ने पाहुनी त्या पलीकडे अति सुंदर ताठ्यात उभी ही कोण ? शोभे जणु कुणि तरी स्वर्गिची अप्सरा अवतरली भूवरी - होते जवळच सुंदर एक सरोवर ज्यातून उडती अन् चमकती शुभ्र तुषार त्या जलामध्ये ती राणी न्याहाळत होती कान्ति आरस्पानी   आज पौर्णिमा, स्वच्छ चांदणे नीलाकाशी विखुरली सुमने अशा मुहूर्ती, राणी सुंदर सज्ज झाली मांडण्या स्वयंवर - ती बहरली होती चहुबाजुने आणि नटली अंगप्रत्यंगाने घेउनिया सुंदर ओढणी तलम फुलांची जाळीतून खुलते कांती नवतेजाची - घेतले तियेने ' जाई 'स अपुल्यासंगे आणि निघाली स्वयंवरासी सुंदर नवरसरंगे - त्या बागेमध्ये जमले नृपती अनेक गुलाब, चंपक आणि पारिजातक तो तिकडे होता उभा मत्त निशिगंध चहूबाजुला पसरित होता धुंद सुगंध - ही राणी रात्रिची गेली गुलाबापाशी परि जाता जाता काटा रुतला पायी पाहून फजिती, गर्वानेही गु...

आली भरती

*आली भरती ...* पावसाने नद्यांना आली पूराची भरती त्यात ढगांना वाटले भेटावी धरती... अरे परि तू जागा चुकलासी खेळ तुझा क्षणाचा झाला पण त्यात संसार अनेकांचा बुडाला... देवाच्या दारात माणसाचा देवावरचाच विश्वास ऊडाला निष्पाप जिवांचा केला तू अंत याची मनात कायम खंत देणाऱ्यांनी दवा दुवा पैसा दिला पण त्याने सुधारेल काय वेळ निष्पाप जिवांचा बळी घ्यायचा कधी थांबवशील खेळ... सौ.मनिषा राजन कडव

भावना

मानवी भावभावनांचे वेगवेगळे भावविश्व उलगडतात फक्त काव्याच्या अंतरंगात कधी ओघळतात दुःखाचे अश्रू कधी साठवतात सुखाच्या आठवणी कधी उलघडत जाते कविता सुखाच्या हिंदोळ्यावर तर कधी घसरते ती दुःखाच्या लहरींवर या अनोख्या भावनांच्या विश्वात तरिही धागे जुळत जातात वेगवेगळ्या नात्यांचे कधी स्वप्नांच्या दुनियेत विहरतात तर कधी सत्याच्या दुनियेत जागवतात यातूनही गवसते एक नविन काव्य सौ.मनिषा राजन कडव

जगविजेथा बुध्द

*जगविजैता बुध्द* गौतमा गौतमा सिद्धार्था तूच मार्गदाता तू जगविजैता तोडून सारे बंधन पाश सोडला सारा मोह मायबाप नि पत्नी मुलं तू सोडून गेला गृह जग उद्धारक शांतीदुता तुज चरणी टेकते माथा ! राजपाट हा सोडून सारा बनला तू संन्यासी मानव कल्याणाचे स्वप्न घेऊन उराशी ठरला तूच मुक्तीदाता तूच मानवाचा भाग्यविधाता. ! सौ.मनिषा राजन कडव.

आलं आभाळ भरून

सुरवातीला *नॅशनल लायब्ररी वांद्रे आणि वर्ल्ड व्हिजन मुंबई  यांच्या संयुक्त वद्यमाने *सावित्रीबाई फुले रात्रशाळा राज्यस्तरीय साहित्य स्पर्धा क्रमांक ४*  विषय - *आलं आभाळ भरून*  *पावसाची सर* आलं आभाळ भरून आली चॆतन्याची सर कण कण थरारला गेली भिजवून सर...॥१॥॥ भिरभिरं वाहे वारा संगे डोलते ही सर तापलेल्या या मातीत गंध भरते ही सर...॥२॥ झाडे वेली बहरली हसविते सुमनांस सर सुकल्या जिवांत प्राण भरते ही सर....॥३॥ धरती-नभातील दुवा त्यांना जोडते ही सर दुरावल्या मना-मनांत प्रेम फुलविते सर॥४॥ सौ. मनिषा राजन कडव ग्रंथपाल, डी.एस. हायस्कूल,शीव 9869718659

कविता

कविता कविता  धरेच्या मातीत रूजली  निसर्गाच्या  कुशीत विसावली  कविता  चांदण्या वेचीत आली  चंद्रा सवे खेळण्यात रंगली  कविता  राना वनात नाचली  पायी बोचती काटे , तीने  फुले वेचली कविता  संगीतात नाहली  ताला सुरात गीत गायीली  कविता  पंख लाऊन उडाली  आकाशी तीने  झेप घेतली  कधी  कविता ,  धेनुचे वासरू  झाली   मायेत ,  प्रेमात  बुडून  गेली  सौ .मनिषा  राजन कडव

पावसाच्या धारा

*सावित्रीबाई फुले रात्रशाळा* *राज्यस्तरीय साहित्य समिती,महाराष्र्ट राज्य* *नॅशनल लायब्ररी वांद्रे आणि वर्ल्ड व्हिजन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने* *आला रिमझिम पाऊस*      .... कवितेचे शिर्षक - *पावसाच्या धारा* रिमझिम पावसाच्या धारा अन् उधाणलेला वारा मोर फुलवी पिसारा भासे सुंदर नजारा    || १ || सृष्टी फुलुनिया येई मन आभाळच होई वाटे नाचावे आनंदे अंगणात थुई थुई    || २ || सृष्टी सजली नव्याने जणू नवीच ग नवरी गाठ बांधी तिचा शेव इंद्रधनू मेघावरी   || ३ || सृष्टीचे हे नवे रूप बघ मोहवे मनाला त्याच्या अस्तित्वाची साक्ष पटे हर एक क्षणाला    || ४ || सरी पावसाच्या बाई अंगभरी ग झेलाव्या अंगणात लेकीबाळी मुक्तपणाने खेळाव्या    || ५ || सौ.मनिषा राजन कडव. एम.ए.(मराठी),एम,लिब. ग्रंथपाल 9869718659

पगारवाढ

पगारवाढ दुरवरच फूगतोय मागण्यांचा बाजार  प्रत्येकाला हवाय इथे वाढीव पगार मिळेल तेवढं काढावं हा त्यांचा ध्यास आहे, . ?  कामाचा कंटाळा अन् दामाचा हव्यास आहे,.! सौ.मनिषा राजन कडव.

पगार

पगार आपल्या पगाराला जर दोनाने गुणले... आकडा होई दुप्पट हा पगार मिळाला... महागाईमुळे वाढले भाव जिन्नसांचे... तरीही भागत नाही द्यावा दोष कुणाला...   सौ.मनिषा राजन कडव.

उपाशी

आज कमावतय कोण आणी कोण निट खातय आज परिस्थिती बदललीय खरच कुत्र पिठ खातय पुर्वी श्रीमंत गणला  जाणारा शेतकरी आज उपाशी मरतोय शेतकरी प्रधाम भारतात आज तो धाय मोकलून रडतोय आणी ठेकेदार मात्र खदाखदा हसतोय काय होणार या देशाच जिथ दिवसभर राबणारच  उपाशी मरतोय

कमाई

आज कमावतय कोण आणी कोण निट खातय आज परिस्थिती बदललीय खरच कुत्र पिठ खातय पुर्वी श्रीमंत गणला  जाणारा शेतकरी आज उपाशी मरतोय शेतकरी प्रधाम भारतात आज तो धाय मोकलून रडतोय आणी ठेकेदार मात्र खदाखदा हसतोय काय होणार या देशाच जिथ दिवसभर राबणारच  उपाशी मरतोय

मृत्युचे थैमान

*मृत्युचे थैमान* निसर्ग कोपला पुर हा दारी आला घरदार वाहून गेला मृत्यू सामोरी आला॥१॥ गडगडाट ढगांचा लखलखाट विजांचा थयथयाट पाण्याचा सुस्कारा श्वासांचा ॥२॥ सोसाट्याचा वारा छप्पर नाही घरा बेफाम हा वारा ओघळणार्‍या अश्रुधारा ॥३॥ निर्सगाचे रौद्ररूप अनूभवले खूप शोधकार्याचे स्वरूप विसरली तहानभूक ॥४॥ सौ.मनिषा राजन कडव १६/ए ,ओमशिवमकृपा को .हौ.सो गुरुनानक शाळेजवळ ,रामबाग -४ कल्याण (पश्चिम) ४२१३०१

काबुलीवाल्याची बंगाली बायको

Image
*‘काबुलीवाल्याची बंगाली बायको’*   सुस्मिता बॅनर्जी यांच्या ‘काबुलीवाला बंगाली बरू’ या बंगाली पुस्तकाचा मृणालिनी गडकरी यांनी अनुवाद केला आहे. या पुस्तकात लेखिकेने आपल्या आयुष्यातील काही घटना मांडल्या आहेत. थरारक, पण करुण... भाषांतरित साहित्यकृतीसाठी या वर्षीचा साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेल्या मृणालिनी गडकरी यांचे ‘काबुलीवाल्याची बंगाली बायको’ हे भाषांतरित पुस्तक म्हणजे अस्वस्थ करणारी थरारक, पण करुण कहाणी आहे. सुस्मिता बॅनर्जी या मूळ बंगाली ेलेखिकेची ही कथा! रवींद्रनाथ टागोरांच्या ‘काबुलीवाला’ या कथेतील रहिमत खान पठाणाची प्रतिमा मनात जपलेली सुशिक्षित बंगाली ब्राह्मण कुटुंबातील ही मुलगी! इंग्लिश घेऊन बी.ए. झालेली, जॉबाजखान, या अफगाण पठाणाच्या प्रेमात पडून त्याच्याशी लग्न करून अफगाणिस्तानमधल्या त्याच्या गावी सासरच्या लोकांना भेटायला गेली; पण तिथे तिची अवस्था तुरुंगातल्या कैद्याप्रमाणे झाली. १९८९ ते १९९५ अशी सहा वर्षे काढून नंतर तिथून अक्षरश: पळुन ती भारतात कशी आली, त्याची ही सत्य कहाणी. स्त्री म्हणून तिथे तिला आलेले विलक्षण दारुण अनुभव आणि त्याच वेळी अफगाणिस्तानात...

पहाट

|| *पहाट*॥ झुंजुर मुंजुर पहाट पक्ष्यांचा किलबिलाट, सोनेरी किरणांनी उजळे प्रकाशाची वाट......... धुक्याची दुलई मंद पहाटवारा, अंगा शिरशिरे धुंद गारवा बोचरा......... नभी घननिळ्या बगळ्यांच्या माळा, डोंगराआडचा सूर्य करे डोळा किलकिला......... दवबिंदूचे शिंपण दारी प्राजक्ताचा सडा, परसाच्या रानामागे घमघमला केवडा......... नव्या स्वप्नांची रोज नवीन पहाट, चैतन्याच्या उत्साहाने भारलेली जगरहाट......... सौ.मनिषा राजन कडव

वारी पंढरिची

*अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मुंबई पश्चिम विभाग* *विषय - वारी पंढरीची* *वारी पंढरीची* जीव शिव ओवाळला चला पांडुरंग भेटी वारी पायदळ  चाले वैष्णवांची झाली दाटी॥१॥ टाळ मृदंग वीणा बोले  तुळस डोईवर डोले वारकरी चालताना गुज अंतःकरणाचं खोले॥२॥ झेंडे पताका वाऱ्यावर घोडे बकऱ्या चालती जागोजाग पांडुरंगी भक्तीचे रिंगण घालती...॥३॥ देह झाला हा पालखी असा सोहळा रंगला  मूर्ती सावळ्याची नयनी  भोळा भाव वारीत दंगला॥४॥  वाटुली पाहे भक्तासाठी  पांडुरंग उभा दारी  उभी जिंदगी सारली  आज घडली रे वारी॥५॥ आता नको दाखवू बापा वाट परतीची संसारात धाड विमान विठ्ठला माझा जीव सांडो पदरांत॥६॥ झाला संसार  मनभर झाली हौस मौज सारी जीवनाच्या शेवटाला आलो देवा तुझ्या दारी॥७॥ आता नको पाहू अंत दार उघडून ठेव पांडुरंग नाम मुखी देह पालखीत ठेव॥८॥ आली पंढरी कोसावर परब्रम्ह आले दारी मूर्ती सावळ्याची दिसली झाली सफल जीवन वारी....!!!॥९॥ सौ.मनिषा राजन कडव. कल्याण,ठाणे

देव मला भेटला

*देव मला भेटला* काहींनी तो मूर्तीत पाहिला काही म्हणाले तो तर परमात्मा.. काहींच्या मात्या-पित्यात त्याची छाया काहींना तो स्वतःतच भासला. मी मात्र वेगळी असावी.. कारण, मला देव शब्दांतच भेटला. स्वतःवरचा जगावरचा विश्वास जेव्हा उडून जातो अशा काही ओळी वाचल्या होत्या काही अक्षरे जोडली होती काही छंद जमवले होते पूजा स्वरांनी केली जेव्हा  आत्माही त्यात मी ओतला.. कारण, मला देव शब्दांतच भेटला. माऊलीची कूस असो की देवळाची पायरी सुखाचं सिंहासन की ओसाड ओसरी शिखरी उन्मादांच्या आणि निराश गर्तेत कण कण जमवलेल्या यशाच्या वार्तेत. प्रत्येकच ठिकाणी मी शोधली वर्णने आणि त्यांना ओलावा बांधला कारण मला देव शब्दातच भेटला... साऱ्या जगाला मी पहात आले आहे नतमस्तक होताना देवांसमोर कधी कुणा सत्पुरुषासमोर कधी कुणा दगडासमोर ती उच्चत्वाची भावना मला दिसली कुठेच मात्र नाही जी पाहून माझा श्वास थबकला कारण मला देव शब्दांतच भेटला निथळत्या भावनेच्या अंगाअंगावरून माझ्या मनाच्या सरळ तारा जोडणारे काही उडणारे अन काही दडणारे काही मात्र सावली बनलेले अबोल शब्द शब्द इतके सारे जमले आहेत त्यांचाच एक शब्द बनला कारण मला देव शब्दांतच भेटला...

वारी पंढरिची

*वारी पंढरीची* जीव शिव ओवाळला चला पांडुरंग भेटी वारी पायदळ  चाले वैष्णवांची झाली दाटी टाळ मृदंग वीणा बोले  तुळस डोईवर डोले वारकरी चालताना गुज अंतःकरणाचं खोले झेंडे पताका वाऱ्यावर घोडे बकऱ्या चालती जागोजाग पांडुरंगी भक्तीचे रिंगण घालती... देह झाला हा पालखी असा सोहळा रंगला  मूर्ती सावळ्याची नयनी  भोळा भाव वारीत दंगला  वाटुली पाहे भक्तासाठी  पांडुरंग उभा दारी  उभी जिंदगी सारली  आज घडली रे वारी आता नको दाखवू बापा वाट परतीची संसारात धाड विमान विठ्ठला माझा  जीव सांडो पदरांत झाला संसार  मनभर झाली हौस मौज सारी जीवनाच्या शेवटाला आलो देवा तुझ्या दारी आता नको पाहू अंत दार उघडून ठेव पांडुरंग नाम मुखी देह पालखीत ठेव आली पंढरी कोसावर परब्रम्ह आले दारी मूर्ती सावळ्याची दिसली झाली सफल जीवन वारी....!!! सौ.मनिषा राजन कडव.

आला आषाढ श्रावण

*स्व.बाबासाहेब के.नारखेडेस्मृती राज्यस्तरीय स्पर्धा सन-२०२२* *कवितेचे नाव* - *आला आषाढ-श्रावण* आला आषाढ-श्रावण  सारे फुलले जीवन -॥धृ॥ येता रवीचे किरण  तेजे चमकते रान  जणु पाचुचे हे बन  हर्षे बागडते मन ॥१॥ येती पर्जन्याच्या धारा  आणि भिजविती धरा  देती तोडून बंधन  तिला दृढ आलिंगन -॥२॥ गर्भवती पृथ्वीतून  गंधवती मातीतून फुटे अंकूर नूतन  येता आषाढ-श्रावण -॥३॥ जशी हिरव्या कोंदणी  शोभे धवल चांदणी  तसा हरित तृणावर  दिसे दंवबिंदु छान - ॥४॥ काळ्या मेघांची कमान  वर बिजलीचे तोरण  कधी फांके मधुःप्रभा  जाता किरण त्यातून -॥५॥ नटली सृष्टी सौभाग्याने  आनंदाने उत्साहाने  शोभे जणु सुमंगला  येता तजेला नवीन -॥६॥ दृश्य पाहुनी गतिमान  माझे कल्पना विमान जाते गगन भेदून करी स्वच्छंदे भ्रमण -॥७॥ सौ.मनिषा राजन कडव. ग्रंथपाल- डी.एस.हायस्कूल,शीव

सात्विक संताप

*सात्विक संताप* मंदिरात आहेस तर , जाग जरा देवा , गाभाऱ्याला लागू देरे , बाहेरची हवा ..... । डोळे मिटून घेशी जणू ,पाहुनी पतन  .... तुवा दिले माणसाला पृथ्वीचे वतन .... । विध्वंसाचा ठेका ,जगी माणूस मातावा  .... त्याचे भय न्यारे , तुवा  गाभारा गाठावा ...| उन्हामध्ये ताठल्या गा , भाविकांच्या रांगा .... कोरडेला कंठ , घाम धावे चहू अंगा  .... । तुझ्या वाटे , भक्तीचाही व्यापार पाहावा ... तरी तुला आम्ही भक्त वत्सल म्हणावा ....| चराचरी व्यापलेला असशी म्हणती ... नित्य  येते तुझ्या नसण्याची रे प्रचिती ....| अमानुष खेळ जगी ,चालला पाहावा .... सांग देवा तुला ,कुण्या राऊळी शोधावा ....| लेकीबाळी मरतात , वासनेच्या खेळी ... सांग कुठे असतोस , देवा तू त्या वेळी .... अणूरेणूतून तुझ्या असण्याच्या ओळी वाटे मला , कस तुझा पणाला लागावा  .... । प्राक्तनाचे , प्रारब्धाचे , पाठ सारे धडे ... निष्पाप जीवांचा बळी , यातनांचे मढे .... माणसाला दिले मन बुद्धी ,  तू तोकडे .... माणसाचा लगाम तू पुन्हा हाती घ्यावा ..... । कोटी कोटी रूपातून , प्रकट होतोसी .... कोटी कोटी मनातून का न तू राहसी ......

सार संपलय

सारं संपलय ... पोलिसांच्या भावना हद्दीत संपल्यात थोरांचे विचार रद्दीत संपलेत पावसाचं पाणी सिंचनात संपलय सरकारी योजना चिंतनात संपलीय राजकारण प्रचारात संपलय समाजकारण आचारात संपलय शांतता शोधात संपलीय अशांतता रोधात संपलीय ज्ञानदान स्पर्धात संपलय ज्ञानार्जन अर्ध्यात संपलय कल्पना आशयात संपलीय भूमिका विषयात संपलीय विकास रस्ता खड्ड्यात संपलाय मिळून मिसळून टक्क्यात संपलाय आजाराचं निदान ऐपतीत संपलय त्या देवावरच्या भक्तीची कैफियत संपलीय न्याय निवाडा तारखेत संपलाय हस्तक्षेपकांच्या पारखेत संपलाय नात्यांचं जुळणं जातीत संपलय विविध रंगी मातीत संपलय आधी माणूस माणसात जगायचा आता माणूसकी माणसात संपलीय. सौ . मनिषा राजन कडव .

बरसल्या श्रावणधारा

*बरसल्या श्रावणधारा* (कविता ) खिडकीतून वेध घेत  मन फुलपाखराप्रमाणे बागडत  धावत.........सुसाट पळत  उंच उंच गरुडझेप घेत  अशा बरसल्या श्रावणधारा ||१|| रंगबिरंगी पक्षी...प्राणी  माना डोलत आनंदाने नाचतच  रेशीम सरींना स्पर्श करीत  धुंदावणारे मन देखील  थुई थुई नाचणाऱ्या मोराप्रमाणे  नृत्य करू लागताच  अशा बरसल्या श्रावणधारा ||२|| इटुकल्या पिटुकल्या बालमित्रांची  साचलेल्या पाण्यात डुबक्या घेत  तरुण मन देहभान विसरून  ओल्या चिंब भावनेने शहारत कुणा आपल्या माणसाची  स्मृती आठवत  धुंदपणे धुंदावून ओल्या पापणीत साचवत  अशा बरसल्या श्रावणधारा ||३|| खटयाळ वारा जरा छेडतच  पाना-वेलींच्या कानी कुजबुजत बेभानपणे साऱ्या सृष्टीला हलवत  स्वतः मात्र बेहोशीत डोलत  भुलवी सारा पसारा  अशा बरसल्या श्रावणधारा ||४|| फुलांचे गंध  मादकपणे शोषून  तृप्तपणे मिटून... सुखावून....  बेधुंद सुगंधाची लयलूट करून  ओल्या गारव्याशी हितगुज करीत  शहारणाऱ्या मातीला अधिकच वेडावून अशा बरसल्या श्रावणधारा ||५|| धरतीवर जण...

जीथे कृष्ण तिथे राधा

*जिथे कृष्ण तिथे राधा* कृष्णरूप राधा राधेरूप झाला कृष्ण, ओळखता येईना राधा कोण कोण मोहन. राधा असून ती, तिचा रंग निळा, बासरी कृष्णाकडे आणि सूर तिच्या गळा. रंग राधेचा गोरागोरा पान, निळा विसरला भान, हरपली जाण. मोरपंख नाजुकसे लाऊन फिरे माथ्यावरी, तरी स्पर्श राधेचा मऊ रेशमापरी. हा कसा असा खेळ अलबेला, थक्क होई कृष्ण पाहून राधेच्या लीला. कृष्णजन्मी येउनिया कसली हि बाधा, वाट पाही मुरारी आणि उशिरा येई राधा. कृष्णरूप घेउनी राधा, कृष्णालाच छळते, राधारूप होऊन  चित्त, कृष्णाचेपण जळते. गेल्याच जन्मी चढले हे, कृष्णावर राधेचे ऋण, मुक्या आसवांच थोडं उरलं आहे देण. सौ.मनिषा राजन कडव

नात्याचे अंतरंग

*नात्यांचे अंतरंग* नातं हे असतं ,  गाडल्या जाणाऱ्या बीजासारखं ... जुळवून घ्याव लागंत त्याला मातीशी  अन झुंजाव लागत उनपावसाशी . काळजी घ्यावी लागले कोंब फुटेपर्यन्त  अन वाट बघावी लागते  उभ रहाण्याची ताकद येइपर्यंत. नात्याचही अगदी तसचं , घ्यावं लागत जुळवून गुणदोषांशी  अन लढावं लागत स्व: च्या धारणांशी  घ्यावी लागते काळजी  समज गैरसमजांची  अन ओढ बाळगावी लागते  नातं फुलण्याची . तरच बहरतं सर्वार्थाने बी आणि नातं आभाळाकडे झेपावत इवलंस पातं. परंतु , नुसतेच बीज पेरणारे  मात्र  कधीच पोहोचत नाही त्याच्या सावलीपर्यन्त ... सौ.मनिषा राजन कडव

विज्ञानाचा ध्यास

विज्ञानाचा् ध्यास विज्ञानाचा घ्यावा ध्यास विज्ञानाचा घ्यावा श्वास विज्ञानात करा वास युग हे विज्ञानाचे ॥ ध्रु ॥ कठीण श्रमाने, विज्ञानाचे घेता धड़े अमृताचे घड़े बहु, लागतील हाती ॥ १॥ शोध कार्य करण्या, व्हावे तुम्ही अगतिक मिळो  कीर्ति जागतिक, असो ध्येय मनी ॥ २॥ खरा गुरु आहे , विज्ञानाचा ग्रन्थ दाखविण्या सुपंथ, सदैव हज़र ॥ ३॥ गुरु जे वदले, केले मी कथन करावे जतन तुम्ही, ॥ ४॥ सौ.मनिषा राजन कडव.

सर्वव्यापी विज्ञान

*सर्वव्यापी विज्ञान* जे दृश्य आहे, सत्य आहे, ते मूळ आहे   हे सर्व विज्ञान आहे.   गरीबी आणि रोगराईवर फक्त विज्ञानच उपचार करू शकते दोन्ही  समूळ  केवळ विज्ञानच ते नष्ट करू शकते.   संस्कृती, कला, धर्म, चालीरीती,   परंपरेमागे फक्त आणि फक्त    विज्ञान आहे   आणि विज्ञानच त्यांना जिवंत ठेवते.   मनुष्याशिवाय विज्ञान   विज्ञानाशिवाय माणूस अपूर्ण आहे.   विज्ञानाचा अर्थ  समाजात पसरलेल्या रुढी , अंधश्रद्धा संपवायला हव्यात.   विज्ञान हा समाज,   तो या जगाचा आत्मा आहे.   विज्ञानाशिवाय निसर्ग अपूर्ण आहे. सौ. मनिषा राजन कडव.

टाळ बोले मृदूंग बोले

*टाळ बोले मृदुंग बोले* कापसाला बोंड आली कापूस आला  वात झाली ज्योत पेटली,प्रकाश झाला प्रकाशात ज्योतीच्या जीव आतला झेपावला ॥१॥ नाही सुट्का तुझी रे आता माझा दिस आला पहाटेच्या काकड्याला टाळ बोले मृदुंगाला कळा लावा अनंताला अनंताच्या प्रवासात विठुचाच बोलबाला ॥२॥ आतल्या खोबणीत  पुन्हा कुणी कण्हावला जावे आता म्हणतो कान्ह्याच्या भेटीला वर वर रागरंग  आत आत्मा कातावला नाद ब्रम्हा तार लावला ॥३॥ भौतिकाच्या नादाने आड आला मनपावा वाट चुकवुन अद्वैताची भुलला पुन्हा सुरावटीला ॥४॥ सौ.मनिषा राजन कडव
*स्पर्धा !स्पर्धा ! स्पर्धा!* *अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद* *पश्चिम मुंबई विभाग, विद्यमाने*  *शब्द भाव मोती साहित्य समूह,मुंबई आयोजित*  *काव्य स्पर्धा.*     *दिनांक:- ०९/०९/२०२२* *स्पर्धा क्रमांक: ११* *विषय:- देऊ निरोप बाप्पाला* निरोप घ्यावा कसा गणेशा , कंठ दाटतो पुन्हा पुन्हा … । वर्ष सरावे कसे अनंता ,तुझ्या वीण उल्हास सुना …। १॥ येतो येतो म्हणताना , आला अन गेलाही तुवा …  शुभंकरा तू , चैतन्याचा उजळीत येशी शुद्ध दिवा …। २॥ वाजत येशी गाजत येशी , बहरूनी  जाई जग अवघे …  वाद्यांच्या गजरात झीन्गते तुझ्या सभोती जग अवघे ,,,।३॥  तेहतीस कोटी देवदेवता नित्य तुलाची भजतात ….  प्रथमपुज्य तू सर्व जणांना , तुझी थोरवी स्मरतात …। ४॥ तुझ्या भोवती आम्ही रमतो , विसरून जातो रे अवधान ….  तुझी मूर्ती अन तुझी च सेवा , मनामनातून एकच ध्यान ॥ ५॥ मान पान , ऐश्वर्य , प्रसिद्धी , सारे ठरुनी जाते फोल …  रूप सुंदरा , तुझ्या समोरी अन्य कशाला नुरते मोल …। ६॥ तुझीच सारी किमयागारी , जादू म्हणू कि मायाजाल ….  स्वतः भोवती खेचून घेतो अवघी दुनिया करुनी कमाल …। ७॥...

जीवन

जीवन जीवन सुंदर आहे फक्त मनाप्रमाणे जगता आल पाहिजे आयुष्यात येतात  चांगले वाईट प्रसंग  याचे आव्हान स्विकारत पुढे जाता आले पाहिजे छोट्या मोठ्या गोष्टीत पापाचे भागीदार आपण तर होतो थोडे फार पुण्यही  जोडता आले पाहीजे नाव ठेवण हे तर  लोकांच काम आहे यांना तोंड देऊन पुढे जाता आल पाहिजे वेड्याच सोंग पांघरून शहाण्यासारखं मात्र जगता आल पाहिजे भूलथापांना बळी न पडता आनंदात राहता आल पाहिजे जगण्याच्या लढाईत कधी  आपले सवंगडी निकामी होतात दुःख बाजूला सारून जीवन फुलवता आल पाहिजे यश अपयश दोन्ही येतात आयुष्यात यशाने हुरळून न जाता आणी अपयशाने खचून न जाता मार्गक्रमन करता आले पाहिजे जीवन हा एक रंगमंच आहे या रंगमंचावरील सगळी पात्रे जिवंत करता आली पाहिजे शेवट गोड झाला नाही तरी चालेल पण प्रेक्षकांना खिळवता आले पाहिजे सौ. मनिषा राजन कडव

आजी

।। *आजी* ।। मऊ गोधडी बघितली की मला आजी आठवते... उबदार स्पर्शातून माझ्याशी खूप काही बोलते आजीच्या सूती पातळाची गोधडी गर्भ रेशमी ऊब देऊन जाते मऊ गोधडी बघितली की मला आजी आठवते... इवल्या कपाळावर मेणानं टप्पोरं कुंकू लावलेली, करड्या शुभ्र केसांचा सुपारी एवढा अंबाडा घातलेली अवघ्या देही सुरकुतलेली पण चेहऱ्यावर समाधानचं ऐश्वर्य ल्यायलेली माझी आजी मला पांच्याहात्तरितही तेवढीच कणखर भासते मऊ गोधडी बघितली की मला आजी आठवते... ओथंबलेल्या आवाजात आजी माझी खुशाली विचारते डोक्यावरून पाठीवरून मायेनं हात फिरवते हट्ट न करताही सगळ्या गोष्टी ऐकवते त्याच सुरात त्याच लयीत गोड अंगाई गाते मऊ गोधडी बघितली की मला आजी आठवते... आजी उघडते एक गाठोडे, मला हळूच विचारते कमी पडतंय का गं काही?? म्हणून पुन्हा देऊ करते त्यातून बाहेर काढते एक एक शिदोरी, संस्काराची, धारिष्ट्याची, आदराची, अदबीची, धीराची, नी संयमाची.. आहे तरीही असू देत गं..जास्तीच लागत आजकाल सगळं म्हणते.. मऊ गोधडी बघितली की मला आजी आठवते... गोधडीचाच्या उबदार स्पर्शातून आजी मला नेहमीच भेटते, पुन्हा लहान पणीचा निखळ आनंद देते मोठ होत राहण्याची उमेद देते चढ उतारांचे...

केळीचे झाड आणी स्त्री

*केळीचे झाड आणि स्त्री* केळीचे झाड किती लहान मूर्ती लहान कीर्ती महान केळीचे पान दिसते छान जैसे हलती हत्तीचे कान छोट्यामोठ्या थोरा सान हिरव्या पत्री अमृत पान केळीचे खोड हत्तीचे पाय उपयोग सांगू कित्ती काय? चटया दोर जेवणाचे ताट विघटन होण्या वेगळी वाट पिशव्या रंगीत पर्सचा थाट ऐटीत करू बाजार हाट पौष्टिक स्वस्त केळी मस्त ऊर्जा झटपट करूया फस्त फुलांची भाजी करते आजी गरम खावी ताजी ताजी केळीच्या या उपकार केवढे आईच्या थोर उपकारा एवढे नमस्कार करू केळीला बाळा देह त्याचा उपयोगी सगळा सौ.मनिषा राजन कडव.

कन्या रत्न

*कन्या रत्न* कन्या रत्न जन्म तुझा आईच्या उदरी......... जन्म घेतलास गं तु कन्या  म्हणुन आईच्या ऊदरातुन | किती यातना सोसल्या त्या माऊलीने बघ जरा आठवुन || नऊ महिने तिने तुला ऊदरात  ठेवुन तुझा सांभाळ केला | आणि तुझा ह्या विश्वात "कन्यारत्न"  म्हणुन जन्म झाला || किती आनंद झाला घरात  आलीस जणु लक्ष्मी रुपातं |  स्वागतही झालं तुझं घरात सर्वां  साक्षी आनंदि वातावरणातं || सांगणं तुला एवढचं आहे की आरशाची काच तु,तडा नको  जावुन देवु | आजच्या ह्या जमाण्यात तु  फॅशनच्या दुनीयेत नको गं जावू || आई-बापाचा मान राखं तु, काही झालं तरी त्यांच्या  सोबतचं रहा तु | बापाचं जीवापाड प्रेम  तुझ्यावर त्यांचा विश्वास घात  कधी करुच नको तु || लाडात वाढवीली,लहाणाची  मोठी करीत तुला सांभाळलं | आता तु लग्न करुन सासरी  जाशील हेच त्यांच्या मनातं  सारखचं फिरु लागलं || आईची आभाळा भर माया, बापाची छाया सदैव तुझ्या  बरोबर असेलं | तु सासरी नांदतांना आपल्या घराण्याचं नावं राखशीलं  ह्या सारखं आंम्हाला दुसरं  सुखचं नसेलं || तु सासरी वावरतांना नवऱ्याच...

झुलते लाट किनारी

*भव्य राज्यस्तरीय साहित्य स्पर्धा क्रमांक ९* 🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣 *नॅशनल लायब्ररी बांद्रा आणि वर्ल्ड व्हिजन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने,सावित्रीबाई फुले रात्रशाळा राज्यस्तरीय साहित्य स्पर्धा क्रमांक ९*      *विषय :-आली लाट किनारी*  *कवितेचे नाव* *झुलते लाट किनारी* वाळूवर काढत नक्षी ती लाट किनारी आली मी स्तब्ध उभी काठावर आठवांची वर्दळ झाली ! देहाची नाजूक सळसळ करते माडाची झावळी मत्त समीर धसमुसळा  टाकतो विस्कटून सावली !  पैलतीरावर लाटेवरती  डचमळताना दिसते थोडी घेऊन इशारे सुकाणूचे  कुठे निघाली आहे होडी !  केशर क्षितीजावर झुलती बगळ्यांच्या मोहनमाळा संध्येचा सागरकाठी  घडे मावळतीचा सोहळा ! सौ.मनिषा राजन कडव.

सात्विक संताप

सात्विक संताप   मंदिरात आहेस तर , जाग जरा देवा , गाभाऱ्याला लागू देरे , बाहेरची हवा ..... । डोळे मिटून घेशी जणू ,पाहुनी पतन  .... तुवा दिले माणसाला पृथ्वीचे वतन .... । विध्वंसाचा ठेका ,जगी माणूस मातावा  .... त्याचे भय न्यारे , तुवा  गाभारा गाठावा ...| उन्हामध्ये ताठल्या गा , भाविकांच्या रांगा .... कोरडेला कंठ , घाम धावे चहू अंगा  .... । तुझ्या वाटे , भक्तीचाही व्यापार पाहावा ... तरी तुला आम्ही भक्त वत्सल म्हणावा ....| चराचरी व्यापलेला असशी म्हणती ... नित्य  येते तुझ्या नसण्याची रे प्रचिती ....| अमानुष खेळ जगी ,चालला पाहावा .... सांग देवा तुला ,कुण्या राऊळी शोधावा ....| लेकीबाळी मरतात , वासनेच्या खेळी ... सांग कुठे असतोस , देवा तू त्या वेळी .... अणूरेणूतून तुझ्या असण्याच्या ओळी वाटे मला , कस तुझा पणाला लागावा  .... । प्राक्तनाचे , प्रारब्धाचे , पाठ सारे धडे ... निष्पाप जीवांचा बळी , यातनांचे मढे .... माणसाला दिले मन बुद्धी ,  तू तोकडे .... माणसाचा लगाम तू पुन्हा हाती घ्यावा ..... । कोटी कोटी रूपातून , प्रकट होतोसी .... कोटी कोटी मनातून का न तू...

वाळू

वाळूवर काढत नक्षी ती लाट किनारी आली मी स्तब्ध उभी काठावर आठवांची वर्दळ झाली ! देहाची नाजूक सळसळ करते माडाची झावळी मत्त समीर धसमुसळा  टाकतो विस्कटून सावली !  पैलतीरावर लाटेवरती  डचमळताना दिसते थोडी घेऊन इशारे सुकाणूचे  कुठे निघाली आहे होडी !  केशर क्षितीजावर झुलती बगळ्यांच्या मोहनमाळा संध्येचा सागरकाठी  घडे मावळतीचा सोहळा ! सौ.मनिषा राजन कडव.

आले बेडूकराव

आले बेडूकराव,आले बेडूकराव डराव डराव करून यांनी  भरला सगळ्यांना दम काय तर म्हणे आज पासुन मी तुमचा चेअरमन आजपासून इथे  मीच सांगेल ते होईल हाजी हाजी करेल माझी तोच पुढे जाईल आजपासून तुम्ही करा  तयार दही आणि लोणी सभा घेऊन सगळ्याची मीच खाईन फक्त  खाणार नाही कोणी अरेरावी फक्त इथे  चालेल फक्त माझी हुशार लोक चालत नाहीत मला हवीत हवी फक्त करणारी हाजी तुमच्यावर हुकूमत  चालवून मी स्वार होईन जास्तच चालवले कोणी डोके  तर त्याला बघून घेईन कुत्र्यासारखे शेपूट घालून  तुम्ही मिटींगला बसायचे मी टाॅमी म्हणताच तुम्ही  काॅय काॅय करून शेपूट हलवायचे निर्बुध्द लोकांच्या नगरीचा मी आहे राजा मी असताना कशी सुखी होईल माझी प्रजा - या कवितेचा कुठल्याही वास्तविकतेशी संबंध नाही सौ.मनिषा राजन कडव कल्याण